नैऋत्य


SW

नैऋत्य दिशेचा मुख्य दरवाजा :

  • हि आठ दिशांमधील सर्वात वाईट फळं देणारी दिशा आहे. नैऋत्य दिशा म्हणजे एव्हरेस्ट शिखराचा शेवटचा बिंदू. वास्तुशास्त्रातील सर्वात नेगेटिव्ह घर म्हणजे नैऋत्य दिशेचं घर.
  • या घरातील माणसांची मानसिकता सँडवीच सारखी असते, या घरात फक्त दोनचं प्रकारची माणसं दिसतील एक म्हणजे पूर्ण खच्चीकरण झालेला माणूस आणि दुसरा म्हणजे सर्वीकडे वर्चस्व असलेला माणूस. भारधार मिशीची माणसं, बोलण्याला धार असते अशी लोकं सरकार दरबारी चांगली कामं करतात. जीवनामध्ये स्पीड नाही, जीवन संत असते.
  • या घरातील लोकं खूप अस्थिर असतात या घरातील लोकांना खूप शत्रू असतात.
  • या घरातील लोकांसारखं कोणीही कामं करू शकत नाही, कामाचा आवाका खूप असतो, एक दिवसही संकटाविना जात नाही, त्यांचे संकट किंवा दुसऱ्यांची संकटे हि लोकं स्वत:वर ओढवून घेतात, म्हणून येथे धैर्यलक्ष्मीचे वरदान आहे. हि लोकं हिम्मतवाले असतात, या घरातील लोकांना शांतपणे जीवन जगता येतं नाही, सुखाचा उपभोग घेता घेता जे नाही यायला पाहिजे त्याही गोष्टी यांच्या जीवनात येतात. राहू-केतू यांना स्वस्थ बसू देणार नाही. या घरातील लोकांचे स्वत:चे विश्व असते.
  • ५,३,४ चे चक्र यांनाही लागू होते, प्रगती-स्थिरता-अदोगती. दक्षिण दिशेच्या चक्रापेक्षा या दिशेचे चक्र अधिक तीव्र असते.
  • ज्यांना नैऋत्य दिशेचा मुख्य प्रवेशद्वार आहे व ज्यांना नैऋत्य दिशेचा बेडरूम नाही त्यांनी राजकारणात पडू नये, राजकारणात काम करत असतील तर त्यांना खुर्ची मिळणार नाही, त्यांचे जीवन संघर्षमय असते.

सल्ला :

  • राजकारणात पडू नये, पडलं तर हातचं राखून काम करा. करिअर म्हणून राजकारणाकडे बघू नका (समाजकारण, लीडरशिप करू नये).
  • ज्या ज्या वेळी माणसावर बिकट प्रश्न येतो त्या त्या वेळी स्त्रीला पुढे करा. स्त्रियांना प्रोत्साहन द्या, स्त्रियांच्या रीलेटेड काम करा.
  • मेडीटेशन करावे, संयम असणे महत्त्वाचे आहे (मन, शरीर, तोंडावर).
  • या लोकांना शत्रू जास्त होणार आहेत तरी अलर्ट रहा, गुपितं कोणाला सांगू नये.
  • भरकटत जाणे हे यांच्या आयुष्यात होतच राहणार तर अंतर्मुख होणं गरजेचे आहे, कामाचा फिडबॅक घेणे, सिंहावलोकन करणे गरजेचे आहे (मागे घडलेल्या चुकांचा विचार व त्यावर प्रतिक्रिया).

 या घरातील लोकांनी करावयाचे व्यवसाय-नोकरी :

  • कुठलाही विशिष्ठ व्यवसाय नाही, पण स्त्रियांना पुढे ठेवून सर्व झटपट कमाईचे व्यवसाय चालतील, स्त्रियांच्या नावाची पाठी मुख्य प्रवेशद्वारावर लावावी.
  • स्त्रियांसंबंधी वस्तूंचा व्यवसाय करू शकतात (कपडे, ज्वेलरी इ.)

वास्तूतज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय वास्तूसंदर्भात व वरील उपायांसंदर्भात कोणताही निर्णय घेवू नये. 

अधिक माहिती साठी संपर्क :-
वास्तुशास्त्र / ज्योतिष / रेकी तज्ञ श्री. मनोजकुमार आप्पा मोहिते
इमेल :- vastusiddhii@gmail.com
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhii/
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhi
Calling No. 83698 84338
Whatsapp no. 88280 53505

 

Leave a comment