शौचघर (Toilet) चुकीच्या दिशेला येत असेल तर काय होईल?


शौचघर (Toilet) साठी उत्तम जागा म्हणजे पश्चिम किंवा वायव्य दिशा. या दिशेला शौचघर (Toilet) आल्यास सकारात्मक आहे.

१) पूर्व दिशेस टॉयलेट आल्यास नकारात्मक आहे.

  • मुलांचे शिक्षण, करिअर disturb होते.
  • या घरातील मुलगा / मुलगी खेळाडू असेल तर national – international level ला पोहोचल्यावर शुल्लक कारणावरून परत माघारी येतो.
  • या घरातील लोकांना समाजात अपमानास्पद वागणूक मिळते.
  • डोळ्यांचे विकार, माणसिक आजारपण, कमरेखालचे (दुखणे-पाय-गुडघे) इ. आजार मागे लागतात.

२) आग्नेय दिशेस टॉयलेट आल्यास नकारात्मक आहे.

  • या घराला पैशाची चणचण सतत भासते. (unproductive expenses) अवास्तव खर्च होणार. (१०० रु येणार आणि २०० रु जाणार).
  • हया घरात आजारपण वाढते, अशा घरातील स्त्रिया जास्त लवकर आजारी पडतात नंतर पुरुष आजारी पडतात.
  • आग्नेय दिशा दुषित झाली आहे यामुळे असं एकही काम नसणार ज्याच्यात अडथळे नाहीत, सहज कामं कधीच होणार नाही. सहज काम कठीण होतात.
  • या घरात आल्यापासून success ratio कमी कमी होणार.

३) दक्षिण दिशेस टॉयलेट आल्यास नकारात्मक आहे.

  • दिशा दुषित होते, अमाप खर्च होतो, आरोग्याची तक्रारी मागे लागतात, special हाडांचा त्रास होतो. जीवनामध्ये अस्थिरता येते, दुप्पट खर्च होतो.

४) नैऋत्य दिशेस टॉयलेट आल्यास नकारात्मक आहे.

  • पैसे अडकणे चालू होते.
  • Private Investment Block होतात.
  • हाडांचे problems सुरु होतात (कोणालाही).
  • पती व पत्नीच्या relationship वर याचा परिणाम होणार. संशय होणे / बाळगणे हे वाढून भांडणं होणार.
  • १० ते १२ वर्षात नाती नावालाच राहणार (पती व पत्नीमधील), तेव्हा काळजी घेणे.

५) पश्चिम दिशेस टॉयलेट आल्यास सकारात्मक आहे.

  • केरकचरा (वेस्ट मटेरीअल) पश्चिमेला जाणे योग्य आहे. घरातील वातावरण चांगले राहते.
  • इतर घरातील आजारांपेक्षा या घरातील आजारपणाचे प्रमाण कमी असणार, त्यामुळे हि लोकं प्रगतीवर जास्त लक्ष केंद्रित करू शकतात.

६) वायव्य दिशेस टॉयलेट आल्यास सकारात्मक आहे.

  • Health चे problems control मधील राहतील.
  • योग्य जागी योग्य वस्तू गेली (कचऱ्याच्या जागी कचरा गेला म्हणून) घराचे वातावरण शुद्ध राहते, अप्रत्यक्ष परिणाम त्या घराच्या प्रगतीवर होत असतो.

७) उत्तर दिशेस टॉयलेट आल्यास नकारात्मक आहे.

  • उत्तर दिशा हि लक्ष्मीची दिशा आहे. आपल्या घरातील तिजोरी व महत्त्वाच्या गोष्टी येथे ठेवतो कारण ती कुबेराची दिशा आहे. अशा घरात पैशाच्या बाबतीत कटकटी चालू होणार.
  • येथे उत्तर दिशा दुषित होते.
  • यांचे पैसे block होणार. उधारीने, मदतीने दिलेले पैसे परत मिळणार नाही, त्यामुळे या घरतील माणूस पैशाच्या बाबतीत नेहमी नाराज असणार.
  • शेअर्स मार्केटमध्ये, private investment मध्ये अजिबात गुंतवणूक करू नये.
  • उत्तर दिशेला टॉयलेट असल्यास खूप प्रचंड आर्थिक फटके पडतात.
  • उत्तर दिशा दुषित झाल्यामुळे पाठ, मान व मणक्याच्या (कमरेचा) त्रास होणार.

८) ईशान्य दिशेस टॉयलेट आल्यास नकारात्मक आहे.

  • देवाच्या दिशेला Toilet आल्याने दिशा दुषित होते. यामुळे घरात आजारपण येते, आजारपणाचे निदान होणार नाही, गंभीर आजार संभावू शकतो. ईशान्येला Toilet म्हणजे आजाराने त्रासलेले घर.
  • देव, देवपूजेच्या बाबतीत या घरात उदासीनता पहायला मिळेल.
  • जर एखादा माणूस धार्मिक वृत्तीचा असेल तर त्याची पूजा त्याला लाभणार नाही. पूजेचे समाधान मिळणार नाही.
  • मुलांच्या शिक्षणावर व करिअरवर विपरीत परिणाम होणार. मुलं अभ्यासाला कंटाळणार. एका जागी बसून अभ्यास करणार नाही. पाठ केलेली उत्तरे लिहायला कंटाळणार. ज्या क्षेत्रात शिक्षण घेतले आहे ते क्षेत्रात नोकरी मिळणार नाही. ज्या विषयाचे ज्ञान असूनही लिहिता येणार नाही. त्यांचा करियर ग्राफ खाली-खाली येणार.

७) ब्रम्हस्थानात टॉयलेट आल्यास नकारात्मक आहे.

  • संकटांची मालिका सुरु होणार, एका पाठोपाठ एक अडचणी सुरु होणार. कर्त्या पुरुषाच्या जीवाला धोका निर्माण होणार.

वास्तूतज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय वास्तूसंदर्भात व वरील उपायांसंदर्भात कोणताही निर्णय घेवू नये. 

अधिक माहिती साठी संपर्क :-
वास्तुशास्त्र / ज्योतिष / रेकी तज्ञ श्री. मनोजकुमार आप्पा मोहिते
इमेल :- vastusiddhii@gmail.com
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhii/
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhi
Calling No. 83698 84338
Whatsapp no. 88280 53505

2 thoughts on “शौचघर (Toilet) चुकीच्या दिशेला येत असेल तर काय होईल?

  1. Rajesh

    We have Western toilet in our bathroom, while sitting on comode we facing towards east. Is correct as per vastu.

    Like

    Reply

Leave a comment