नव वर-वधूंची खोली


नवदाम्पत्यांची खोली कशी असावी

नवदाम्पत्यांच्या खोलीसाठी वायव्य दिशेचा कोपरा सर्वोत्तम आहे. संततीसाठी इच्छुक असतेली जोडपे वायव्य दिशेकडील खोलीची निवड करू शकतात.

नवदाम्पत्यांची खोली आग्नेय दिशेला असेल तर काही दिवसातच त्यांच्यात खटके उडायची शक्यता असते. शेवटी तर दोघेही टोकाची भूमिका घेऊन काडीमोड करण्याचा निर्णंय घेत असता‍त. पांढरा, क्रीम किंवा पीच रंग शयनकक्षसाठी उत्तम असते. शयनकक्षात दररोज ताजे फूल ठेवले पाहिजेत. त्यासोबत फळेही ठेवली पाहिजे.

फेंगशुईनुसार काच, माती किंवा सिरॅमिकचे हंस व हंसिनीचा जोडा शयनकक्षात ठेवल्याने नवविवाहीत दाम्पत्यांमध्ये प्रेम व विश्वास यांच्यात वृध्दी होत असते. शयनकक्षाच्या नैऋत्य कोपर्‍यात ते ठेवणे अधिक फायदेशिर ठरेल.

नवदाम्पत्यांच्या खोलीत आरसा लावू नये. या खोलीत जर ड्रेसिंग टेबल ठेवला असेल तर झोपतांना तुमचे प्रतिबिंब त्यात टेबलमध्ये असलेल्या आरशात पडणार नाही याची विशेष काळजी घेतली पाहिजे. परंतु, बदल करण्याची व्यवस्था नसेल तर आरश्यावर पडदा टाकायला विसरू नका. याखोलीत लेटबाथ एटॅच असेल तर मात्र टॉयलेटचा दरवाजा नेहमी बंद ठेवावा. पत्नीने पतिच्या डाव्याबाजूला झोपावे. बिछाणा दरवाज्यासमोर नसावा. तसेच बिमच्या खालीही नसावा. जर बिमच्या खाली बिछाणा असेल तर वैवाहीक सुखात बर्‍याच प्रकारच्या अडचणी येत असतात.

दक्षिण दिशेला डोके व उत्तर दिशेला पाय करून निजल्याने संतती प्राप्तीत कोणतीच अडचण निर्माण होत नाही. घराची उत्तर दिशा जर अशुध्द असेल तर संतान प्राप्तीत अनेक प्रकारच्या अडचणी येत असतात. संतान इच्छुक जोडप्याला गर्भधारणेपर्यंत वायव्य किंवा उत्तर दिशाला असलेल्या शयनकक्षात निवास करावा. गर्भधारणा झाल्यानंतर त्यांना दक्षिण दिशेला असलेल्या शयनकक्षात स्थलांतरीत करावे. प्रसवकाळापर्यंत गर्भ सुरक्षित राहावा म्हणून दक्षिण दिशा किंवा नैऋत्य कोपरा अधिक सुरक्षित व महत्त्वाचा आहे.

नवविवाहीत जोडप्याने एकाच गादीवर झोपल्याने त्यांच्यात दुरावा निर्माण होत नाही. तसेच त्यांच्यातील प्रेम ही आटत नाही.

नैऋत्य दिशा शक्तीचे प्रतीक आहे. मात्र प्रेम, भाग्य , रोमान्स व कौटूंबिक आनंदावर नियंत्रण ठेवणारी आहे. पवन घंटी नैऋत्य दिशेच्या कोपर्‍यात टांगल्याने आपआपसातील प्रेम व विश्चास वाढत असतो. शयन खोलीत मंदीर नसावे.

वास्तूतज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय वास्तूसंदर्भात व वरील उपायांसंदर्भात कोणताही निर्णय घेवू नये. 

अधिक माहिती साठी संपर्क :-
वास्तुशास्त्र / ज्योतिष / रेकी तज्ञ श्री. मनोजकुमार आप्पा मोहिते
इमेल :- vastusiddhii@gmail.com
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhii/
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhi
Calling No. 83698 84338
Whatsapp no. 88280 53505

Leave a comment