देवांचे आपल्या जीवनातील स्थान काय?


देवांचे आपल्या जीवनातील स्थान काय?

देवाला आम्ही मानत नाही, देवावर आमचा विश्वास नाही-श्रद्धा नाही, असे म्हणाऱ्यामुळेच समाजात वृद्धाश्रम, भ्रष्टाचार वाढत चालला आहे. अंधश्रद्धा हि फक्त देवासाठीच का मानली जाते? मग डॉक्टर, वकील, राजकारण्यांवर असलेली श्रद्धा ती कोणती?

जो दिसत नाही अशांबद्दलच-विरूद्धच माणसं फुशारक्या मारत असतात. पश्चिमात्य देशांमध्ये तर आपल्यापेक्षाही देवावर जास्त विश्वास ठेवतात. त्यांनी भूतांनाही मानले आहे पण आपल्याकडे भुते आहेत कि नाही या गोष्टीवरच अजून वाद चालू आहे.

हिंदू धर्मामध्ये ३३ कोटी देव का? हा वाद करणारे करतात. परंतु ऋषीमुनींनी समाजातील सर्व घटकांचा विचार करून देवांना नावे दिली. रुपांनुसार नावे बदलतात.

३३ कोटी देव म्हणजे ३३ कोटी माणसांचे विचार, प्रवृत्ती. ऋषीमुनींना आपल्या विचारांना पूजनीय केलं. त्यामुळे त्या प्रवृत्ती, विचार सांभाळण्याचे आपल्यावर नैतिक जबाबदारी येते.

निसर्गामध्ये सर्वांना स्थान आहे जसे सर्व पशुपक्षी, वृक्षवेली तसे देवांना का नको? म्हणून ऋषीमुनींनी मंदिरे बांधली. देव म्हणजे एक अतिउच्च शक्ती. मंदिरामध्येच देवाला स्थान आहे, आपले देव घरात ठेवू शकत नाही. पूर्वी मंदिरामध्ये सर्व सामुहिक कामे केली जायची. ऋषीमुनींना सार्वजनिक देवाला घरात स्थान दिले आणि देवाला personalize बनविले ते हि फक्त माणसांच्या सर्वांगीण विकासासाठीच.

ऋषीमुनींनी देवाला घरात घरात स्थान दिले पण ते इथेच (दिशेतच) का ठेवायचे? देवाला दिशेचे बंधन का?

देवाला वैयक्तिक करण्यामागे एकच कारण, माणसाला यथाशक्ती देवाची पूजा करता यावी व त्याचे फळ फक्त त्याच्या कुटुंबासाठी मिळावे.

देवाला ठराविकच दिशा का? देव कोणासाठी, आपल्यासाठी, मन स्थिर करण्यासाठी, वैयक्तिक विकासासाठी व इच्छित फळ घेण्यासाठी.

मन स्थिर करण्यासाठी अशी दिशा असावी जेथे आपले मन स्थिर राहील व मनात सात्विक विचार येतील. आग्नेय दिशा रागीट बनविले, वायव्य दिशा मन स्थिर होऊ देणार नाही, नैऋत्य दिशा राक्षसी आहे. पश्चिम व दक्षिण दिशाही मनाला स्थिरता देत नाहीत, मग अशी कोणती दिशा आहे जिथे माणसाचे मन स्थिर राहील, सात्विक विचार येतील, ती म्हणजे पूर्व, उत्तर आणि ईशान्य (जलतत्वाची दिशा). पाण्याप्रमाणे जीवन शांत होते.

देवाने पाहायचे कोठे?

पूजेचे फळ कोणाला पाहिजे तर माणसाला. Cosmo Rays जे पूर्व, उत्तर व ईशान्य कडून येत असतात त्यामुळे माणसाने देवपूजा करताना कोठे पाहिले पाहिजे हे महत्त्वाचे. आपला चेहरा पूजा करताना पूर्व, उत्तर व ईशान्येलाच आला पाहिजे, कारण पूजाही माणूस वैयक्तिक विकासासाठी करत असतो त्यावेळी दिशेचे फायदे तोटे हे माणसालाच होतील कारण देवाला काहीही नुकसान होत नाही.

ऋषीमुनींनी सार्वजनिक देवाला personalize केले आणि माणसाने देवाला generalize केले. देव काहीही करत नाही म्हणून माणूस देवाला कोठेही ठेवायला लागला. आपली संस्कृती ठराविक संकेतावर चालते, देव तेथे पावित्र्य. जसजसा माणसाचा हुद्दा वाढत जातो त्याप्रमाणे त्याला दिला जाणार मानसम्मान बदलतो मग देवासाठी मानसन्मान, स्थान का नको? जेव्हा साधा पाहुणा, नगरसेवक, मुख्यमंत्री, पंतप्रधान अनुक्रमे आपल्याकडे येतील तेव्हा आपण आपल्या घराची जशी व्यवस्था करतो मग देवासाठी का नको?

देवाचे पावित्र्य आपण देवाला कोठेही ठेवून ठेवता येईल का? देव म्हणजे आपल्या घराचे शक्तीकेंद्र. शक्तीकेंद्र विखुरलेली असतील तर त्याचे फळ मिळत नाही. देव काही बोलत नाहीत पण करून दाखवतात. देवाचे पावित्र्य तुम्हाला पाळता येत नसेल तर देवाला घरी का बोलावता-आणता? वैयक्तिक विकासासाठी देवाला शरण जाणे गरजेचे आहे.

देव मुख्य दरवाजावर असावा का?

मुख्य दरवाजासमोर चप्प्ला काढणे, स्मशानातून, हॉस्पिटलमधून येणे, यामुळे त्याचे पावित्र्य राखले जात नाही. देवाचे स्थान हे फक्त मंदिरातच. देव मंदिरात बसूनच आपले संरक्षण करू शकतो. त्याला मुख्य दरवाजाच्या मागे पुढे ठेवणे गरजेचे नाही. देवाजवळ श्रद्धेने बसून आर्द स्वरात हाक द्या, देव तुमच्या मदतीला नक्कीच येईल. आपली हाक देवाला ओळखीची वाटली पाहिजे त्यासाठी देवाला आवडेल असेल काम सतत करत रहावे.

देव हि आजची मानसिक गरज आहे. ऋषीमुनींनी समाजाला मूर्तीपूजा दिली कारण मुर्तीपुजेमध्ये MIND POWER, VISUALIZATION ची ताकद आहे. त्याचा अनुभव घेण्यासाठी मूर्तीपूजा. जी गोष्ट हवी आहे त्याला VISUALIZE करा, मिळून जाईल.

सुखःदेखात कोणीही साथीदार नाही फक्त एकच आहे आणि तो म्हणजे देव. प्रत्येक गोष्टीत NEUTRAL साथीदार. म्हणून सुख दुखः सर्वप्रथम देवालाच सांगा.

देव माझा मित्र / सखा कसा होईल (SHARING PARTNER)?  

दररोज देवाशी बोला, माणसाने देवासमोर झुकणे गरजेचे आहे. अतिउच्च शक्तीला सन्मान दिला गेलाच पाहिजे. सकाळी उठल्यानंतर जे काही करणार आहे ते देवासमोर मांडा व रात्री जे काही केले तेही मांडा. चांगल्या व वाईट गोष्टींची कबुलीही द्या. कर्मसमर्पित करा. वाईट कर्माची क्षमा मागा. मनोमन विचार करा कि, आजपासून सद्कर्म / सदाचाराचे / संतांनी सांगितलेल्या मार्गाचा वापर करेन. माझ्या संपूर्ण आयुष्यात एका माणसाला तरी जीवनात उभा करेन-मदत करेन.

घरात देव्हारा ऐवजी देवघर असावे. घरात सर्व गोष्टींना आपण जागा देतो मग देवाला स्वतंत्र जागा का नको? बसून देवपूजा करणे सर्वात उत्तम. गणेशाची दोन रूपे सिद्धी गणेश व रिद्धी गणेश. रिद्धी गणेश भौतिक सुखासाठी, सिद्धी गणेश भौतिक सुखापलीकडील सुख व ज्ञानासाठी. सिद्धी मिळविण्यासाठी तप, साधना कराव्या लागतात. देवारा लाकडी संगमखटी असावे. देवाऱ्हात मोजके देव असावेत, कुलदेव-कुलदेवी, इष्टदेव (गुरु), गणपती, महालक्ष्मी, बाळकृष्ण, अन्नपूर्णा, शंकराची पिंड. गुरूंचा फोटो देवघराच्या बाहेर असावे. लाल कलरची लाईट असावी. घंटी, आरती, दीप, धूप, हळद, कुंकू, तांदूळ, करंडा हि असावे. दीप आठवड्यातून एखदा दुवावा, मूर्ती पितांबरीने घासू नये, चिंच, हळद, कोकम / लिंबू चा वापर करून घासावे. दिवसातून एकदा तरी स्त्रोत्र पठण करावे.

माणसाच्या आयुष्यातून देव काढला तर माणूस राहणारच नाही.

सुपर नेचरल पावर म्हणजेच देव. पाश्चात देशानेही मानले आहे.

GOD = G – Generator / O – Operator / D – Destroyer

***********************************************************************

घरातील मंदिरात कोण-कोणते दैवत असावेत आणि त्यांची ठेवण कशी असावी जेणेकरून केलेल्या पूजेचे यथायोग्य फळ मिळू शकेल?

https://vastusiddhii.com/setting-of-idol-in-home-temple/

देवघर चुकीच्या ठिकाणी असल्यास काय होते?

https://vastusiddhii.com/temple-at-wrong-place-as-per-vastushastra/

देवघर कसे असावे?

https://vastusiddhii.com/temple-as-per-vastu-as-per-vastushastra/

देवघराची जागा बदलायची असल्यास काय करावे?

https://vastusiddhii.com/change-temple-location-as-per-vastushastra/

****************************************************************

वास्तूतज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय वास्तूसंदर्भात व वरील उपायांसंदर्भात कोणताही निर्णय घेवू नये. 

अधिक माहिती साठी संपर्क :-
वास्तुशास्त्र / ज्योतिष / रेकी तज्ञ श्री. मनोजकुमार आप्पा मोहिते
इमेल :- vastusiddhii@gmail.com
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhii/
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhi
Calling No. 83698 84338
Whatsapp no. 88280 53505

Leave a comment