स्वयंपाक घर


असे असावे किचन….

प्रत्येक घरात किचनला (स्वयंपाकघर) अनन्यसाधारण महत्व असते. किचनमध्ये गृहिणींचे मन गुंतलेले असते. आधुनिक घरांमध्ये प्रशस्त खोलीत किचन थाटले जाते. तेथे फ्रिजर, मिक्सर-ग्राइंडर, ज्यूसर, ओव्हन यांची मांडणी सुलभ केल्यास हाताळणी करणे सोपे जाते.

किचनमध्ये उष्णता नियंत्रित करणे सर्वांत महत्वाचे असते. याचा त्रास गृहिणींना होत असतो. घरातील मंडळी याबाबत जागृत झाली असून उष्णता शोषून घेणारी आधुनिक उपकरणे बसविण्यात येतात. यामुळे उष्णता नियंत्रित होऊन गृहिणींना स्वयंपाक बनविणे आनंददायी होते. यासोबतच वास्तुशास्त्राच्या काही साध्या सूचना पाळल्यास त्यास शास्त्राचा आधारही मिळतो.

किचनसाठी आग्नेय दिशा उपयुक्त मानले जाते. बाथरूप व बेडरूम यांच्या अगदी वर किंवा खाली स्वयंपाकगृह न ठेवल्यास हितावह ठरते. किचनमध्ये हवा खेळती राहणे अत्यावश्यक आहे. खिडक्या शक्यतो पूर्व किवा पश्चिमेकडे असाव्यात. वातावरणात असणारया विधायक शक्ती किवा धागे आकर्षित होण्यास ते फायद्याचे ठरते.

हवा येण्यासाठी उत्तम व्यवस्था असावी. स्वयंपाक करतांना गृहिणींचे तोंड पूर्वेकडे असेल याची दक्षता घ्यावी. पूर्वेकडे तोंड करून स्वयंपाक करणे शुभ मानले जाते. स्वयंपाकाच्या ओट्यावर कपाट वगैरे ठेवू नये. खिडक्या एकमेकांविरूद्ध असल्यास अधिक उत्तम. फ्रिजचे किचनमधील स्थान अढळ आहे. तेव्हा फ्रिज ठेवताना स्वयंपाक घरात वायव्य दिशेस ठेवावे. स्वयंपाकाचा ओटा दक्षिण वा पश्चिमेकडील भिंतीस लागून असावा. एक्झॉस्ट फॅन ईशान्य दिशेस ठेवल्यास ठीक. परंतु, दक्षिण व पूर्व दिशाही यासाठी उपयुक्त आहे.

डायनिंग टेबल किचनमध्येच पश्चिमेकडे ठेवावे. किचन नेहमी स्वच्छ ठेवावे. कचरा किवा कचर्‍याची पेटी स्वयंपाक घरात न ठेवल्यास अतिउत्तम. स्वयंपाकाचा गॅस ओट्याच्या उजव्या बाजूस ठेवावा. आजच्या चोकस गृहिणी किचनच्या रंगसंगतीकडेही चोखंदळपणे लक्ष देतात. रंगसंगती शक्यतो साधी असावी. स्वयंपाक घरातील भिंतींवर निळा किवा पांढरा रंग लावल्यास अतिउत्तम.

वास्तूतज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय वास्तूसंदर्भात व वरील उपायांसंदर्भात कोणताही निर्णय घेवू नये. 

अधिक माहिती साठी संपर्क :-
वास्तुशास्त्र / ज्योतिष / रेकी तज्ञ श्री. मनोजकुमार आप्पा मोहिते
इमेल :- vastusiddhii@gmail.com
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhii/
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhi
Calling No. 83698 84338
Whatsapp no. 88280 53505

5 thoughts on “स्वयंपाक घर

  1. asnok

    सर,

    आपन स्वयपाक घराबद्धल फार छान माहीती दीलात.. त्या बद्धल आम्ही आपले आभारी आहोत.

    Like

    Reply
  2. mmohite Post author

    घर घेताना केव्हाही चार मुख्य बाबी वास्तूशास्त्रानुसार आहेत कि नाही हे बघून घ्याव्यात. त्या बाबी खालीलप्रमाणे लक्षात ठेवाव्यात.

    १) मुख्य दरवाजा.
    २) स्वयंपाक खोली.
    ३) मेन बेडरूम.
    ४) देवघर खोली..

    या चारही बाबी जर बरोबर असतील तर नक्कीच तुम्हाला त्या घराचा फायदाच होईल.

    Like

    Reply
    1. Vastusiddhii Consultant Post author

      नमस्कार,

      स्वयंपाक घर जर उत्तरेला असेल तर त्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात हे खालील लिंक वर दिलेले आहे ते वाचावे.

      https://vastusiddhii.wordpress.com/kitchen-location/

      शक्यतो या ठिकाणचे स्वयंपाक घर शिफ्ट करावे.

      Like

      Reply

Leave a comment