वास्तू शास्त्र हे SCIENCE आहे


https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-9156971681227808
वास्तुशास्त्र म्हणजे नेमके काय? त्यामुळे नेमके होते तरी काय? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. पण समजा आपले डोळे कानाच्या जागी असते, कानाच्या जागी मान असती, नाक गुडघ्यांवर असते तर काय झाले असते? शरीर विकृत दिसले असते. बरोबर ना. वास्तुशास्त्राचेही तसेच आहे. वस्तूची नेमकी जागा, तिची लाभदायकता याविषयीचे योग्य मार्गदर्शन वास्तुशास्त्र करते.

हे शास्त्र वैज्ञानिक आहे. मध्ययुगात सुप्तावस्थेत असलेल्या या शास्त्राला आता एकवीसाव्या शतकात चालना मिळाली आहे. एकाएकी याची चर्चा होण्याचे कारण काय? कारण त्याला चालना मिळण्याची ही वेळ ठरली होती. वास्तुच्या बाबतीत हे शास्त्र फार महत्त्वाचे आहे. देशातील अनेक मंदिरे, प्राचीन, ऐतिहासिक वास्तूंवर या शास्त्राचा प्रभाव आहे. वास्तूंमधील गुणदोषामुळे अनेक चमत्कारिक बाबी घडत असतात, त्याची कारणेही आपण देऊ शकत नाही. एखाद्या मोडकळीस आलेल्या घरात रहाणारा माणूस कोट्यधीश बनतो आणि कोट्यधीश माणसाचे दिवाळे निघते, असे नेमके का होते, हे आपल्याला कळत नाही. याचे कारण वास्तुशास्त्र आहे.

हे शास्त्र म्हणजे कुठले रहस्य नाही. स्पष्ट शब्दात दिलेली उत्तरे आहेत. वास्तूची निर्मिती योग्य पद्धतीने व्हावी यासाठीचे निकष असणारे हे शास्त्र आहे. कारण जीवनात येणारे उतार-चढाव, सुख दुःख हे सगळे वास्तूवरही अवलंबून असते. ब्रह्मांड असेल, नक्षत्रे असतील, ग्रह असतील तर वास्तुशात्रसुद्धा आहेच.

आपण नेहमी पाहतो, काही घरातील कर्ता पुरूष किंवा स्त्रीचा अचानक मृत्यू होतो. काहींच्या घरात नेहमी आजारणपणे चालत असतात. काहींची वंशवेल खुरटलेली असते. काही घरांत नेहमी पती-पत्नीत भांडणे होतात. काहींची मुले दिवटी निघतात. हे सगळे कशामुळे? याचे कारण वास्तुदोष आहे.

तुम्हाला माहितीये? ग्वाल्हेरच्या शिंदे राजघराण्यातील पुरूष साठ वर्षांहून अधिक काळ जगत नाही. हा त्यांच्यातील शरीर दोष नाही. ग्वाल्हेरच्या राजवाड्यात असा कोणता तरी दोष असेल, ज्यामुळे पुरूषाचा मृत्यू लवकर होतो. हा निकष उचलली जीभ लावली टाळ्याला असा नाही. याबाबत वेदात, पुराणातही काही संदर्भ सापडतात. इसवी सन 1480 मध्ये उदयपूरचे राजे कुंभकर्ण यांच्या काळात श्रीमंडन याने वास्तुशास्त्रावर ग्रंथ लिहिला होता. त्यावर 1891 मध्ये राजवल्लभ नावाचे एक पुस्तकही प्रकाशित झाले होते. हे पुस्तक अतिशय मार्गदर्शक मानले जाते. पृथ्वीवरील चुंबकीय प्रवाह, दिशा, सूर्याची किरणे, वाऱ्याची दिशा, गुरूत्वाकर्षण या साऱ्यांचा वास्तुशास्त्रात विचार केल्याचे या ग्रंथात म्हटले आहे. राजवल्लभशिवाय मयशिल्पम, शिल्प रत्नाकर, समरांगण सूत्रधार हे दुर्मिळ ग्रंथही वास्तुशास्त्रासंदर्भात महत्त्वाची माहिती देतात. अथर्ववेद, यजुर्वेद, भविष्य पुराण, मत्स्यपुराण, वायूपुराण, पद्मपुराण, विष्णू धर्मोत्तर पुराण, गर्ग संहिता, नारद संहिता, सारंगधर संहिता, वृहत संहिता यातही वास्तुशास्त्राविषयी बरीच माहिती मिळते.

वास्तुशास्त्र काय सांगते? तर प्रत्येक वस्तूचे स्थान काय आहे, ती कुठे असायला पाहिजे याविषयीचे मार्गदर्शन करते. घरात स्वयंपाकघर दक्षिण पूर्व कोपऱ्यात असावे. पूजेची खोली वा स्थान उत्तर- पूर्व कोपऱ्यात हवे. बेडरूम दक्षिण-पश्चिम कोपऱ्यात हवी. पाहुण्यांची खोली व मुलांची खोली उत्तर पश्चिम कोपऱ्यात हवी. पहिल्या खोलीतील बैठक उत्तर-पूर्व बाजूला हवी. झोपताना डोके दक्षिण वा पूर्वेला हवे. याला काही कारणेही आहेत. पूर्वेला सूर्याचे स्थान आहे. तो स्थिर आहे. दिवसभर थकल्यानंतर आपण झोपतो तेव्हा सूर्याची ऊर्जा आपल्या मेंदूला मिळते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी काम करण्याची शक्ती आपल्यात उत्पन्न होते. जे डोके उत्तर किंवा पश्चिम दिशेला करून झोपतात ते नेहमी आजारी, रोगी, निराश मनःस्थितीत आढळतात.

वास्तुशास्त्राची काटेकोर अंमलबजावणी नवी वास्तू बांधतानाच होऊ शकते. याचा अर्थ सध्या अस्तित्वात असलेली वास्तू या शास्त्रास अनुकूल करता येत नाही, असे नाही. सुख, समृद्धी, समाधान हवे असल्यास घर, दुकान यात अनुकूल बदल केले पाहिजे. त्याचवेळी वास्तुशास्त्र म्हणजे लॉटरीचे तिकिट नाही, हेही लक्षात ठेवले पाहिजे. हे तिकिट लागले की जो धनलाभ होतो, तसाच लाभ लगेचच बदल केल्यानंतर मिळतो असे नाही. तो हळूहळू जाणवू लागतो. अनुकूल वास्तूरचना झाल्यानंतर आपल्य मनात सुख, समाधान या भावना वास करू लागतील. आनंद, उत्साह आपल्या आयुष्यात येतील. नवी ऊर्जा मिळेल. कोणतेही काम हाती घेतल्यास यश लाभेल. हे बदल हळूहळू जाणवतील. वास्तुशास्त्र पाळल्यास ही फळे मिळतील.

वास्तूशास्त्राला हजारो वर्षांचा इतिहास आहे, पण आज समाजातील प्रत्येकजण या विषयाकडे अंधश्रद्धा म्हणून पाहत आहे. त्यांच्याकडून कळत-नकळत का होईना या शास्त्राचा अनादर होत आहे. याच्यामध्ये नुकसान ते आपलेच होणार आहे. आपण जर बारकाईने विचार केला तर हे लक्षात येईल कि, वास्तुशास्त्राला “शास्त्र” म्हणून संबोधतात, शास्त्र म्हणजे त्यामागे सायन्स आलेच. खरंच वास्तुशास्त्रात सायन्स आहे, कोणतीही अंधश्रद्धा नाही.

ज्यांनी वास्तुशास्त्राला शास्त्र म्हणून समजावून घेण्याचा प्रयत्न केला त्यांचा विकासच झाला आहे. आज आपण समाजात प्रत्येक गोष्टीला अवाढव्य महत्त्व प्राप्त करून देतो, सम्नानीत करतो, काही अडचणी आल्या कि उपास-तपास करतो, देव-धर्म करतो, तांत्रिक-मांत्रिक करतो परंतु ज्या वास्तूत (घर असो कि दुकान, कंपनी, कारखाना असो) आपण आपल्या आयुष्याची ७० ते ८० टक्के आयुष्य घालवितो त्या वास्तूकडे मात्र दुर्लक्ष करतो, अशामुळे उद्भवणाऱ्या काही अडचणी मी तुमच्या माहिती साठी खाली मांडत आहे.

१)      घरात नवरा-बायको, सासू-सुना, वडील-मुलगा, बहिण-भाऊ, भाऊ-भाऊ, बहिणी-बहिणी यांचे काही केल्या पटत नाही. घरात ऐकी नसणार, मिळून-मिसळून गप्पा होणार नाही.

२)      मुलं अभ्यासात मागे पडतात, काहीजण हुशार तर असतात परंतु परीक्षेच्या वेळी उत्तरे विसरतात. इच्छेनुसार त्यांची प्रगती होत नाही.

३)      मुले-मुली आई-वडिलांच्या मनाविरोधात / पळून जाऊन लग्न करतात.

४)      मुलीला सासरी सुख लाभत नाही, मुलं होत नाहीत.

५)      कितीही पैसा घरात आणला तरी महिनाअखेरीस पैशाची चणचण निर्माण होते. कितीही मेहनत केली तरी पैशाची आवक काही वाढत नाही. उसने दिलेले पैसे परत मिळत नाही.

६)      पैसा येतो कसा, जातो कुठे काहीही कळत नाही, माणूस कर्जबाजारी होत जातो.

७)      कोणत्याच कामात यश मिळत नाही, तोंडचा घास दुरावला जातो. कामात बढती मिळत नाही, बरोबरीची लोकं पुढे निघून जातात.

८)      आजारपण मागे लागते, खासकरून महिलांना कमी वयातच कंबरदुखी, गुड्घादुखी, हाडांचा त्रास इत्यादीसारखे आजार सोसावे लागतात. पुरुषांना अपचन, GAS, ACIDITY, रक्तदाब इत्यादीसारखे आजार सहन करावे लागतात.

९)      कमी वयातच मुलाचा-मुलीचा / आई-वडिलांचा मृत्यू होतो.

१०)    कोर्ट-कचेर्या मागे लागतात. कामाचे श्रेय मिळत नाही, मान-सम्मान मिळत नाही.

११)   नोकरी-व्यवसायामध्ये यश मिळत नाही. अशा एक ना अनेक अडचणींना वास्तूही कारणीभूत असते. देव-धर्म करू नये असं नाही परंतु वास्तुशास्त्राप्रमाणे घरामध्ये मोडतोड न करता फेर-रचना केल्यास सर्वच चित्र पालटु शकते.

तेव्हा आपले घर वास्तुशास्त्राप्रमाणे बनवून घेऊन जीवनाचा खरा आनंद उपभोगण्यासाठी तसेच तुमची सध्याची वास्तू काय सांगते / दर्शविते हे जाणून घेण्यासाठी खालील नंबर वर संपर्क करावे.

वास्तुशास्त्रासंदर्भात योग्य ते मार्गदर्शन उपाययोजनांसहित दिले जाईल.

वास्तूतज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय वास्तूसंदर्भात व वरील उपायांसंदर्भात कोणताही निर्णय घेवू नये. 

अधिक माहिती साठी संपर्क :-
वास्तुशास्त्र / ज्योतिष / रेकी तज्ञ श्री. मनोजकुमार आप्पा मोहिते
इमेल :- vastusiddhii@gmail.com
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhii/
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhi
Calling No. 83698 84338
Whatsapp no. 88280 53505

37 thoughts on “वास्तू शास्त्र हे SCIENCE आहे

  1. Nilesh

    घरात फिशटैंक कोणत्या खोलीत व कोणत्या दिशेत असावा

    Like

    Reply
    1. Vastusiddhii Consultant Post author

      घरात फिशटँक हा लिविंग रूममध्ये आग्नेय दिशेला ठेवावा. घरात प्रवेश केल्यानंतर एकदम समोर किंवा डाव्या हाताला फिशटँक येईल यासाठी पहिले प्राधान्य द्यावे. आग्नेय दिशा भेटत नसेल तर वायव्य दिशेत ठेवले तरी चालेल.

      फिशटँकमध्ये ८ सोनेरी गोल्ड फिश आणि एक काळा फिश ठेवल्यास चांगला फायदा होईल.

      फिशटँक ठेवताना आजूबाजूला गडबड गोंधळ नाहीना अशी जागा निवडावी.

      वास्तुतज्ञ / ज्योतिषी / रेकी उपासक – श्री. मनोज मोहिते ९९२०१२९६४३

      Like

      Reply
      1. Vastusiddhii Consultant Post author

        नमस्कार,

        तुम्ही मला कधीही फोन करू शकता किंवा whatsapp वर आपण चर्चाही करू शकतो. फोन वर बोलायचं असेल तर अगोदर वेळ ठरवली तर बरं होईल कारण त्यामुळे मला तुमच्याशी व्यवस्थित बोलता यावे यासाठी वेगळा वेळ काढता येईल.

        Like

  2. sushant

    Sir mala maji rooom vikyachi aahey sarv agent la sanghtila aahey pan kon changala giryaik yet nahi aahey me kai karu tey sangha

    Like

    Reply
    1. Vastusiddhii Consultant Post author

      लेट मेसेज बघितल्या बद्दल क्षमस्व.

      मला संपूर्ण details समजून घ्यावी लागेल. मला फोन करा मग आपण बोलू.

      मनोज मोहिते – ८८२८०५३५०५

      Like

      Reply
    1. Vastusiddhii Consultant Post author

      madam, त्यासाठी मला पत्रिका बघावी लागेल. याची फी असेल कारण हे उत्तर काढायला खूप वेळ जातो.

      Like

      Reply
  3. विकास वसंत खांबे

    नमस्कार सर, मला नोकरीत माझ्या यश मिळत नाही. पैसा टिकत नाहि . पगार वाढ मिळत नाहि. उपाय सुचवा.

    Like

    Reply
    1. Vastusiddhii Consultant Post author

      सर, नोकरीत यश का मिळत नाही, पगार वाढत नाही आणि तुमचे भाग्य कशात आहे हे बघावे लागेल. त्यासाठी पत्रिकाचा अभ्यास करावा लागेल.

      पैसा टिकत नाही आणि इतर प्रॉब्लेम साठी तुमचे घर बघावे लागेल.

      वास्तू भेटी दरम्यान जागा बघून त्या जागेची आकृती काढून किती अंतरावर काय असावे याची माहिती दिली जाते. घरात दोष असतील तर त्यावर त्याचवेळेस मोडतोड न करता उपाय योजना सांगितल्या जातात. तुमच्या सर्व समस्यांची उत्तरे उपाययोजनांसहित दिले जातात. या सर्व कामासाठी घरानुसार ३ ते ५ तास वेळ लागतो. तसेच संपूर्ण भेटीचा ५ ते ६ पानी रिपोर्टही एका हप्त्यामध्ये घरपोच पाठवला जातो.

      घर बघितल्यानंतर दोष किती प्रमाणात आहेत त्यानुसार उपाय योजना केल्या जातात, यंत्र लावली जातात. यामध्ये संपूर्ण घराची आणि त्यामध्ये राहणाऱ्या सर्वांची सुरक्षा बघितली जाते.

      Like

      Reply
    2. Vastusiddhii Consultant Post author

      सर, त्यासाठी तुमची पत्रिका बघावी लागेल. तुमच्या नशिबात नोकरीत यश आहे कि व्यवसायात ते बघावे लागेल त्यानुसार उपाय देता येतील.

      पैसे टिकत नाहीत त्यासाठी तुमचे राहते घर वास्तूशास्त्रानुसार बघावे लागेल.

      Like

      Reply
    1. Vastusiddhii Consultant Post author

      वास्तू भेटी दरम्यान जागा बघून त्या जागेची आकृती काढून किती अंतरावर काय असावे याची माहिती दिली जाते. घरात दोष असतील तर त्यावर त्याचवेळेस मोडतोड न करता उपाय योजना सांगितल्या जातात. तुमच्या सर्व समस्यांची उत्तरे उपाययोजनांसहित दिले जातात. या सर्व कामासाठी घरानुसार ३ ते ५ तास वेळ लागतो. तसेच संपूर्ण भेटीचा ५ ते ६ पानी रिपोर्टही एका हप्त्यामध्ये घरपोच पाठवला जातो.

      घर बघितल्यानंतर दोष किती प्रमाणात आहेत त्यानुसार उपाय योजना केल्या जातात, यंत्र लावली जातात. यामध्ये संपूर्ण घराची आणि त्यामध्ये राहणाऱ्या सर्वांची सुरक्षा बघितली जाते.

      कामाच्या स्वरूपानुसार कामाची फी घेतली जाते, अधिक माहिती साठी संपर्क करावा.

      Like

      Reply
  4. sujay shenole

    वडील सारखे आजरीपडतात पैसा येतो कधी जातो कधी कळत नाही

    Like

    Reply
    1. Vastusiddhii Consultant Post author

      सुजय सर, वडिलांच्या आजारपणाचे आणि तुमच्या संपत्तीच्या स्थैर्याचे मुख्य कारण तुमचे राहते घर आणि त्यामध्ये असलेले दोष आहेत. यामधून तुम्हाला सुटका हवी असेल तर तुम्हाला तुमचे घर हे वास्तूतज्ञाला दाखवून त्यावर उपाय योजना करून घेतल्या पाहिजेत.

      पैशांचा थांगपत्ता लागत नाही म्हणजे तुमच्या घरात आग्नेय आणि उत्तर जागेत दोष आहेत. वडील सारखे आजारी पडतात म्हणजे नैऋत्य जागेत हि दोष आहेत.

      आम्ही वास्तू भेटी दरम्यान जागा बघून त्या जागेची आकृती काढून किती अंतरावर काय असावे याची माहिती देतो. घरात दोष असतील तर त्यावर त्याचवेळेस मोडतोड न करता उपाय योजना सांगितल्या जातात. तुमच्या सर्व समस्यांची उत्तरे उपाययोजनांसहित दिले जातात. या सर्व कामासाठी घरानुसार ३ ते ५ तास वेळ लागतो. तसेच संपूर्ण भेटीचा ५ ते ६ पानी रिपोर्टही एका हप्त्यामध्ये घरपोच पाठवला जातो.

      घर बघितल्यानंतर दोष किती प्रमाणात आहेत त्यानुसार उपाय योजना केल्या जातात, यंत्र लावली जातात. यामध्ये संपूर्ण घराची आणि त्यामध्ये राहणाऱ्या सर्वांची सुरक्षा बघितली जाते.

      Like

      Reply
    1. Vastusiddhii Consultant Post author

      संजय सर, नवीन घर होण्यासाठी तुमचे सध्याचे घर मला बघावे लागेल. त्यानुसार तुम्हाला मार्गदर्शन करता येईल.

      मनोज मोहिते – ८८२८०५३५०५

      Like

      Reply
    2. Vastusiddhii Consultant Post author

      त्यासाठी राहते घर वास्तूशास्त्रानुसार काय सांगते हे बघावे लागेल. त्याचबरोबर तुम्हाला एखाद्या गुरुचे मार्गदर्शन हि घ्यावे लागेल. बऱ्याच गोष्टी या राहत्या घरातील वास्तू दोषांवर आणि पत्रिकेतील ग्रह दोषांवर अवलंबून असतात.

      Like

      Reply
  5. Anand Yamjanwar

    सर वास्तु मध्ये पाण्याची टाकी / बोअरींग / वीहिर यासाठी दीशा व परीनाम सांगा

    Like

    Reply
    1. Vastusiddhii Consultant Post author

      घराच्या / प्लॉटच्या पूर्व, ईशान्य किंवा उत्तर दिशेतच पाण्याची टाकी / बोअरींग / वीहिर असावी.

      Like

      Reply
  6. Sachin jangam

    घराच्या बाहेर अंगणात आग्नेय दिशेला बोअर आहे काही मार्गदर्शन मिळेल का

    Like

    Reply
    1. Vastusiddhii Consultant Post author

      हो नक्की, त्यासाठी मला बोअरवेल आग्नेय दिशेलाच आहे कि दक्षिण दिशेला ते बघावे लागेल. याचा दोष लागतो, तो घालवण्यासाठी तुम्हाला बोअरवेल च्या बाजूला रेमेडीजस कराव्या लागतील.

      स्वस्तात जर उपाय करायचे असतील तर बोअरवेलच्या चारी बाजूला तांब्याची पट्टी पुरावी लागेल.

      Like

      Reply
  7. सरदार पाटील

    खेडेगावात रेल्वे डब्याप्रमाणे तसेच एक मेकाला लागून असणाऱ्या घरात मोडातोडीशिवाय वास्तू शास्त्र शक्य आहे काय ? का खेडेगावातील लोकांनी त्याचा विचार करायचाच नाही.

    Like

    Reply
    1. Vastusiddhii Consultant Post author

      शहर असो, गाव असो, घर असो, जमीन असो, ऑफिस असो किंवा कारखाना असो, वास्तुशास्त्र हे प्रत्येकाला लागू होते.

      रेल्वे डब्ब्याप्रमाणे असणाऱ्या वास्तूंमध्ये दिशा विस्तारल्या जातात ज्यामुळे आतील रचनांमुळे वास्तू दोष निर्माण होतात. ते कोणते दोष निर्माण झाले आहेत हे बघून मोडतोड न करता उपाय योजना करता येतात. वास्तुशास्त्रानुसार घरातील सर्व रचना करून वास्तुदोषांंपासून वाचता येऊ शकते.

      Like

      Reply
  8. Priyanka

    Sir new gharat alya pasun potache aajar hotayt
    Sglyana 2 yrs jhale mr mulga sasu bre ahet pn majh hot nahi indiseion bhadn pn khup hotat mala rag khup yetoy
    Agney la kichen besink ahe ajun ky vadtu dosh asel

    Like

    Reply
    1. Vastusiddhii Consultant Post author

      सर्व प्रथम तुम्हाला तुमची जन्मपत्रिका समजून घ्यावी लागेल. त्यामध्ये तुमची प्रवृत्ती कोणती आहे ते समजेल. कोणते उपाय तुम्हाल सूट होतात त्यानुसार आपण उपाययोजना करू शकतो.

      तुमच्या वास्तूत दोष आहे कि नाही हे बघण्यासाठी मला तुमच्या घराचा daigram बघावा लागेल त्यानंतरच मी काही उपाय सुचवू शकतो.

      तुम्ही मला whatsapp वर संपर्क करू शकता.

      धन्यवाद

      Like

      Reply
    1. Vastusiddhii Consultant Post author

      तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
      फोन करण्याच्या अगोदर फक्त whatsapp वर appointment घेणे. म्हणजे मला तुमच्याशी व्यवस्थित बोलता यावे यासाठी वेळ काढता येईल.

      Like

      Reply
  9. vaibhav Dabhokar

    आम्ही गावाला घर भांडह्ला आहे, पूर्व बाजूला मुख्य प्रवेशद्वार आहे, प्रवेशद्वार समोर ४-६ फूट जागा सोडून ४ खांब उभे केले आहेत त्यावर स्लॅप टाकलं आहे, उंबरठा खाली कोणता धातू पुरावा आम्ही आधीच चांदीची पट्टी बनून घेतली आहे ती उंबरठा खाली ठेवली तर चालेल का त्या सोबत अजून कोणता धातू ठेवावा लागेल आणि ठेवताना काही पूजा करावी लागेल का, लागल्यास ती कशी करावी ?

    Like

    Reply
    1. Vastusiddhii Consultant Post author

      नवीन घर घेतले असेल तर वास्तुशांती आणि सत्यनारायणाची पूजा हि करावीच. दोन्ही पूजा एका दिवशी घेऊ नयेत. पूर्वेचा उंबरठा असेल तर तो लाकडाचाच असावा आणि त्या खाली चांदीची पट्टी लावावी.

      Like

      Reply
      1. vaibhav Dabhokar

        धन्यवाद, मोकळी जागा घेऊन घरच बांधकाम आहे.
        आमचं एकत्र कुटुंब आहे , घरातले वस्तू बनघून तुम्ही काही उपाय सांगू शकत का, आणि तुमचे चार्जेस असतील तर ते कित्ती असू शकत.

        Like

      2. Vastusiddhii Consultant Post author

        चैत्र, वैशाख, कार्तिक, माघ आणि फाल्गुन महिन्यातच घर खरेदी करावे किंवा नवीन घराचे काम सुरु करावे. या महिन्यातील शुभ मुहूर्त बघूनच.

        खूप कमी लोकांकडे मला एकत्र कुटुंब पद्धत मला पहायला मिळते, जी आजची काळाची खरचं गरज आहे व्यक्तीच्या र्वांगीण विकासासाठी, असेच रहा.

        नशीबवान असतात ती माणसे ज्यांना संयुक्त कुटुंबाची साथ मिळते.

        वास्तू विसीट कशी असते आणि त्यामध्ये काय केले जाते हे समजून घेण्यासाठी मला प्रत्यक्ष फोन करावे. तुमची requirement मला समजून घ्यावी लागेल.

        Like

  10. Jitendra

    नमस्कार सर
    मी बांधत असलेल्या वास्तु चा जीना दक्षिणेला आहे आणि जिन्या खाली पूर्व मुखी असा वस्तुचा दूसरा दरवाजा आहे. (मुख्य द्वार पूर्वेला आहे) तर दूसरा दरवाजा तुन जिन्या खालुन यावे लागेल ते चालेल का?

    Like

    Reply
    1. Vastusiddhii Consultant Post author

      सर, तुमचा प्रश्न नाही समजला. कृपया घराचा diagram काढून मला whatsapp वर पाठवा आणि त्याचबरोबर तुमचा प्रश्नही पाठवा. मी उत्तर देईन.

      Like

      Reply
  11. सदाशिवरावभाऊ राघू चौरे

    सर मला नवीन किराणा दुकान चालु करायचे आहे मी गुरुवारी चालु करनार परंतु गुरुवारी पौर्णिमा आहे तर चालेल का

    Like

    Reply
    1. Vastusiddhii Consultant Post author

      कोणताही व्यवसाय सुरु करायचा असल्यास प्रथम त्यामध्ये तुम्हाला तुमच्या पत्रिकेनुसार लाभ आणि यश आहे कि नाही ते पहिलं चेक करून घ्यावे कारण योग्य ते मार्गदर्शन न घेता लाखोंची गुंतवणूक करून कोणताही व्यवसाय सुरु करणे हे अति धोक्याचे आहे.

      Like

      Reply

Leave a comment