नवीन बांधकाम करण्यासंदर्भातील नियम व सूचना.


  1. ज्या जागेत बांधकाम करायचे आहे ती जागा सर्वप्रथम स्वच्छ करून घेणे. नंतर ईशान्येला भूमिपूजन करणे.
  2. पूर्व-पश्चिम जास्त अंतर सोडून आयताकृती किंवा चौकोन कंपाऊड ची भिंत घालणे.
  3. कोणतेही बांधकाम करताना खोदायचे असल्यास ईशान्येकडून सुरुवात करावी ते आग्नेय-वायव्य कडे जावे नंतर आग्नेय कडून नैऋत्ये कडे व वायव्यकडून नैऋत्ये कडे खोदत जावे.
  4. बांधकाम करताना नैऋत्येकडून सुरुवात करून आग्नेय व वायव्येस यावे तसेच आग्नेय कडून ईशान्य व वायव्येकडून ईशान्यकडे यावे.
  5. बांधकामाचे साहित्य हे पाश्चिम, नैऋत्य व दक्षिणेकडेच ठेवावे. तात्पुरते शेड बांधायचे असल्यास ईशान्य किंवा नैऋत्येलाच बांधावे.
  6. कंपाऊड भिंत व घराची भिंत दक्षिण-पश्चिमेला पूर्व-पश्चिमेपेक्षा जास्त जड व उंच असावी.
  7. जागेच्या नैऋत्य दिशेस आंबा, निम, पपई, सीताफळ, रामफळ, गुलमोहर, अशोकासारखी झाडे लावावी. ईशान्येस तुळस वृंदावन लावावे. पूर्व व उत्तरेस कमी उंचीची फुलझाडं लावावी.
  8. अंडर ग्राउंड वाँटर टँक जागेच्या ईशान्येस व सेप्टिक टँक वायव्येस बांधावे.
  9. दरवाजे व खिडक्या पूर्व-उत्तरेला जास्त व मोठ्या असाव्यात. दक्षिण-पश्चिम दिशेच्या खिडक्या या छोटया असाव्यात. ते सम संख्येत असावेत (२,४,६,८), शून्य हा शेवटचा अंक नसावा.
  10. मुख्य दरवाजा हा इतर दरवाजांपेक्षा मोठा असावा (६.५ X ३) दरवाजाची उंची ही रुंदीपेक्षा दुप्पटीपेक्षा थोडी जास्त असावी. तो जास्तीत जास्त सुशोभित केलेला असावा.
  11. दरवाजा उजव्या हाताच्या भिंतीवर जाणारा असावा तसेच आतील बाजूस दरवाजा व खिडक्या उघडतील असा असावा.
  12. खिडक्या या जमिनीपासून कमीत कमी ३ फुट उंचावर बांधाव्यात.
  13. ओवर हेड वाँटर टँक ही पश्चिमेला असावी.
  14. पायऱ्या या विषम संख्येत असावीत (१,३,५,७….१७,१९).
  15. दरवाजे खिडक्या चौकोनी असाव्यात, लाकडी चौकट असावी.
  16. मिटर किचनच्या बाहेरील भिंतीवर असावा.
  17. दक्षिण-पश्चिमेला उंचवटा व उत्तर-पूर्वेला उतार असावा. पाण्याचा प्रवाह हा ईशान्य दिशेकडे झाल्यास अति उत्तम. छताचा उतारही पूर्व-उत्तरेलाच असावा.
  18. टाँयलेट हे १ फुट जमिनीपासून उंचावर असावे.

अधिक माहिती साठी संपर्क :-
वास्तुशास्त्र / ज्योतिष / रेकी तज्ञ श्री. मनोजकुमार आप्पा मोहिते
इमेल :- vastusiddhii@gmail.com
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhii/
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhi
Calling No. 83698 84338
Whatsapp no. 88280 53505

 

Leave a comment