आई-वडिलांची खोली


मनुष्य त्याच्या आयुष्यातील अर्धे आयुष्य झोपण्यात घालवतो. सध्याच्या धावपळीच्या जीवनात सुद्धा तो २४ तासांपैकी ८ ते १० तास झोपत आहे. सर्वांना हे तर माहित आहेच कि आपण ज्या ठिकाणी जास्त वेळ राहतो-बसतो त्या ठिकाणचा थोडातरी परिणाम आपल्यावर झाल्याशिवाय रहात नाही, त्यामुळे मनुष्य घरात ज्याठिकाणी दीर्घकाळ झोपतो त्याचा परिणाम त्याच्यावर झालेला दिसून येतो, त्याचा स्वभाव, त्याची विचार करण्याची पद्दत, त्याचे चालणे-बोलणे या सर्वांतून तो कुठे झोपत आहे हे एखादा चांगला वास्तुतज्ञ लगेच ओळखू शकतो.

त्यामुळे वास्तूशास्त्रात अशा ठराविकच जागा सांगितल्या आहेत जिथे आपण आपल्या पालकांना झोपण्यासाठी जागा देवू शकतो जेणेकरून ते त्यांच्या वृद्धापकाळातही सुखाने-आनंदाने जीवन जगू शकतील कारण आई-वडीलांचे स्थान प्रत्येकाच्या आयुष्यात खूपच महत्त्वाचे आहे. ते आयुष्यभर मुलांच्या सुखासाठीच झटत असतात त्यासाठी जेव्हा ते समाजाच्या दृष्टीने RETIRED होतात तेव्हा खरच त्यांना आत्मिक सुखाची खूप गरज असते.

त्यासाठी त्यांना जर पूर्व, ईशान्य, उत्तर या भागातच झोपवले तर …

१) त्यांचा स्वभाव शांत होईल.

२) ते संसारातून विरक्त होतील. मुलांच्या संसारात लक्ष घालणार नाहीत जे आत्ताच्या युगात खूप गरजेचे आहे कारण अर्ध्याच्या वर घरातील भांडणे हि पालकवर्ग मुलांच्या संसारात अपेक्षेपेक्षा जास्त लक्ष घातल्यामुळेच होत आहेत.

३) ते आनंदाने उरलेले आयुष्य देवधर्माचे कार्य करण्यात घालवतील.

४) त्यांचे आरोग्यही चांगले राहील.

५) परिणामस्वरूप GENERATION GAP कमी होऊन घरात सर्वीकडे शांतता नांदेल. आई-वडील घरीच राहतील त्यांना वृद्धाश्रमात जाण्याची किंवा त्यांना घालवण्याची वेळ येणार नाही.

असा बदलाची आज प्रत्येकजणच अपेक्षा करत आहे. तेव्हा लवकरात लवकर योग्य तो निर्णय घेवून RETIRED आई-वडिलांची झोपण्याची जागा बदलणे. अन्यथा…

१) संसारातून विरक्त होणार नाहीत परिणामस्वरूप मुलांच्या संसारात कायमस्वरूपी हस्तक्षेप करत राहतील जेणेकरून घरात भांडणाचे प्रमाण वाढेल.

२) GENERATION GAP निर्माण होऊन घरात भांडणे होतील.

३) न जेपवणारी धावपळ, संसाराचे टेन्शन याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावरही होईल ज्यामुळे मुले त्यांचा सांभाळ न करता त्यांना वृद्धश्रमात ठेवण्याचे पसंत करतील.

वास्तूतज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय वास्तूसंदर्भात व वरील उपायांसंदर्भात कोणताही निर्णय घेवू नये. 

अधिक माहिती साठी संपर्क :-
वास्तुशास्त्र / ज्योतिष / रेकी तज्ञ श्री. मनोजकुमार आप्पा मोहिते
इमेल :- vastusiddhii@gmail.com
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhii/
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhi
Calling No. 83698 84338
Whatsapp no. 88280 53505

 

 

 

Leave a comment