स्वयंपाकघर कोठे असावे व कोठे असू नये?


स्वयंपाकघर म्हणजे घराचा आत्मा. घराचा आत्माच जर आनंदी-प्रफुल्लीत असेल तर या घरात आनंदी वातावरण निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. स्वयंपाक घर व स्वयंपाक घरात काम करणारी गृहिणी जर उत्साही आणि निरोगी राहिली तर या घराची प्रगती कोणीही थांबवू शकणार नाही.

परंतु आजच्या प्रगत युगात इतरांची सोडा पण स्वत:ची प्रगती करायची असेल तरी तो साधता येत नाही कारण आज बहुतेक ९० % लोकांचे स्वयंपाक घर हे आग्नेयला नसते.

आग्नेयला स्वयंपाक घर नाही म्हणजे येथे घराचा दुसरा कोणतातरी भाग आलाच शिवाय कोणत्यातरी भागात स्वयंपाक घर गेलेच म्हणजे दोन्ही ठिकाणी वास्तुदोष निर्माण झाला.

स्वयंपाकघर कोणत्या दिशेला असावे व कोणत्या दिशेला असू नये? तसेच त्याचे काय परिणाम होतात हे खाली मांडत आहे.

आग्नेय दिशा :- आग्नेय दिशेला स्वयंपाकघर येत असेल तर सर्वात उत्तम.    

  • आग्नेय दिशेस स्वयंपाकघर आपल्यास सकारात्मक आहे, अशा घरातील लोकांची प्रगती चांगली होते.
  • आग्नेय दिशा हि प्रगतीची / गतीची दिशा आहे. माणसाच्या जीवनाला वेग देते, जो माणूस गतिमान असतो तोच प्रगती करतो. उत्तरोत्तर प्रगती करतात (Success Ratio चांगला असतो).
  • अशा घरात अन्नाचा तुटवडा होत नाही. या घरात येणारा माणूस समाधानाने जेवून जातो / समाधानी होऊन जातो.
  • अशा घरातील स्त्री कोणतेही काम करताना उत्साही राहते, जेवण चांगलेच होते.

दक्षिण दिशा :- दक्षिण दिशेस स्वयंपाकघर आल्यास नकारात्मक आहे.

आग्नेयला स्वयंपाकघर नसल्यास common होणारे परिणाम

  • अशा घरात स्त्री उत्साही राहणार नाही, स्वयंपाकघरात काम करताना as a duty म्हणून काम करणार.
  • सर्व स्त्रिया तणावाखालीच स्वयंपाकघरात काम करणार, As a duty म्हणून स्वयंपाकघरात काम करणार.
  • स्त्रियांचे प्रभुत्व या घरामध्ये वाढत जाणार, दक्षिण दिशा हि स्थिरत्वाची असल्यामुळे त्याचा फायदा स्र्तीला होणार.
  • हाडांचे problems चालू होणार (कोणालाही) याचा अर्थ दक्षिणेला स्वयंपाकघर म्हणजे आजाराला आमंत्रण.
  • दक्षिण दिशेस स्वयंपाकघर असल्यामुळे वास्तू दुषित होते, दुषीताचे परिणाम होतील.
  • अशा घरात पैसा टिकणारच नाही. ज्या कामाला १०० रु खर्च होणार असेल तिथे २०० रु खर्च होणार.

नैऋत्य दिशा :- नैऋत्य दिशेस स्वयंपाकघर आल्यास दिशा दुषित होते.

  • अशा घरात स्त्रियांचे प्रभुत्व जास्त असणार (स्त्री रनरागिणी असणार), या घरातील स्त्री जेथे जेथे जाणार तेथे तेथे स्वतःचे प्रभुत्व स्थापित करणार. सिंह राशीचा पुरुष या घरात असेल तर या घरात नेहमी भांडणं होणार.
  • अशा घरातील स्त्रियांचे निर्णय चांगले होतात, स्त्रियांच्या निर्णयाने काम केल्यास प्रगती होणार नाहीतर अदोगती.
  • अशा घरातील स्त्रियांची कामे होत नाहीत, स्वयंपाकघरातील कामे कधी होणारच नाही.
  • अशा घरातील लोकांचे पैसे अडकणार, कोणाला कर्ज दिले असतील तर ते परत मिळणार नाही.
  • अशा घरातील लोकांनी पैसे देताना १० वेळा विचार करावा, नाहीतर देऊ नये. जर हि लोकं पैसे मागायला जाणार तर नाती खराब होणार / नाती तुटणार.
  • अशा घरातील लोकांना हमखास हाडांचे आजार मागे लागणार (पाठ, मन, कंबर).
  • नैऋत्य दिशेस स्वयंपाकघर म्हणजे आजाराला आमंत्रण.
  • अशा घरातील लोकांनी स्त्रियांच्या मतानी निर्णय घ्यावा.
  • अशा घरातील लोकांनी पैसे कोणालाही देऊ नये. (share, market, private investment मध्ये पैशाची गुंतवणूक करू नये)
  • जर एखाद्याला पैसे द्यावयाचे असतील तर एवढेच द्या कि जे परत नाही मिळाले तरी चालतील.
  • अशा घरातील लोकांना हाडांचे आजार होतात, योगा किंवा physiotherapy करा, गोळ्यांनी आजार बरे नाही होणार.

पश्चिम दिशा :- पश्चिमेला स्वयंपाकघर आल्यास नकारात्मक आहे.

  • अशा घरातील लोकांना प्रत्येक ठिकाणी डबल कामे करावे लागतात.
  • अशा घरातील लोकांचे कामाचे शेड्युल्ड खूप व्यस्त असते (कामाच्या ठिकाणी).
  • असिस्टंटने काम केले तर ते काम अशा घरातील लोकांना परत करावे लागते.

वायव्य दिशा :- वायव्य दिशेला स्वयंपाकघर आल्यास नकारात्मक आहे.

  • अशा घरात जेवण फुकट जाण्याचे प्रमाण जास्त.
  • अशा घरात बाहेरून, हॉटेल मधून जेवण आणून खाण्याचे प्रमाण जास्त असते.
  • अशा घरात विसंवाद जास्त होतात (Communication Gap).
  • अशा घरातील लोकं एकमेकांना समजून घेण्यात कमी पडतात, चुकीच्या समजामुळे (गैरसमजामुळे) घरात भांडणे होतात.
  • अशा घराला जेलसीचा त्रास लागतो, इतर लोकांचा घराकडे बघण्याचा दृष्टीकोन चांगला राहणार नाही.
  • अशा घरातील लोकांचे शेजाऱ्यांशी संबंध चांगले राहत नाहीत.
  • जर या घरातील Cuts, Kitchen व Under Ground Water Tank वायव्येलाच आल्यास (हे तीनही दोष आल्यास) इतरांशी, शेजाऱ्यांशी संबंध चांगले राहत नाहीत (त्या पूर्ण विंगची घरे)
  • तीनही वास्तूदोष झाल्यास कोर्टकचे-या मागे लागतात.

उत्तर दिशा :- उत्तर दिशेला स्वयंपाकघर आल्यास नकारात्मक आहे.

  • अशा घरात पैसे टिकणारच नाहीत, कारण उत्तर दिशा हि पैशाच्यासंबंधी आहे. पैशाच्या ठिकाणी अग्नी आल्याने पैसा अक्षरशा जाळला जातो.
  • अशा घरात खर्चावर Control करता येत नाहीत.
  • अशा घरातील स्त्रिया स्वयंपाकघरात as a duty म्हणून काम करतात, त्यांना कोणत्याही कामात उत्साह वाटणार नाही.
  • अशा घरात पैसा येतो कोठून, जातो कोठे काहीही लक्षात येणार नाही.
  • अशा घरात अवाढव्य खर्च होतात, पैशाच्या बाबतीत out of control असतात.
  • अशा घरात पैशाच्या बाबतीत नेहेमी रडगाणं चालू असतात.
  • अशा घरातील लोकांनी शेअरमार्केटमध्ये जाऊ नये, पैसे दुबण्याचा प्रमाण जास्त असते, कोणालाही उधारी पैसे देऊ नयेत.
  • अशा घरातील लोकांनी पैशाची investment करू नये, जर केलीस तर government सेक्टर मध्येच करावीत.
  • पैसे कोणालाही दिल्यास वा invest केल्यास पैसे return मध्ये part-part मध्ये येतात.
  • पैसे invest करताना अतिदक्ष असावे.
  • उत्तरेचे स्वयंपाकघर घरामध्ये आजारपण आणते. पाठ, मान, कंबर असे आजार हाडांच्या related problems सुरु होतात.

ईशान्य दिशा :- ईशान्य दिशेला स्वयंपाकघर आल्यास नकारात्मक आहे.

  • असे घर ज्या लेवलला असेल तेथून त्यांची प्रगती खाली-खाली जाते.
  • प्रगतीचा ग्राफ हा नेहेमी खाली जातो.
  • अशा घरातील लोकांना देवपूजेत रस नसतो.
  • अश घरातील लोकांच्या मागे Health problems लागतात.
  • अशा घरातील मुले शिक्षणात मागे पडतात.
  • अशा घरातील लोकांना शिक्षणात रस राहत नाही.
  • अशा घरातील लोकांना देवपूजेत मन लागत नाही, यांच्यात देवपुजेविषयी उदासीनता दिसून येते.
  • अशा घरातील मुलं अभ्यासाला बसणार नाहीत, अभ्यास करण्यासाठी कंटाळा करतात.
  • अभ्यास करताना एका जागी बसत नाहीत. पाठांतर करण्याच कंटाळा करतात, पाठ केलेले लक्षात राहत नाही.
  • पाठ केलेली उत्तरे पेपरमध्ये लिहिण्याचा कंटाळा करतात, यामुळे शिक्षणात problems येतात, करियरमध्ये गडबड होते.
  • ज्या क्षेत्रात शिक्षण झाले आहे त्याला त्या क्षेत्रात नोकरी मिळत नाही.
  • ज्या दर्जाचे शिक्षण घेतले आहे, त्यापेक्षा कमी दर्जाची (संधी) नोकरी मिळते.
  • अशा घरात गंभीर आजार होऊ शकतो, डॉक्टरकडे गेल्याशिवाय (सतत) चैन पडत नाही. आजाराचे निदान लवकर होत नाही, त्यामुळे हे घर आजाराने पछाडलेलं असते.
  • स्वयंपाकघरात काम करताना स्त्रियांना उत्साह वाटत नाही.
  • अशा घरातील स्त्रिया सतत दबावाखाली काम करतात, as a duty म्हणून काम करतात.

पूर्व दिशा :- पूर्वेला स्वयंपाकघर आल्यास नकारात्मक आहे.

  • अशा घरातील लोकांना समाजात मान-सन्मान मिळत नाही. यांचा जाणून-बुजून अपमान होतो.
  • अशा घरातील लोकांना डोळ्यांचे विकार, कमरेखालचे पाय, मंड्या, गुडघे यांचे दुखणे मागे लागतात.
  • अशा घरातील लोकं कामे करतात पण त्यांना कामाचे समाधान मिळत नाही.
  • अशा घरातील स्त्रियांना कोणतेही काम करताना उत्साह वाटत नाही, as a duty म्हणून काम करतात.
  • पूर्व दिशा जर block झाली तर अशा घरातील लोकांना मानसिक आजारपण व पायाचे दुखणे मागे लागते.

वास्तूतज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय वास्तूसंदर्भात व वरील उपायांसंदर्भात कोणताही निर्णय घेवू नये. 

अधिक माहिती साठी संपर्क :-
वास्तुशास्त्र / ज्योतिष / रेकी तज्ञ श्री. मनोजकुमार आप्पा मोहिते
इमेल :- vastusiddhii@gmail.com
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhii/
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhi
Calling No. 83698 84338
Whatsapp no. 88280 53505

 

 

Leave a comment