ब्रम्ह्स्थानात या गोष्टी असतील तर काय परिणाम होतील?


ब्रम्ह्स्थानात या गोष्टी असतील तर काय परिणाम होतील?

१) मुख्य प्रवेशद्वार :- ब्रम्ह्स्थानात मुख्य प्रवेशद्वार येत असेल तर ते नकारात्मक आहे. त्यामुळे या घरातील लोकांची सुरुवात चांगली जाते पण पुढे काही विशिष्ट कालावधीनंतर त्यांचा अखंड ग्राफ हा खाली येतो / खालीच राहतो. (उदा. दलदलीमध्ये फसलेला माणूस)

२) किचन (स्वयंपाक घर) :- ब्रम्ह्स्थानात किचन (स्वयंपाक घर) येत असेल तर ते नकारात्मक आहे. येथे काम करणारी स्त्री डिप्रेशन मध्ये जाणार, तिच्यावरील मेंटल प्रेशर वाढणार, वस्तू विसरण्याचे प्रमाण वाढणार, वस्तू विसरणार, काही सुचणार नाही, विचार करण्याचा speed कमी होणार, काम करताना चटके लागणे-भाजणे यासारख्या गोष्टी होणार.

३) टॉयलेट – बाथरुम :- ब्रम्ह्स्थानाचा मध्य बिंदू बरोबर टॉयलेट – बाथरुम गेल्यास या घरात संकटांची मालिका सुरु होणार, एका पाठोपाठ एक अडचणी सुरु होणार, कर्त्या परुषाच्या जीवास धोका निर्माण होण्याची जास्त शक्यता आहे. हा सर्वात नकारात्मक वास्तुदोष आहे.

४) शयनकक्ष (बेडरूम) :- ब्रम्ह्स्थानात शयनकक्ष (बेडरूम) येत असेल तर ते नकारात्मक आहे. त्यामुळे झोप पुरेशी होणार नाही, स्वप्ने पडणार. या ठिकाणी बसणारा-झोपणारा व्यक्ती एक्क्लकोंडा होणार. मानसिक तणावात सदैव असणार.

५) ब्रम्ह्स्थानाचा मध्यबिंदू घराच्या बाहेर असल्यास किंवा डिप्रेस झाल्यास माणूस बाहेरून घरी आला तर त्याला उत्साह राहणार नाही. मुलं आळशीपणा करणार. कामा पेक्षा विचारच जास्त करणार. अतिविचारी पणामुळे कर्मशून्यता त्यांच्या जीवनात वाढणार.

वास्तूतज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय वास्तूसंदर्भात व वरील उपायांसंदर्भात कोणताही निर्णय घेवू नये. 

अधिक माहिती साठी संपर्क :-
वास्तुशास्त्र / ज्योतिष / रेकी तज्ञ श्री. मनोजकुमार आप्पा मोहिते
इमेल :- vastusiddhii@gmail.com
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhii/
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhi
Calling No. 83698 84338
Whatsapp no. 88280 53505

Leave a comment