उत्तर


N

उत्तर दिशेचा मुख्य दरवाजा :

  • उत्तर दिशेचे पालक कुबेर असल्यामुळे या घरात पैशाचा flow चांगला असतो. या घरातील लोकांची प्रगती चांगली होते.
  • या दिशेच्या घरातील लोकांनी नोकरीपेक्षा व्यवसाय करावा, ते व्यवसायात खूप प्रगती करू शकतील.
  • उत्तर दिशेच्या घराला एक शाप आहे, येथे राहणारे लोकं इतरांना झटकन बोलणार, पान-उतारा करणार, अपमान करणार. हि लोकं फटकळ तोंडाची असतात, यांचा त्यांच्या जिभेवर ताबा नसतो, अशात महिला जास्त आघाडीवर असतात. अशा लोकांपासून इतर लोकं दपकून असतात. परिणामस्वरूप या घरातील लोकं नाती तोडतात, यांची नाती तुटतात.
  • या घरातील लोकं कंजूष असतात, पैसे लगेच खर्च करायला मागत नाहीत, यांना जिथे वाटतं तिथे ते अमाप खर्च करतात नाहीतर नाही, हे हात अखडता घेतात, कमी खर्चात जास्त सुखाची अपेक्षा करतात.
  • लक्ष्मी हि घरात मुख्य प्रवेश द्वारातूनच येते, आग्नेय, दक्षिण, नैऋत्य, पश्चिम व वायव्य या पाच दिशातून येणारी लक्ष्मी चंचल असते, ती कितीही आली तरी या घरातील लोकांना समाधान देऊ शकत नाही पण उत्तर दिशेतून येणारी लक्ष्मी स्थिर आहे, टिकावू आहे पण चंचल नाही, पण या घरातील लोकांना समाधान देवू शकत नाही कारण या घरातील लोकं लक्ष्मीसाठी हपापलेली असतात.
  • पैशावाचून या घरातील लोकांची कामे कधीही आडत नाहीत, जेव्हा पाहिजे तेव्हा पैसा उभा राहतो.
  • या घरातील लोकांमध्ये बोलण्याचे चातुर्य असते, यांच्यात व्यापारी वृत्ती जास्त असते.

सल्ला :

  • बोलण्यावर ताबा ठेवावा, गोड बोलावे.
  • माणसे-नाती जोडावीत.
  • दान-धर्म करावे, जमेल तेवढे हातचं सोडण्याचा प्रयत्न करावा तेव्हाच प्रगतीत भर पडेल.

याच तीन गोष्टी केल्यास हे घर अधिक प्रगती करणार.

 या घरातील लोकांनी करावयाचे व्यवसाय-नोकरी :

  • जिथे जिथे पैसा पैसा चाललं आहे तो व्यवसाय करावा, उदा. शेअर मार्केट, पतपेढी, CA, Investors इ. पैशाच्या संबंधी जे काही कामे असतात ती कामे करावीत.
  • या घरातील लोकांनी कुठल्याही प्रकारचे व्यवसाय करावेत, विशिष्ट असा व्यवसाय करावा असं काही नाही.

वास्तूतज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय वास्तूसंदर्भात व वरील उपायांसंदर्भात कोणताही निर्णय घेवू नये. 

वास्तूतज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय वास्तूसंदर्भात व वरील उपायांसंदर्भात कोणताही निर्णय घेवू नये. 

अधिक माहिती साठी संपर्क :-
वास्तुशास्त्र / ज्योतिष / रेकी तज्ञ श्री. मनोजकुमार आप्पा मोहिते
इमेल :- vastusiddhii@gmail.com
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhii/
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhi
Calling No. 83698 84338
Whatsapp no. 88280 53505

Leave a comment