पोस्टर आणि पेंटींग्स


१) लिविंग रूम मध्ये पूर्व, ईशान्य किंवा उत्तर दिशेच्या भिंतीवर नैसर्गिक दृश्य दाखविणारे पोस्टर्स लावावे (लांब वाहणारी नदी, हिरवेगार / हिमाच्छादित उंच पर्वत, हिरवेगार निसर्ग, पाण्याचा धबधबा, फुलदाणी इ.)
२) लिविंग रूम मध्ये नैऋत्येच्या भिंतीवर संपूर्ण कुटुंबाचा हसरा फोटो लावावा .
३) बेडरूम मध्ये उत्तरेच्या भिंतीवर राधाकृष्णाचा हसरा फोटो लावावा. दक्षिण भिंतीवर प्रसन्न वाटणारे फोटो लावावेत (मुलांसहित पती-पत्नीचा हसरा फोटो, रंग-बिरंगी फुलं, प्रेम करणारे पक्षी-प्राणी, असे फोटो ज्यामध्ये निळा, लाल कलर असेल. न समजणारे फोटो नको, समजणारे प्रसन्न फोटो हवेत).
४) मुलांच्या बेडरूम मध्ये त्यांचे जे आदर्श आहेत किंवा तुम्हाला तुमची मुलं ज्यांच्या सारखी व्हावीशी वाटत आहेत त्यांचे फोटो दक्षिण दिशेच्या भिंतीवर लावावीत (अब्दुल कलाम, कल्पना चावला, सचिन तेंडूलकर, विवेकानंद, लता मंगेशकर इ).
५) पूजा रूम मध्ये बाळकृष्ण दही खात असतानाचा फोटो उत्तेरच्या भिंतीवर लावावा. गुरुंचे फोटो मंदिराशेजारीच लावावे.
६) लिविंग रूम मध्ये ईशान्येला गाईला वासरू पीत असतानाचे पोस्टर भेटल्यास लावावे.
७) पूर्वज, मेलेल्या व्यक्ती, यांचे फोटो जर त्यांना तुम्ही आदर्श मानत आहात तर ते उत्तर किंवा पश्चिम दिशेच्या भिंतीवर लावावे.
८) लिविंग रूम मध्ये शिवाजी महाराजांचा फोटो (राज्यभिषेक करताना किंवा सिंहासनावर बसलेले) दक्षिण किंवा नैऋत्य दिशेच्या भिंतीवर लावावे.
९) उगवणाऱ्या सूर्याचा फोटो पूर्वेच्या भिंतीवर व मावळणाऱ्या सूर्याचा फोटो पश्चिमेच्या भिंतीवर लावावा.
१०) आरसा पूर्व किंवा उत्तरेच्या भिंतीवरच लावावा (ज्या रुममध्ये लावायचे आहे त्या रूम मध्ये.)
११) जर लावायचाच असेल तर साईबाबांचा किंवा गजानन महाराजांचा मोठा फोटो पूर्व किंवा ईशान्य च्या भिंतीवरच लावावा.
१२) अंगणामध्ये पूर्वेला / उत्तरेला / ईशान्येला छोटे कारंजे लावावे.
१३) वर जाणाऱ्या पायऱ्यांच्या जवळ आकाशात उंच उडणारे पक्षी, विमान यांचे फोटो लावावे. फुलदाणी किंवा फुलांचे फोटोही चालतील.

frame

Cost of above frame is depend on size. So request you, call for Price.

Frame-1

Cost of above frame is depend on size. So request you, call for Price.

वास्तूतज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय वास्तूसंदर्भात व वरील उपायांसंदर्भात कोणताही निर्णय घेवू नये. 

अधिक माहिती साठी संपर्क :-
वास्तुशास्त्र / ज्योतिष / रेकी तज्ञ श्री. मनोजकुमार आप्पा मोहिते
इमेल :- vastusiddhii@gmail.com
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhii/
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhi
Calling No. 83698 84338
Whatsapp no. 88280 53505

 

Leave a comment