सुखी संसारासाठी काही सोपे घरगुती उपाय


१) मुख्यदरवाजा जेवढा शुशोभित करता येईल तेवढा करावा, मुख्यदरवाजावर कोणत्याही देवी देवताचे फोटो लावू नये, फक्त शुभ चिन्ह लावावेत. उंबरा हा लाकडाचा असावा, नाहीतर मार्बल चा चालेल, मधोमध लक्ष्मीची पाऊले लावून तिची दररोज आतून पूजा करावी तसेच घरात स्वच्छता ठेवावी. मुख्य दरवाजा पूर्ण उघडता येईल असा असावा, दरवाजामागे कॅलेंडर लावू नये तसेच कोणताही अडथळा ठेवू नये. दरवाजा समोर कोणताही अडथळा असू नये. 

२) स्त्रियांनी सकाळी लवकर उठून आंघोळ करून हळद-कुंकू वाहून उंबरठ्याचे पूजन करावे, दोन रंगांची रांगोळी काढावी व नंतर तुळशीला पाणि घालून हळद कुंकू वाहावे आणि नंतरच स्वयंपाक खोलीत जावून पुढच्या कामाला सुरुवात करावी. सकाळ-संध्याकाळ उंबराच्या दोन्ही बाजूला तुपाचा दिवा लाववा (घरात सुख:शांती नांदेल.)

३) स्त्रियांनी सोवळं-ओवळं पाळाव. स्वयंपाक मनापासून करावा. सर्व सण पारंपारिक रित्या साजरे करावे (लक्ष्मी-नारायणाचा वास राहील)

४) किचनच्या ईशान्य कोपऱ्यात मातीचे पाण्याचे भांडे ठेवून त्याच्यातीलच पाणी प्यावे. किचनच्या बेसिनमध्ये रात्री खरकटी भांडी तशीच ठेवू नये.

५) पुरुषांनीच आंघोळ करून घरातील मंदिरातील देव-देवतांची पूजा करावी. मंदिरात कुलदैवत-कुलदेवी, घंटी, गणेशमूर्ती, शंकराची पिंड, लंगडा बाळकृष्ण, शंख, आराध्यदैवत असावे. देवी किंवा देवाचे दोन फोटो किंवा मुर्त्या असू नये. मंदिरात नेहमी तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा (डाव्याबाजूस) व दोन अगरबत्ती (उजव्याबाजूस) लावाव्यात. हप्त्यात एकदा तरी संपूर्ण घरात धूप फिरवावी (देवी-देवतांची कृपा दृष्टी लाभेल).  

६) घरामध्ये देवघर सोडून इतरत्र देवांचे फोटो किंवा मुर्त्या ठेवू नये. देवघर हे नेहमी पूर्व, ईशान्य, उत्तर दिशेतच असावे.

७) पूर्व, ईशान्य व उत्तरेला फुलं झाडं लावावी. सुखलेलं झाड टेवु नये. पूर्व / उत्तर / ईशान्येला तुळस लावून तिची दररोज पूजा करावी. घरात कोणतेही काम करताना पूर्व, ईशान्य व उत्तर दिशेलाच तोंड करावे (कामे होतील).

८) घडयाळ व कॅलेंडर पूर्व, ईशान्य किंवा उत्तर दिशेलाच लावणे.

९) बाहेरून आल्याआल्या लगेचच चप्पला घरात घेवू नये, फ्रेश होवून देवाला नमस्कार करूनच चप्पला आत घ्याव्यात.

१०) घरात कोणाबद्दलही वाईट बोलू नये, नवरा-बायकोंनी भांडू नये. मुलांबद्दल चांगलाच विचार करावा.

११) घरात जुन्या वस्तूंचा साठा (जुन्या न वापरात असलेल्या वस्तू, फाटलेले / जुने कपडे, भंगार, रद्दी इ.) जमा करून टेवू नये, जुने कपडे पायपुसणी म्हणून वापरू नये. बंद इलेक्ट्रॉनिक वस्तू तर लगेच विकून टाकावी किंवा दुरुस्त करावी. कोणताही विजेचे बटन बंद अथवा खराब असू नये (रखडलेली कामे मार्गी लागतील).

१२) सकाळ संध्याकाळ घरात श्लोकांचे पठन करावे. घरात सतत मंत्रोप्चार करणारी मशीन लावावी. थोरांचा आदर करावा, कोणालाही दुखवू नये. आई-वडिलांचा नेहमी आदर करून त्यांची सेवा करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा.

१३) छोटे छोटे उत्सव आनंदाने साजरे करावे, जमेल तशी बचत करावी.

१४) कर्त्यापुरुषाने घरात किंवा ऑफिसमध्ये कोणतेही निर्णय घेताना पश्चिम किंवा दक्षिणेकडे पाठ करूनच बसावे.

१५) मरण पावलेल्या व्यक्तींचे फोटो घरात लावून ठेवू नये, प्रत्येक वर्षी पितृ पक्षामध्ये त्यांची मनोभावे पूजा करावी. जर त्यांचे फोटो लावायचेच असेल तर उत्तर दिशेच्या भिंतीवर दक्षिणेकडे तोंड करून लावावे (त्यांचे आशिर्वाद लाभतील).

१६) वर्षातून एकदा सह-परिवार कुलदेवी-कुलदैवताच्या दर्शनास न चुकता जावून यावे, हे करताना नातेवाईकांना भेट देवू नये (सर्व कुटुंबावर कुलदेव आणि कुलदेवीची छत्र-छाया राहील).

१७) एकदा वास्तुशांती व वर्ष-दोन वर्षातून एकदा सत्यनारायणाची पूजा घालावी.

१८) ब्रह्मस्थानामध्ये बसू अगर झोपू नये, एक्क्लकोंडा वाढेल. शुभकार्यही करू नये.

१९) शुभकार्याच्या निमित्ताने जोडप्यांना घरी बोलावून त्यांचा यथायोग्य स्वागत करून जेवू खावू घालणे, थोरांचे आशिर्वाद घेणे.

२०) कामाचे तसेच खर्चाचे लिखित स्वरुपात नियोजन करावे.

२१) घरात हसत खेळत वातावरण ठेवावे. सर्व कुटुंबाचा हसरा फोटो घरात नैऋत्य दिशेच्या भिंतीवर पूर्व / उत्तरेकडे तोंड करून लावावा. शेजाऱ्यांशी चांगले संबध ठेवावे, सर्वांबरोबर मनमोकळेपणाने राहावे.

२२) व्यवहाराचे निर्णय घेताना शांत डोक्याने घेणे, भावूक होवून नाही.

२३) गोळ्या ओषधांना आग्नेय कोपऱ्यात बॉक्स मध्ये न दिसतील असे ठेवावे.

२४) कोणत्याही प्रकारे घरात पाणी टीबकता कामा नये.

२५) दक्षिण किंवा पूर्वेलाच डोके करून झोपणे.

२६) निर्माल्य घरात जास्तीत जास्त सात दिवसच ठेवावे.

२७) फिश टँक किंवा कारंजे ईशान्य / उत्तेरेलाच असावे.

वास्तूतज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय वास्तूसंदर्भात व वरील उपायांसंदर्भात कोणताही निर्णय घेवू नये. 

अधिक माहिती साठी संपर्क :-
वास्तुशास्त्र / ज्योतिष / रेकी तज्ञ श्री. मनोजकुमार आप्पा मोहिते
इमेल :- vastusiddhii@gmail.com
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhii/
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhi
Calling No. 83698 84338
Whatsapp no. 88280 53505

 

Leave a comment