थोडे आणखी काही वास्तू संदर्भात


थोडे आणखी काही वास्तू संदर्भात :———->

१) आर्थिक भरभराटी साठी प्रभावी तोडगे :-
बँकेत पैसे भरताना पश्चिम मुखी होऊनच पैसे जमा करावेत आणि मनातल्या मनात “ओम् श्रीं श्रीं श्रीं” या मंत्राचा जप करावा.
शुक्रवारी तुळशीसमोर गाईच्या तुपाचा दिवा लावावा व “ओम् श्रीं श्रीं श्रीं” या मंत्राचा जप करावा. 

२) बेडरूममध्ये देवांताचे फोटो का लावू नयेत?
पती-पत्नीच्या ठायी वैराग्याची भावना फुलू शकते त्यामुळे ते संसारातून विन्मुख होऊ शकतात.  कटकटी सुरु होतील.
स्त्री जर गर्भवती असेल तरच बालगोपालाचा फोटो लावू शकतो. नाहीतर सर्व देवी-देवतांचे फोटो हे मंदिराजवळच असावेत.

३) नवीन घर घेताना लहान मुलगा-मुलगी (२ ते ३ वर्षाचे) असेल तर त्यांना घेऊन जाणे, जर ते लहान मुल रडायला लागले किवा काही तरी वेगळेच करायला लागले तर समजावे ते घर राहण्यास योग्य नाही. 

४) जर घरात भांडण होत असेल, मतभिन्नता असेल, सुख समाधान नसेल, चीडचीड पणा होत असेल तर घरातील सर्व जुन्या, बंध स्थितीतील electronic वस्तू बाहेर काढाव्यात, आवाज करणार दरवाजा नीट करावा.

५) कोणालाही धारधार वस्तू, ज्वलनशील वस्तू भेट म्हणून देऊ नये.

६) आजार पण जास्तच मागे लागले असेल तर औषधांचा box आग्नेय कोपऱ्यात ठेवावा.

७) जर एखादया घरातील व्यक्तीला सारख्या जखमा होत असतील तर त्याने blood donate करावे.

Leave a comment