लिविंग रूम कोणत्या ठिकाणी असावे व कोणत्या ठिकाणी असू नये ?


लिविंग रूम म्हणजे संपूर्ण कुटुंबाचे एकत्र येण्याचे ठिकाण. एकत्र येऊन गप्पा मारणे, एखाद्या विषयावर चर्चा करणे, विचारांची देवाणघेवाण करणे, परिणामस्वरूप निर्णय घेण्यास आधार होणे हाच योग्य ठिकाणी असलेल्या लिविंग रूमचा फायदा. लिविंग रूम हा घराचा आरसा आहे. येथे गप्पा रंगल्या पाहिजेत, योग्यवेळी योग्य निर्णय झाले पाहिजेत.

चुकीच्या ठिकाणी लिविंग रूम असेल तर त्याचा काय परिणाम होतो ते येथे दिशेनुसार मांडत  आहे.

आग्नेय दिशा :- आग्नेय दिशेस लिविंग रूम आल्यास येथे घरातील माणसं खूप कमी वेळ येणार, आल्यास गप्पा होणार नाहीत, गप्पा झाल्यास गप्पा रंगणार नाही, विचारांची देवान घेवाण होणार नाही, म्हणून परिणामस्वरूप कोणत्याही विषयावर लवकर निर्णय होणार नाही किंवा निर्णय घेतले जाणार नाही. तू तू मी मी होणार, त्याच्यामुळे वातावरण तणावपूर्वक असणार.

दक्षिण दिशा :- दक्षिण दिशेस लिविंग रूम आलेल्या लोकांची मते आप-आपल्याला मतांशी ठाम असतात, त्यामुळे कमीपणा घ्यावयास कोणीही तयार होत नाहीत, त्यामुळे माझ्याच मताने निर्णय झालाचं पाहिजे असं प्रत्येक व्यक्तीचं आग्रह असणार, परिणाम स्वरूप निर्णय होणार नाही, घरामध्ये वाद होणार. कमी बोलणं, कामापुरते बोलणं असं घरात वातावरण राहणार. घरातील लोकांमध्ये सुसंवाद काय तर साधा सवांदही होणार नाही. हसत खेळत वातावरण राहणार नाही, घरामध्ये गप्पा होणार नाही.

नैऋत्य दिशा :- नैऋत्य दिशेस लिविंग रूम आल्यास या घरात जेवढे काही सदस्य राहतात त्यांची सगळ्यांची टोकाची मते असणार यामुळे या घरात निर्णय होणार नाहीत. या घरातील लोकांना इतरांकडून शहाणपणा शिकवण्याची वेळ जास्त येणार. चार टोकाची चार माणसं त्यामुळे भांडणाचे, वादाचे प्रमाण वाढणार. लिविंग रूम मध्ये अति गंभीर वातावरण राहणार. गप्पा होणार नाहीत, विचारांची देवाण घेवाण होणार नाहीत. त्यामुळे प्रगतीत अडथळे येणार.

पश्चिम दिशा :- पश्चिम दिशेला लिविंग रूम आल्यास मुलांच्या शिक्षण व करिअर वर परिणाम होतो. येथे घरातील लोकं एकत्र येणार नाहीत त्यामुळे गप्पा रंगणार नाहीत, विचारांची देवाणघेवाण होणार नाहीत,घरात हसत-खेळत वातावरण राहणार नाही, पर्यायाने कोणत्याही विषयावर निर्णय लवकर घेता येणार नाही, निर्णय घेण्यासाठी वेळ लागणार.

वायव्य, उत्तर, ईशान्य आणि पूर्वेला लिविंग रूम आल्यास अतिउत्तम फायदा होतो.

वायव्य दिशा :- वायव्य दिशेला लिविंग रूम आल्यास या घरातील लोकं एकत्र येणार (कुटुंबातील सदस्य), त्यांच्यात चर्चा होणार, गप्पा होणार, सुसंवाद होणार, विचारांची देवाणघेवाण होणार, घरात हसत खेळत वातावरण तयार होणार, पर्यायाने निर्णय घेण्यासाठी मदत होणार.

उत्तर दिशा :- उत्तर दिशेला लिविंग रूम आल्यास या घरातील लोकं एकत्र येणार (कुटुंबातील सदस्य), त्यांच्यात चर्चा होणार, गप्पा होणार, सुसंवाद होणार, विचारांची देवाणघेवाण होणार, घरात हसत खेळत वातावरण तयार होणार, पर्यायाने निर्णय घेण्यासाठी मदत होणार.

ईशान्य दिशा :- ईशान्य दिशेला लिविंग रूम आल्यास या घरातील लोकं एकत्र येणार (कुटुंबातील सदस्य), त्यांच्यात चर्चा होणार, गप्पा होणार, सुसंवाद होणार, विचारांची देवाणघेवाण होणार, घरात हसत खेळत वातावरण तयार होणार, पर्यायाने निर्णय घेण्यासाठी मदत होणार.

पूर्व दिशा :- पूर्वेला दिशेला लिविंग रूम आल्यास या घरातील लोकं एकत्र येणार (कुटुंबातील सदस्य), त्यांच्यात चर्चा होणार, गप्पा होणार, सुसंवाद होणार, विचारांची देवाणघेवाण होणार, घरात हसत खेळत वातावरण तयार होणार, पर्यायाने निर्णय घेण्यासाठी मदत होणार.

वास्तूतज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय वास्तूसंदर्भात व वरील उपायांसंदर्भात कोणताही निर्णय घेवू नये. 

अधिक माहिती साठी संपर्क :-
वास्तुशास्त्र / ज्योतिष / रेकी तज्ञ श्री. मनोजकुमार आप्पा मोहिते
इमेल :- vastusiddhii@gmail.com
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhii/
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhi
Calling No. 83698 84338
Whatsapp no. 88280 53505

Leave a comment