वास्तुदोष दूर करा


घरातील वस्तूंना बदला, वास्तुदोष दूर करा

वास्तूला अनुकूल बनविण्यासाठी वास्तुशास्त्र आपल्याला उपयोगी पडते. वास्तुदोष असल्यास घरात अनेक अडचणी, संकटे, दुःख, निराशा यांचे राज्य असते.

घरातील माणसे या दोषामुळे हवालदिल झालेली असतात. अशावेळी या वास्तुशास्त्राचे बोट धरून गेल्यास सुख, समृद्धी, समाधान घरात नांदते. म्हणून या शास्त्राचा कर्ता भगवान विश्वकर्मा याने हे शास्त्र आपल्या हवाली करून आपल्या जगण्याचा मार्ग सोपा केला आहे.

आधुनिक फ्लॅटसंस्कृती आता सगळीकडेच पसरली आहे. कप्पेबंद अशा या व्यवस्थेत वास्तू आपल्या आवडीनुसार, गरजेनुसार वा आपल्याला अनुकूल अशी असतेच असे नाही. अनेकदा त्यात वास्तुदोष असल्याचे समजल्यानंतर तिला अनुकूल बनविणे शक्य नसते. पैशांचा अभाव वा वास्तूची रचना ही त्याची कारणे असतात. पण अशावेळी निराश होण्याचे कारण नाही.

घरातील सामान, वस्तूंच्या जागा बदलून आपण वास्तुदोष काही मर्यादेपर्यंत नक्कीच कमी करू शकते. उदाहरणच घेऊ. वास्तुशास्त्रानुसार आग्नेय दिशेला स्वयंपाकघर हवे. तसे नसल्यास अग्नी आपल्याला अनुकूल रहात नाही.या परिस्थितीत घरातील फ्रीज, टीव्ही या इलेक्ट्रॉनिक वस्तू या दिशेला ठेवून आपण ती दिशा अनुकूल करून घेऊ शकतो. घराच्या पूर्व व उत्तर दिशेला काहीही ठेवायला नको. त्या रिकाम्या राहायला हव्यात. पण ते शक्य नसल्यास पूर्व वा उत्तर दिशेला ठेवलेल्या वस्तूच्या दीडपट वजनाच्या वस्तू नैरृत्य कोपर्‍यात ठेवल्या पाहिजेत. कारण नैरृत्य कोपरा जड आणि ईशान्य कोपरा हलका असला पाहिजे.

घरातील घड्याळ पूर्व किंवा उत्तर दिशेला लावले पाहिजे. असे केल्यास चांगला काळ आपल्या जीवनात येतो. त्याच्या आगमनाची प्रतीक्षा करावी लागत नाही. ईशान्य कोपर्‍याला कायम स्वच्छ आणि पवित्र ठेवले पाहिजे. त्यासाठी तेथे पाणी भरलेला माठ ठेवायला हवा. त्याचा सकारात्मक परिणाम होतो. घरातील महत्त्वाच्या कागदपत्रांना पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवले पाहिजे. असे न केल्यास त्याच्याशी संबंधित काहीतरी अघटित घडते. अशाच प्रकारे बेडरूम, पूजेची खोली, तिजोरी, बाथरुम, ड्रॉईंग रूम, किचन, मुख्य दार, खिडकी यात बदल करून वास्तुदोष दूर करता येतो.

घरात वास्तुदोष आहे, असे समजताच काही लोक नवीन बांधकामाची तोड-फोड करताना दिसतात. परंतु तसे केल्याने वास्तुदोष नाहीसे होत नाही‍त. हा आपला गैर समज असतो. तो आधी मनातून काढून टाकायला हवा. खालील उपाय तुम्ही वापरून वास्तुदोष मुक्त होऊ शकतात.

  • आपल्याला आवडीच्या सुगंधित फूलांचा गुच्छ नेहमी आपल्या बेडरूममध्ये डोक्याच्या बाजूच्या कोपर्‍यात ठेवावे.
  • आपल्या शयनकक्षात खरगटी भांडी ठेऊ नये, कारण घरातील महिलांची वारंवार प्रकृती बिघडत असते.
  • कुटूंबात कोणाला भयानक स्वप्न पडत असतील तर झोपताना डोक्याशी गंगाजल ठेवावे.
  • कुटुंबात कोणी भयानक आजाराने पिडीत असेल तर चांदी पात्रात शुद्ध केसरयुक्त गंगाजल भरून ठेवावे.
  • घरातील पुरूष हे नेहमी मानसिक तणावग्रस्त असतील तर घरात तुपाचा दीवा लावून गुलाब अगरबत्ती लावावी.
  • शयनकक्षात झाडू नये. जर घरात नेहमी वादविवाद होत असतील तर उशी जवळ लाल चंदन ठेऊन झोपावे.
  • जर दुकानात नेहमी चोरी होत असेल तर दुकानाच्या पायरीजवळ पूजा करून मंगल यंत्राची स्थापना करावी.
  • दुकानदारीत मन लागत नसेल तर मुख्याद्वारच्या मागे किंवा पुढे श्वेत गणपतीची मूर्तीची विधिवत स्थापना करावी.
  • घरातील ज‍िन्याखाली बसून महत्त्वपूर्ण कार्य करू नये.
  • दुकान, फॅक्टरी, कार्यालय आदी ठिकाणी वर्षांतून एकदा तरी पूजा अवश्य करावी.
  • गुप्त शत्रु त्रास देत असतील तर चांदीचा नाग तयार करून करून झोपताना त्यांना पायाशी ठेवले पाहिजे.
  • नवीन जागी मन रमत नसेल, कोणत्याच कार्यात यश येत नसेल तर घरातील दारा खिडक्यांना पिवळ्या रंगाचे पडदे लावावेत.
  • घराला लागून असलेल्या घराच्या छतावर हळद थिंपळावी व ब्राम्हणास पिवळे वस्त्र दान करावे.
  • जर संतती सुख नसेल, मुलगा व वडील यांच्यात जमत नसेल तर सूर्य यंत्र मुख्यप्रवेशद्वारमध्ये ठेवून त्याची प्राणप्रतिष्ठा करावी.

वास्तूतज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय वास्तूसंदर्भात व वरील उपायांसंदर्भात कोणताही निर्णय घेवू नये. 

अधिक माहिती साठी संपर्क :-
वास्तुशास्त्र / ज्योतिष / रेकी तज्ञ श्री. मनोजकुमार आप्पा मोहिते
इमेल :- vastusiddhii@gmail.com
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhii/
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhi
Calling No. 83698 84338
Whatsapp no. 88280 53505

3 thoughts on “वास्तुदोष दूर करा

    1. mmohite Post author

      प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद, ही माहिति तुमच्या मिञ-मैञिणींमध्येही शेअर करा

      Like

      Reply

Leave a comment