वास्तुशास्त्रानुसार घररचना कशी असावी?


वास्तुशास्त्रानुसार घररचना

हिंदुधर्मामध्ये उल्लेखलेल्या प्रत्येक शास्त्राला हजारो वर्षांचा शास्त्रशुद्ध इतिहास आहे, आणि ही सर्व शास्त्रे हे फक्त कोणत्या एका ठराविक धर्मासाठी नसून संपूर्ण मानवजातीसाठी आहे हे सर्वप्रथम आपण सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे. वास्तुशास्त्र असो किंवा ज्योतिषशास्त्र, आज समाजातील (खास करून भारतीय) प्रत्येकजण या विषयाकडे अंधश्रद्धा म्हणूनच पाहत आहे. कळत-नकळत का होईना या शास्त्राचा अनादर मोठ्याप्रमाणावर करत आहेत. याच्यामध्ये नुकसान ते समाजाचेच होत आहे यामध्ये काही दुमत नाही. याउलट परदेशातील लोकं आपल्या शास्त्रांचा अभ्यास करून त्यावर शोध लावून त्याचे पेटेंट स्वत:च्या नावावर करून त्यांचा सर्वांगीण विकास करवून घेत आहे.

म्हणून माझी वाचकांना एकच नम्र विनंती आहे कि कोणत्याही शास्त्राला नावे ठेवण्याअगोदर त्याची सत्यता पडताळून पहा, श्रद्धा ठेवा, अंधश्रद्धा कोणावरही ठेवू नका. मगच तुम्हाला समजेल कि शास्त्र किती अचूक गोष्टी सांगत आहे.

आज आपण या सदरात वास्तुशास्त्राचे घरासाठी असलेले काही नियम समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज व्यक्ती त्याच्या आयुष्यातील जवळजवळ ८० ते ९० टक्के आयुष्य हे कोणत्या ना कोणत्यातरी वास्तू मध्ये व्यतीत करत असतो. वास्तू म्हणेज फक्त घरच नाही तर चार भिंतीनी बंदिस्त केलेली जागा म्हणजे वास्तू. मग ते ऑफिस असो, दुकान असो, कारखाना असो, प्रार्थनास्थळे असो, हॉस्पिटल असो किंवा स्वत:चे घर किंवा बंगला असो. व्यक्ती सकाळी घरातून बाहेर पडला ना पडला कि कोणत्या ना कोणत्या तरी वास्तूत जाऊन स्वत:च्या परिवारासाठी अर्थार्जन करत असतो किंवा दिवस घालवत असतो. आपल्या जीवनातील फक्त १० ते २० टक्के वेळच प्रवासात जात असतो याची सर्वांनी नोंद घ्यावी.

तेव्हा जिथे आपल्या आयुष्यावर ८० ते ९० टक्के वास्तूचा प्रभाव पडत असतो तर का नाही ती वास्तू आपण वास्तुशास्त्रानुसार समजून घ्यावी, रहाण्यासाठी बघावी किंवा बांधून घ्यावी.

एका घरात कमीत कमी चार जण राहत असतात, पती-पत्नी आणि त्यांची दोन मुलं. या चारी जणांना एकत्र बांधून त्यांचा सर्वांगीण विकास जर साधायचा असेल तर वास्तुशास्त्रानुसार त्यांनी त्यांच्या राहत्या घराची रचना करणे अत्यंत गरजेचे आहे. घर बघताना किंवा बांधताना मुख्यत: पुढील सहा गोष्टींचा आवर्जून विचार करावा. १) जेथे जागा / घर घेणार आहात त्याच्या आजूबाजूला स्मशान किंवा कोणते प्रार्थनास्थळ नसावे २) घराचा मुख्य दरवाजा योग्य निवडावा ३) घरातील स्वयंपाक घर योग्य जागी असावे ४) घरातील मंदिराची जागा नीट, पवित्र आणि स्वच्छ असावी ५) मुख्य शयनकक्ष, मुलांचे शयनकक्ष व पालकांचे शयनकक्ष योग्य जागी असावे ६) शौचालय योग्य जागीच असावे. बाकींच्या गोष्टींना काही महत्त्व नाही असे नाही पण निदान या सहा गोष्टीतरी वास्तूशास्त्रानुसार करता येतात कि नाही ते बघावे.

  • जेथे जागा / घर घेणार आहात त्याच्या आजूबाजूला स्मशान किंवा कोणते प्रार्थनास्थळ नसावे :- ज्याठिकाणी समाज दु:खी, दिनदुबळा किंवा याचक म्हणून येत असतो त्या ठिकाणी किंवा त्याच्या जवळपास घेतलेल्या कोणत्याही जागेवर विकास करताना खूप अडचणींना सामोरे जावे लागते, काहीवेळा तर असा दोष निर्माण होतो कि तो अशा ठिकाणी असलेल्या घरात अनपेक्षित व्यक्तीबरोबर मृत्यू सारख्या घटना घडवून आणतो, तेव्हा अशी जागा शक्यतो टाळावीच.
  • घराचा मुख्य दरवाजा :- घराचा मुख्य दरवाजा ठरवताना ज्योतिष शास्त्राचा आधार घेतल्यास उत्तम, कारण ज्याच्या नावावर घर आहे त्याला कोणती दिशा शुभ दाखवत आहे त्यानुसार मुख्य दरवाजा निवडल्यास सर्वांगीण विकासाला चांगलीच गती मिळते, नाहीतर पुढील क्रमाने मुख्य दरवाज्याची निवड करावी. पूर्व, ईशान्य, उत्तर, वायव्य, पश्चिम, आग्नेय, दक्षिण. नैऋत्य दिशेचा दरवाजा कधीच निवडू नये. तसं पाहता कोणताच दरवाजा अशुभ नाही जर त्याचे गुणधर्म समजून आपण त्या दरवाजाचा फायदा करून घेतला तर, उदा. पूर्व, ईशान्य दरवाजा असेल तर या घरातील कर्त्या पुरुषाने समाजकारणामध्ये भाग घ्यावा. उत्तरेचा दरवाजा असेल तर कोणतेही कार्य करताना घरातील स्त्रियांचा सल्ला घ्यावा, पश्चिमेचा दरवाजा असेल तर दानधर्म करत मेहनतीचे कोणतेही कार्य करावे, आग्नेय चा दरवाजा असेल तर हॉटेल-ज्वेलरी सारख्या व्यवसायामध्ये नशीब आजमावे आणि वायव्य चा दरवाजा असल्यास मार्केटिंग किंवा फिरतीचा व्यवसाय किंवा नोकरी करावी. मुख्य दरवाजाची उंची हि रुंदीच्या दोन पट पेक्षा थोडी जास्त असावी. दरवाजाला आयहोल नसावा. दरवाजाची चौकट हि लाकडाचीच असावी नाहीतर तर मार्बलची चालेल. घराचा मुख्य दरवाजा जेवढा शुशोभित करता येईल तेवढा करावा. दरवाजावर कोणत्याही देवाचे फोटो किंवा मुर्त्या लावू नयेत. दरवाजावर शुभ चिन्ह लावावेत. दरवाजा उघडताना झाकताना आवाज होणार नाही याची काळजी घ्यावी. दरवाजा घरात उघडणारा असावा. सेप्टीडोअर पूर्ण उघडेल असा असावा.
  •  घरातील स्वयंपाक घर :- प्रत्येकजण धावपळ करत आहे तो विथभर पोटासाठी आणि जर त्या पोटालाच योग्यवेळी योग्य आहार मिळाला नाही तर त्या धावपळीचा काय फायदा. योग्यवेळी योग्य आणि पौष्टिक आहार जर मिळवायचा असेल तर त्यासाठी घरातील स्त्रीला आनंदी आणि उत्साही ठेवणे खूपच गरजेचे आहे. घरातील स्त्री जर आनंदी असेल तर संपूर्ण घर आनंदी असते. त्यासाठी घरातील स्वयंपाक घर जर योग्य दिशेला असेल तर घरातील स्त्रियांना त्यांचे नियमित जीवन जगताना नवा हुरूप मिळतो, ते आनंदाने स्वयंपाक घरातील सर्वे कामे करतात जेणेकरून घरात राहणाऱ्या सर्वांचे आरोग्य चांगले राहते. स्वयंपाक घरासाठी योग्य स्थान म्हणजे आग्नेय. आग्नेय स्थान नसेल भेटत तर दुसरा पर्याय म्हणून वायव्य दिशा निवडली जाते पण त्याबरोबर येणारे दोष जर समजून घेतले तर येथील स्वयंपाक घर जास्त त्रास देत नाही. जेवण करताना स्त्रियांचे तोंड पूर्व, उत्तर किंवा पश्चिम दिशेकडेच जाईल याची काळजी घ्यावी.
  • घरातील मंदिराची जागा नीट, पवित्र आणि स्वच्छ असावी :- घरातील मंदिर आणि त्याची योग्य जागा हा विषय माझ्यासाठी अतिमहत्त्वाचा आहे. यावर या लेखात मला कमी शब्दात काही मांडणे शक्य नाही तरी मी प्रयत्न करत आहे. सर्व जग एका सुपर पॉवर ला मानते जे सर्व ब्रम्हांड चालवते, पण देवाबद्दल धर्माधर्मामध्ये मतभेद आहेत. त्याच सुपर पॉवरला भारतील ऋषीमुनींनी वेगवेगळी नावे दिली आहेत आणि त्याच्यासमोर कृतज्ञता वाहण्यासाठी सांगितलेले आहे. व्यक्तीच्या जीवनात कृतज्ञता गुण वाढीला लागला तर त्याच्या जीवनात येणाऱ्या कोणत्याही संकटावर तो सहजपणे मात करू शकतो. कृतज्ञता म्हणजे माझ्यावर ज्यांनी ज्यांनी ज्या ज्या स्वरुपात उपकार केलेले आहेत त्यांचे मी मन:पूर्वक आभार मानत आहे. माझा गेल्या दहावर्षातील अनुभव हा आहे कि तुम्ही ज्या श्रद्धेने ज्या शक्तीकडे जे काही मागाल, ज्यामध्ये समोरच्याचे किंवा समाजाचे भले असते ते पूर्ण होते. त्यालाच पूजा म्हणतात. हि पूजा सार्थकी लागली पाहिजे त्यासाठी पूजेचे ठिकाणही योग्य असले पाहिजे. मंदिर हे लाकडाचे किंवा सफेद मार्बलचेच असावे. मंदिरावर कळस नसावा. मंदिरातील देव-देवतांची पूजा करताना आपले तोंड पूर्व, ईशान्य, उत्तर किंवा पश्चिम दिशेकडेच गेले पाहिजे याची दक्षता फक्त आवर्जून घ्यावी. पूजा करण्याचे योग्य स्थान म्हणजे घराची ईशान्य दिशा, ईशान्य दिशा नसेल भेटत तर पूर्व किंवा उत्तर दिशेत मंदिर जमिनीवर ठेवूनच मंदिरातील देव-देवतांची पूजा करावी. यापैकी कोणतीच दिशा भेटत नसेल तर माझा काहीहि आग्रह नाही कि घरात मंदिर असावेच. चुकीच्या दिशेला मंदिर ठेवून नको ते संकट ओढवून घेण्यासाठी तुम्ही बाहेर असण्याऱ्या मंदिरात जाऊन योग्य त्या पद्धतीने पूजा करावी. आज बऱ्याच घरात मंदिर असते पण त्यांना घरात मंदिर का ठेवावे किंवा मंदिरातील देवांची पूजा कशी करावी हेच माहित नसते त्यामुळे त्यांना केलेल्या पूजेचा लाभ भेटत नाही. त्यामुळे त्या व्यक्ती पूजा करून काहीच होत नाही हि सर्व अंधश्रद्धा आहे असे विचार समाजात पसरवतात. आणि जे घरातील स्त्रियांना, मुलांना, वडीलधाऱ्या माणसांना योग्य मानसन्मान देत नाहीत त्यांनाही माझे हेच सांगणे कि तुमची सर्व पूजा व्यर्थ जात आहे. घरात मंदिर नसेल तर चालेल पण घरातील सर्वांना एकमेकांनी मानसन्मान देणे खूप गरजेचेच आहे तरच तुमच्या सत्कार्यचे तुम्हाल योग्य फळ मिळेल. मंदिरात आई-वडील आणि गुरूंचे फोटो लावू नयेत. मंदिरात फक्त कुलदेव-कुलदेवी, लंगडा बाळकृष्ण, गणपती बाप्पा, शिवपिंड, अन्नपूर्णा, शंकीन, घंटी, दिवा आणि अगरबत्ती स्टॅन्ड येवढच असावे. एका देवाच्या दोन फोटो-मुर्त्या नसाव्यात. देवाच्या फोटो-मुर्त्या ४ इंचापेक्षा जास्त व तीन इंचापेक्षा कमी नसाव्यात. फोटो-मुर्त्या रेखीव असाव्यात.
  • मुख्य शयनकक्ष, मुलांचे शयनकक्ष व पालकांचे शयनकक्ष योग्य जागी असावे :- व्यक्ती चोवीस तासापैकी कमीत कमी ८ तास झोप घेत असतो. अशावेळी तो अर्धमेल्या अवस्थेत असतो. त्यामुळे तो ज्या दिशेत ज्या जागेत झोपत असतो, त्या दिशेचा त्या जागेचा त्याच्या शरीरावर चांगले वाईट परीणाम होत असतात. व्यक्तीने झोपताना पूर्व किंवा दक्षिण दिशेकडेच डोकं करून झोपावे ज्यामुळे आरोग्य चांगले राहील. कुटुंबातील कर्त्या पुरुषाने घराच्या नैऋत्य कोपऱ्यातील खोलीत झोपावे कारण नैऋत्य दिशा हि व्यक्तीला समर्थ बनवते. नैऋत्य दिशा नसेल भेटत तर अनुक्रमे दक्षिण, आग्नेय किंवा पश्चिम दिशेतील खोलीत झोपण्याची व्यवस्था करावी. जेणेकरून तो व्यक्ती त्याच्या संसारासाठी योग्य ती एनर्जी घेऊन धावपळ करू शकेल. मुलांची झोपण्याची दिशा हि नैऋत्य ठिकाणी कधीच नसावी. मुलांना अनुक्रमे पश्चिम, दक्षिण, आग्नेय किंवा वायव्य दिशेतील खोलीत झोपण्याची व्यवस्था करावी. जेणेकरून ते त्यांच्या करीअरच्या दिशेने योग्य ती वाटचाल करू शकतील. पालकांनी संसारतील लक्ष कमी करून देवधर्माकडे वळावे, शांत जीवन जगावे यासाठी त्यांची झोपण्याची खोली हि उत्तर किंवा ईशान्य दिशेतच असावी.
  • शौचालय योग्य जागीच असावे :- बदलत्या जीवनशैलीचा एक भाग म्हणजे आपण शौचालयाला घरात स्थान देऊन वास्तूदोष ओढवून घेतला आहे. पूर्वीच्या काळी व्यक्ती घरात खात होते आणि बाहेर जाऊन शौच करत होते. आत्ता या उलट चालले आहे. व्यक्ती बाहेर खाऊन येतात आणि घरात शौच करतात. असो, शौचालयाला योग्य दिशा हि वायव्यच आहे, वायव्य दिशा नसेल भेटत तर अनुक्रमे पश्चिम किंवा दक्षिण दिशेतच शौचालय बांधावे. शौचालय हे जमिनीपासून कमीत कमी ६ इंच उंचीवर असावे याची काळजी घ्यावी. शौचालयाला बसल्यानंतर आपले तोंड पश्चिम किंवा उत्तरेकडेच गेले पाहिजे अशा पद्धतीनेच शौचालयाचे भांडे बसवावे. आंघोळीची जागा हि पूर्व, ईशान्य किंवा उत्तर जागेतच असावी.   

घराची / वास्तूची पूर्व, ईशान्य, उत्तर हि दिशा खुली असावी. या जागी खिडक्या किंवा दरवाजे असावेत. आग्नेय-दक्षिण-नैऋत्य दिशा बंद असावी.

जीवनाचा खराखुरा आनंद घ्यावयाचा असेल आणि त्याच बरोबर स्वत:चा सर्वांगीण विकासही करवून घ्यावयाचा असेल तर सर्वांनी संयुक्त कुटुंबासाठी मनापासून प्रयत्न करावेत. एकत्र राहिल्याने आपल्या संस्कृतीचा-सणांचा नवीन पिढीला योग्यरीत्या अभ्यासपूर्ण दर्शन घडवून देता येईल कारण आपल्या आई-वडिलांकडे जे संस्कृतीचे ज्ञान आहे ते कुठल्याच पुस्तकामध्ये वाचून सापडणार नाही आणि तेच ज्ञान आपल्या सर्वांना २१ व्या शतकाकडे यशस्वीरीत्या वाटचाल करण्यासाठी उपयोगी पडणार आहे. आज सर्व जग भारताच्या प्रत्येक संस्कृतीचा आवडीने अभ्यास करत आहे तर मग आपणच का मागे राहू या, चला तर मग, आपल्या भारतीय संस्कृतीला ला जगासमोर आणूया.

घरातील प्रत्येक रचनेसाठी मुख्य दिशा मी लेखात वर उल्लेखलेल्या आहेत आणि त्या दिशा जर भेटत नसतील तर त्यांच्या बद्दल दुसऱ्या दिशांचा उल्लेख केलेला आहे. पर्यायी दिशांचा काय परिणाम होऊ शकतो हे माझ्या वेबसाईट vastusiddhii.wordpress.com वर सविस्तर दिलेले आहे तसेच दिशा कशा बघाव्यात याबद्दलही अगदी सोप्या शब्दात माहिती दिलेली आहे तरी वाचकांनी त्याचा पुरेपूर फायदा करून घ्यावा व स्वत:च्या जीवनाचा सर्वांगीण विकास करावा. इतर शंका-समस्यांसाठी माझ्या वेबसाईट ला भेट द्यावी.

अनुभवाचे बोल :-

वास्तू, ज्योतिष, रेकी आणि आयुर्वेद शास्त्राच्या साहय्याने मी आत्तापर्यंत ईश्वरीय कृपेने आणि माझ्या प्रामाणिक व निस्वार्थी प्रयत्नाने कित्येक असाध्य आजारावर उपाय देऊ शकलो आहे…

  • त्यामध्ये कँसर सारखे आजार असो की मुलं होत नसलेली समस्या असो या सर्वांवर शास्त्रात उपाय दिलेले आहेत.
  • घरातील छोट्या-मोठ्या समस्यांवर यशस्वीपणे उपाय देता आले आहेत.
  • घटस्फोटापर्यंत गेलेल्या केसेस मागे आलेल्या आहेत.
  • ३८ व्या वर्षीही लग्न जमवतता आलेले आहेत.
  • नोकरी-धंद्यामध्ये ही यश देता आले आहे.

थोडक्यात कोणतीही समस्या असो शास्त्राचा पुरेसा अभ्यास केल्यास कोणालाही त्याचे उत्तर सापडू शकेल. मी क्षणोक्षणी शास्त्र जगत आहे त्यामुळे आत्तापर्यंत मला कुठेच काहीही खोटं असे सापडले नाही. फक्त एकच पुन्हा सांगेन, “श्रद्धा आणि अंधश्रद्धा हि वेगळी, श्रद्धा विकासाकडे घेऊन जाईल आणि अंधश्रद्धा हि विनाशाकडे”. तेव्हा जागृत व्हा आणि स्वत:च शास्त्राचा अभ्यास करून विवेकी आणि यशस्वी बना.  

वास्तूतज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय वास्तूसंदर्भात व वरील उपायांसंदर्भात कोणताही निर्णय घेवू नये. 

अधिक माहिती साठी संपर्क :-
वास्तुशास्त्र / ज्योतिष / रेकी तज्ञ श्री. मनोजकुमार आप्पा मोहिते
इमेल :- vastusiddhii@gmail.com 
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhii/
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhi
Calling No. 83698 84338
Whatsapp no. 88280 53505

Leave a comment