राशी नुसार वापरण्याचे रत्न व उपरत्न


राशी नुसार वापरण्याचे रत्न व उपरत्न

१) मेष

मेष राशीच्या व्यक्ती कर्तबगार व लढाऊ वृत्तीच्या असतात. त्यांच्यात जबर इच्छाशक्ती आणि आत्मविश्वास असतो. मार्गात येणाऱ्या प्रत्येक अडथळ्यावर ते मात करू शकतात. त्यांना अधिकार गाजविण्याची आवड असते. ह्या व्यक्ती आपआपल्या field मध्ये नेतृत्व करत असतात. हि राशी मंगळाच्या आधिपत्याखाली येत असून त्यांनी माणिक हे रत्न वापरावे.

मेष राशीसाठीचे उपरत्न – अमेथीस्ट, सीत्रीन, गार्नेट, जस्पर व हिरा

आयुर्वेद ज्योतिषशास्त्राप्रमाणे मेष राशीचा अमलात डोके, कवटी हे अवयव येतात. डोकेदुखी असल्यास रेड कोरल, जस्पर डोक्यावर ठेवल्यास डोकेदुखी नाहीशी होते.

२) वृषभ

वृषभ राशीच्या व्यक्ती नियोजन बद्ध व शिस्तबद्ध्तेने काम करणारे असतात. कलाप्रेमी आणि संसारिक कार्यात दक्ष असतात. गायन, संगीत, वाद्य ह्या सारख्या कलेकडे ओढ असणारे, आपल्या बुद्धीचा व शक्तीचा योग्य वापर करणारे असतात. ह्या व्यक्ती णे त्यांचा संथपणा व आळस झटकल्यास यश मिळतो.

वृषभ राशी हि शुक्राच्या आधिपत्याखाली येत असून त्यांना उपरत्न म्हणून – जेड, Aquamarine, Onex, लॅपीझ हे वापरावे.

आयुर्वेद ज्योतिषशास्त्राप्रमाणे वृषभ राशीचा अमलात गळा, घसा व मान हे अवयव येतात. घसा दुखत असल्यास Aquamarine क्रिस्टल घशावर ठेवल्यास दुखणे दूर होते.

३) मिथुन

मिथुन राशीच्या व्यक्ती चांगल्या वक्ता असतात. ह्या व्यक्ती बुद्धिमान, उत्तम कल्पनाशक्ती व स्मरणशक्ती असणाऱ्या असतात. मात्र निष्काळजीपणा, एकाच वेळी अनेक कामात लक्ष घालणे हे त्यांचे अवगुण आहेत.

हि राशी बुधाच्या अधिपत्याखाली येत असून त्यांनी उपरत्न म्हणून Aquamarine, Citrine, Yellow Sapphire, Carnemian, Green Quartz वापरावे.

आयुर्वेद ज्योतिषशास्त्राप्रमाणे मिथुन राशीच्या अमलात हात, बोटे, मज्जासंस्था, फुफ्फुसे हे अवयव येतात. श्वसनात त्रास झाल्यास Rutilated Quartz आपल्या छातीवर ठेवणे, आराम मिळतो.

४) कर्क

कर्क राशीच्या व्यक्ती दयाळू, सहृदय, दुसर्यांना नेहमी मदत करणारे असतात. ते गृहकृत्यदक्ष, घरगुती कामामध्ये निपुण असतात. ह्या व्यक्तींनी प्रमाणापेक्षा दयाळूपणा, हळवेपणा ह्या गुणांना आटोक्यात आणल्यास त्यांना यश प्राप्त होईल.

हि राशी चंद्राच्या अधिपत्याखाली असून त्यांनी उपरत्न म्हणून Aventurine, Pearl, Opal, Emerald व Moonstone वापरावे.

आयुर्वेद ज्योतिषशास्त्राप्रमाणे कर्क राशीच्या अमलात छाती, पोट, प्रजननशक्ती हे अवयव येतात. पोटदुखी झाल्यास Agate Crystal आपल्या पोटावर ठेवावे.

५) सिंह

सिंह राशीच्या व्यक्ती प्रचंड आत्मविश्वास व महत्त्वाकांशी असतात. त्यांना नेतृत्वाची आवड असते. ह्या व्यक्ती अधिकाराच्या जागा भूषविणारे, ध्येयवादी व अहंकारी असतात. कुटुंबाची व इतरांची जबाबदारी सांभाळणारे असतात. ह्यांचे अवगुण म्हणजे त्यांचा अहंभाव, स्वताच्या तोऱ्यात राहणे, खोलवर विचार न करणे. ह्या गोष्टींची त्यांनी काळजी घ्यावी.

हि राशी सूर्याच्या अधिपत्याखाली असून त्यांनी उपरत्न म्हणून Amber, Carnelian, Citrine, Ruby, Sunstone, Diamond, Green Quartz वापरावे.

आयुर्वेद ज्योतिषशास्त्राप्रमाणे सिंह राशींच्या अमलात हृद्य, पाठीचा मणका मज्जारज्जू हे अवयव येतात. कारनेलीयन crystal आपल्या पाठीच्या खालील भागावर ठेवल्यावर पाठदुखी निघून जाते.

६) कन्या

कन्या राशीच्या व्यक्ती चिकित्सक, व्यवहारी व टीकाकार असतात. ते हिशेबीवृत्ती व व्यापारवृत्तीचे असतात. त्यांच्या आत्मविश्वासाचा अभाव असतो. त्यांचा IT, Marketing व Accountancy कडे कल असतो. त्यांना नीटनेटकेपणाची आवड असते.

हि राशी बुधाच्या अधिपत्याखाली असून ह्यांनी उपरत्न म्हणून Citrine, Carnelian, Jade, Opal व Peidot वापरावे.

आयुर्वेद ज्योतिषशास्त्राप्रमाणे कन्या राशीच्या अमलात पोट मज्जातंतू, आतडी, पचनसंस्था इ. अवयव येतात. मज्जातंतू स्थिर होण्यासाठी Green Quartz Smoky Quartz Crystal आपल्या पोटाच्या खालच्या भागावर ठेवावे.

७) तूळ

तूळ राशीच्या व्यक्ती मोहक व्यक्तिमत्त्वाच्या असतात. त्यांना लोकांत मिसळायला आवडत. सदा आनंदी असतात. रसीक व कलात्मक दृष्टीकोन असतो. ह्या व्यक्तींनी भावनावर नियंत्रण ठेवावे, प्रमाणापेक्षा जास्त विश्वास कोणावर ठेवू नये.

हि राशी शुक्राच्या अधिपत्याखाली असून त्यांनी उपरत्न म्हणून Smoky Quartz, White Opal, Aquamarine, Aventurine, Peridot, Malachite Turquoise वापरावा.

आयुर्वेद ज्योतिषशास्त्राप्रमाणे तूळ राशीच्या अमलात कमर, मणके, मूत्रपिंड व गर्भाशय हे अवयव येतात. मूत्राशयाचा संसर्ग (Bladder Infection) झाल्यास त्या points वर Blood Stone Crystal ठेवणे.

८) वृश्चिक

वृश्चिक राशीच्या व्यक्ती मेहनत, फटकळ व संतापी असतात. त्यांच्यात जबरदस्त अशी इच्छाशक्ती व आत्मविश्वास असतो. हे गुप्त कारस्थाने करणारे असतात. त्यांचा गुप्तहेर, गुप्तवार्ता विभाग, मेडिकल, पत्रकारीता या व्यवसायाकडे कल असतो. ह्या व्यक्तींनी दुसऱ्यावर टिका करणे व स्वत:वरची टिका कबुल करून शिकायला हवे.

हि राशी मंगळाच्या अधिपत्याखाली असून त्यांनी उपरत्न म्हणून Red Coral, Garnet, Carnelian, Red Jasper, Aquamarine, Malacite, Turquoise, Jade, Green Tourmaline, Obsidian हे रत्न वापरावे.

आयुर्वेद ज्योतिषशास्त्राप्रमाणे वृश्चिक राशीच्या अमलात गुद्दाद्वार, गुप्तेन्दीर्यांचा बाह्य भाग, अंडकोष हे अवयव येतात. मासिक स्त्राव संबंधीत गोष्टीसाठी जेड Crystal आपल्या पोटावर ठेवणे.

९) धनु

धनु राशीच्या व्यक्ती साहसी, धैर्यवान व महत्त्वाकांक्षी असतात. त्यांना प्रवासाची आवड असते. ह्या व्यक्ती भारदस्त व्यक्तिमत्त्वाच्या, नम्र व समंजस असतात. प्रवासी संस्था, मार्गदर्शक, सांस्कृतिक कार्य विभाग याकडे कल असतो.

हि राशी गुरूच्या आधिपत्याखाली असून त्यांनी उपरत्न म्हणून Lapis, Amethyst, Malachite, Jasper, Agate, Yellow Sapphier वापरावे.

आयुर्वेद ज्योतिषशास्त्राप्रमाणे धनु राशीच्या अमलात नितंभ, मांड्या, मांड्यांचे स्नायू व रक्तवाहिन्या हे अवयव येतात. HIP Problem साठी जेड वापरावा.

१०) मकर

मकर राशीच्या व्यक्ती चतुर हिशेबी व काटकसरी असतात. ते मेहनती व महत्त्वकांक्षी असतात. सुखासाठी अति मेहनत घ्यावी लागते. चिकित्सक व व्यवहारी, दृष्टीकोन असतो. ह्या व्यक्ती आपल्या भावनांना अगदी खाजगी ठेवतात. ह्या लोकांनी आपला अहंकार, स्वार्थीवृत्ती बाजूला ठेऊन समाजात मिसळावे.

हि राशी शनीच्या आधिपत्याखाली असून ह्यांनी उपरत्न म्हणून Lapiz, Amethyst, Onex, Blue Sapphire, Moonstone वापरावा.

आयुर्वेद ज्योतिषशास्त्राप्रमाणे मकर राशीच्या अमलात गुडघे, हाडे, सांधे, त्वचा, हाडांचा सापळा हे अवयव येतात. गुडघे दुखी साठी Azurite Crystal वापरावा.

११) कुंभ

कुंभ राशीच्या व्यक्ती हुशार, तत्वज्ञानी, उत्तम स्मरणशक्ती असणारे व स्वतंत्र विचारसरणीचे असतात. ते व्यवहारचतुर, शांत, धीमीवृत्ती, निस्वार्थी व चिंतामग्न असतात. ह्या व्यक्तींनी आळस व निराशावृत्ती सोडावी.

हि राशी शनीच्या अधिपत्याखाली असून त्यांनी उपरत्न म्हणून Turquoise, Malachite, Jade, Lapis, Blue Sapphire, Aquamarine वापरावे.

आयुर्वेद ज्योतिषशास्त्राप्रमाणे कुंभ राशीच्या अमलात पायाच्या पोटर्य, त्वचा हे अवयव येतात. पाय दुखत असल्यास Hematite Crystal वापरावे.

१२) मीन

मीन राशीच्या व्यक्ती अतिशय संवेदनशील व आध्यात्मिक वृत्तीच्या असतात. ह्या व्यक्ती स्वप्नाळू, कल्पक, क्षमाशील, दानशूर व परोपकारी वृत्तीचे असतात. ह्यांच्यात आत्मविश्वास व धडाडी कमी असते. ह्या व्यक्तींना आपला आत्मविश्वास व धडाडी वाढवली पाहिजे. दयाळूपणा व स्वप्नाळूवृत्तीचा त्याग केला पाहिजे.

हि राशी गुरूच्या आधिपत्याखाली असून ह्यांनी उपरत्न म्हणून Yellow Sapphire, Citrine, Blue Sapphire, Amehyst, Blood Stone वापरावे.

आयुर्वेद ज्योतिषशास्त्राप्रमाणे मीन राशीच्या अमलात तळपाय, घोटा हे अवयव येतात. पायदुखीचे problem असल्यास Onex Crystal वापरावा.

वास्तूतज्ञांचा-ज्योतिषतज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय वास्तूसंदर्भात-ज्योतिषसंदर्भात व वरील उपायांसंदर्भात कोणताही निर्णय घेवू नये. 

अधिक माहिती साठी संपर्क :-
वास्तुशास्त्र / ज्योतिष / रेकी तज्ञ श्री. मनोजकुमार आप्पा मोहिते
इमेल :- vastusiddhii@gmail.com
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhii/
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhi
Calling No. 83698 84338
Whatsapp no. 88280 53505

Leave a comment