रत्नांचा खजिना (Gemstones)


स्फटिक / क्रिस्टल 

मानवाने अनंतकाळात रत्न वा स्फटिकांमध्ये सौंदर्य, शक्ती व त्यात लपलेल्या रहस्यांचे दर्शन घेतले आहे. ज्या प्रकारे वनस्पतीमध्ये मानवाचे आरोग्य स्वस्थ ठेवण्याची शक्ती आहे त्याच प्रकारे रत्नांमध्ये व स्फटिकांमध्येही ह्या प्रकारची शक्ती व बहुगुणआहेत. स्फटिक हे विशिष्ट उर्जाने बनले जातात आणि त्याचाच उपयोग आपण आपले जीवन सुंदर बनविण्यासाठी करू शकतो.

१) फिरोजा (Firoza) :-

     

Firoza Stone Pendant               Firoza Stone Bracelet

प्रकार :- तांबे व लोहाची छटा असलेला फॉस्फेट
रंग :- हिरवट निळा (आकाशी), फिरोजी
औषधी उपचार :- डोळे, कान, मेंदू, गळा, मान, फुप्फुसे, अर्धशिशी, डोकेदुखी, अलर्जी, वायरल इन्फेक्शन इ. विकारांवर गुणकारी.
भावनिक उपचार :- मन शांत करण्यासाठी, मनस्ताप सौम्य करण्यासाठी, विमानाची किंवा हवेत तरंगण्याची भीती घालविण्यासाठी ह्याचा उपयोग होतो. तुमच्या मनातील अपराधीपणाची भावना दूर करण्यासाठी किंवा एखाद्या निर्णयाने दुखावले गेलेल्या मनाला उबारी देण्याचे काम फिरोजा करते.
व्यवहारीक उपयोग :- फिरोजाचा उपयोग शेतकरी किंवा पाळीव प्राणी पाळणारे, प्राण्यांचे सैरभैर होणे किंवा चोरीला जाणे ह्या साठी करू शकता. विशेषता घोडे पाळणारे, घोड्यांना स्थिर व आज्ञाधारक बनविण्यासाठी उपयोगात आणतात. समाजात नेतृत्व करणार्यांनी हा स्टोन घालावा.

कामाच्या ठिकाणी :- फिरोजा हे दगड संवाद साधण्याच्या कामी प्रभावी ठरतात. तुम्ही एखाद्याला माहिती देत असता, तोंडी किंवा लेखी, तुमचे शब्द समोरच्या व्यक्तीच्या मनाचा वेध घेण्यास समर्थ ठरतील.

सरकारी कर्मचारी व न्यायालयाशी संबंधित व्यक्तींच्या प्रमोशन किंवा प्रगतीसाठी फायदेशीर. हजारो वर्षापासून फिरोजाला सुजाणता व विवेकीपणाचे प्रतिक म्हणून संबोधले जाते. तसेच ह्याला पुरुषार्थाचे प्रतिक मानत असले तरी पुरुष स्त्रियांनाही तेवढ्याच प्रमाणात लाभदायी आहे. फिरोजाची अंगठी किंवा ब्रासलेट घालावे किंवा पर्समध्ये नेहमी बरोबर असू द्यावा.

फिरोजा ह नशीब उघडणारा, यश, पैसा, कीर्ती, ध्येय व कलात्मकता ह्यासाठी तीलीस्माती (अविस्मरणीय) सिद्ध झाला आहे.

या उपर हा न्यायी (कधी ही अन्याय सहन करू न देणारा व अन्याय करू न देणारा) खडा मानला गेला आहे.

सारांश :- येणाऱ्या संकटांपासून आपल्याला दुर करतो, मुस्लीम लोकांत मोठ्या प्रमाणात वापरला जातो. हा स्टोन दोन कलरमध्ये असतो (ब्ल्यू आणि ग्रीन), ब्ल्यू स्टोन ला जास्त महत्त्व आहे. हा स्टोन खूप नाजूक असतो त्यामुळे या खड्यामागे लाख लावलेली असते, लाखेसहीत अंगठी किंवा लॉकेट करावे. 

या स्टोन वर दुर्गाबिसा मंत्राने जलाभिषेक करून ज्याला द्यायचं आहे त्याच्या नावाने स्थापित करून द्यावा.

फिरोजा स्टोन खरेदी करण्यासाठी पुढील लिंक https://amzn.to/3we5CKj

फिरोजा स्टोन ब्रासलेट खरेदी करण्यासाठी पुढील लिंक https://amzn.to/3hcYvxb

२) पायराइट (धनाकर्षक) (Pyrite) :-

pyrite stone pyrite

प्रकार :- आयर्न सल्फेट
रंग :- चंदेरी (मेटॅलिक व सिल्वरी)
शारीरिक उपयोग :- सर्दी पडसे, प्ल्यू यांसारखे वायरल आजार, रक्ताशी निगडीत आजार, मुख्यता तांबड्या पेशी व रक्त अल्पता तसेच फुप्फुसांच्या आजारांसाठी प्रभावी. वायरल आजारांपासून सुरक्षा होते.
भावनिक उपचार :- सहकारी किंवा पार्टनर ह्यांच्याकडून होणारी टीका, दबाव, वरचढपणा, ह्यामुळे येणारी निराशा तसेच घरच्यांच्या अपेक्षेमुळे मनावरील प्रेशर या सर्वांना सामोरी जाण्यासाठी आंतरीक शक्ती जागृत करतो.
कामाच्या ठिकाणी :- आयर्न पायराइट व्यक्तीतील नायक गुणांना (लिडरशीप) प्रभावित करतो. मॅनेजर   किंवा प्रमोशनसाठी प्रयत्न करणार्यांनी जवळ बाळगल्यास चांगले.
व्यावहारिक उपयोग :- घरी किंवा कामात आयर्न पायराइट वापरणारे कधीही आर्थिक निर्णय चुकीचे घेणार नाहीत.

आयर्न पायराइट मध्ये गुप्त अग्नी व प्रत्येक व्यक्ती मधील स्वबळावर धन उर्जित करणारी शक्ती आहे. आयर्न पायराइटला “मूर्खांचे सोने” असे ही नाव देण्यात आले आहे. पण हे सत्य नाकारता येत नाही की मौल्यवान वस्तूंच्या शोधात खरे सोने व पायराइट ह्यामध्ये गफलत होते, कारण खरे सोने पायराइटला समांतर आढळून येते, म्हणून जीवनातील चांगल्या वाईटाची ओळख न पटणारे मूर्खच म्हणावे. तुम्ही घरापासून दूर असताना तुमच्या जवळील पायराइट तुमचे संरक्षक कवच बनते. आरोग्य चांगले राहून दीर्घायुष्य लाभण्यासाठी, पैसे मिळण्यासाठी किंवा पैसा खेचून घेण्यासाठी याचा उपयोग केला जातो. धनसंपदा खेचून घेण्याची आकर्षण क्षमता ह्यामध्ये आहे.

सूचना :- औषधात वापरू नये किंवा गिळू नये.

सारांश :- सोन्याच्या कलर सारखा दिसतो. प्रमोशन अडकलेले असतात, इन्क्रिमेंट होत नसेल तर हा स्टोन घालावा. Money Flow आकर्षित करण्यासाठी हा स्टोन नेहमी जवळ ठेवावा. हा स्टोन Mind Relax करतो, वायरल आजारांपासून संरक्षण देतो, पैशाचे मार्ग मोकळा करतो, पैशाचा problem solve करतो.

या स्टोन वरती लक्ष्मीचा मंत्र १०८ वेळा म्हणत दुग्धाभिषेक-जलाभिषेक करावा. ज्या व्यक्तीला द्यायचा आहे त्याच्या नावाने हा स्टोन अभिमंत्रित करावा.

पायराईट स्टोन खरेदी करण्यासाठी पुढील लिंक https://amzn.to/3qJU3ck

पायराईट स्टोन ब्रासलेट खरेदी करण्यासाठी पुढील लिंक https://amzn.to/3AnxxdW

३) ग्रीन प्लोराइट (Green Fluorite) :-

green floritegreen florite bracelet

प्रकार :- हलाइड, कॅल्शियम प्लोराइट
रंग :- हिरवा
शारीरिक उपचार :- हा खडा रोग प्रतिकारक शक्ती वाढवून संसर्गजन्य आजारांना अटकाव करतो. पेशींची पुन:निर्मिती करून उर्जा व कार्यशक्ती वाढवून शरीरात खनिज शोषण करण्यास मदत करतो. मुख्यता दात, हाडं, रक्तवाहिन्या, फुप्फुसांसाठी उपयुक्त.

भावनिक उपचार :- ग्रीन प्लोराइट एखाद्याच्या मनात दाबल्या गेलेल्या इच्छा, आकांक्षा, मते किंवा विचार किंवा मनात कोंडून ठेवलेले दु:ख मोकळे करण्याची हिंमत देते. लहानपणीच्या किंवा अनेक वर्षापुर्वींच्या भावनांना नवीन उभारी देण्यास मदत करतो.

कामच्या ठिकाणी :- घरात, ऑफिस मध्ये किंवा इतर ठिकाणी विद्युत उपकरणांमुळे निर्माण होणार्या नकारात्मक उर्जेला अवरोध करतो.

व्यवहारीक उपयोग :- मुलांमधील भांडणे, खोड्या, दंगामस्तीचे प्रमाण कमी करण्यासाठी मुलांच्या खेळण्याच्या जागी ठेवा. सुमारे पाचशे वर्षापूर्वी हिरवा किंवा इतर रंगाचे प्लोराइट चीन भांड्यात कोरून जेड ह्या मौल्यवान दगडा ऐवजी वापरला जात असे.

अत्यंत प्रदूषित परिसरात काही प्रमाणात शुद्ध नैसर्गिक श्वास घेण्यासाठी ग्रीन प्लोराइट कामी येऊ शकतो. धुर, धुळ किंवा गलिच्छ रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या शाळकरी मुलांनी हे जरूर जवळ बाळगावे.

तुम्हाला फुलपाखरे आवडत असतील तर त्यांना आकर्षित करण्यासाठी ग्रीन प्लोराइट तुमच्या बागेत ठेवून ह्याची प्रचीती घ्या.

ग्रीन प्लोराइट स्टोन खरेदी करण्यासाठी पुढील लिंक https://amzn.to/3h9NGMy

ग्रीन प्लोराइट स्टोन ब्रासलेट खरेदी करण्यासाठी पुढील लिंक https://amzn.to/368w25p

४) रेड जस्पर (Red Jasper) :-

Tumbled-Red-Jasper-Extra-Africa---Tumbled-Stones-01red jasper bracelet

प्रकार :- सिलिकेट, मायक्रो क्रिस्टलाइन क्वॉर्टज, त्यात असलेल्या मोठ्या प्रमाणातील लोहामुळे त्याला तांबडा रंग आलेला आहे.
रंग :- लाल ते टेराकोटा तांबूस चॉकलेटी, काहीवेळा इतर धातूंच्या मिश्रणामुळे काळस रेघा दिसतात.

शारीरिक उपचार :- रक्ताशी निगडीत समस्या, जसे रक्ताभिसरण, रक्ताल्पता, रक्तपेशी, दुषित रक्त, मासिक धर्म इ. साठी उपयुक्त. स्त्रियांसाठी सुरक्षित बाळंतपण किंवा त्यावेळेतील त्रास कमी करण्यासाठी. तसेच गर्भावस्थेतील अगदी सुरुवातीची ट्रीटमेंट (I.V.F. ट्रीटमेंट) सुरु असताना ह्याचा सकारात्मक प्रभाव पडतो. हृद्याविषयी समस्या किंवा बायपास, ट्रान्सप्लांट या सारख्या शस्त्रक्रिया ह्यासाठी हि जस्परचा फायदा होऊ शकतो. भाजणे, खरचटणे, सांधेदुखी यावर सुद्धा रेड जस्पर उपयोगी आहे.

भावनिक उपचार :- दबाव, धमकी, घरगुती हिंसाचार ह्या विरुद्ध उभे ठाकण्याची मानसिक शक्ती रेड जस्पर स्त्री-पुरुषांना देते. एखाद्या गंभीर आजारात मानसिक स्थिरता ठेवण्याचे काम जस्पर करू शकतो.

व्यवहारीक उपयोग :- हिवाळ्यात किंवा थंड प्रदेशात रेड जस्पर दागिन्यात किंवा जवळ बाळगल्यास तुम्हाला त्याचा उष्ण प्रभाव जाणवेल. जवळ बाळगता न आल्यास तुमच्या उष्ण पेयात काढ्यासारखा वापर करता येईल.

कामाच्या ठिकाणी :- एक शक्तीशाली खडा जो तुमचा आत्मविश्वास व इतरांमध्ये तुमच्या विषयी आदराची भावना वाढीस लावील. ह्या भावहीन व स्पर्धात्मक जगात स्वत:चा ठसा उमटवण्यासाठी प्रत्येक धडपडणार्या माणसासाठी रेड जस्पर हे प्रभावशाली खडा आहे. मुलांना एकटीने वाढवणाऱ्या मातांसाठी रेड जस्पर हे शक्तिवर्धक आहे. अभिनव क्षेत्रातील लोकांना ह्याचा चांगला उपयोग होऊ शकतो. मनातील भीतीपासुन संरक्षण मिळण्यासाठी रेड जस्पर जवळ ठेवा. तुमच्या वाहनाची सुरक्षा जसे चोरी, अपघात, रोसरेज या पासून बचाव करण्यासाठी वाहनात ठेवा.

सारांश :- वास्तूमध्ये दक्षिण दिशेस रेड जस्पर वापरतात. स्त्रियांच्या मासिक त्रासात दक्षिण दिशेस मोठा पिरॉमिड ठेवून माळ घालण्यास सांगणे. Child Birth Problem आणि आजारांवर उपयोगी.

रेड जस्पर स्टोन खरेदी करण्यासाठी पुढील लिंक https://amzn.to/2TmHJTt

रेड जस्पर स्टोन ब्रासलेट खरेदी करण्यासाठी पुढील लिंक https://amzn.to/2UTiOqK

५) लॅपिस लॅझुली (Lapis lazuli) :- 

Tumbled-Lapis-Lazuli-Pakistan---Tumbled-Stones-05lapis lajhuli

प्रकार :- अनेक धातू पासून तयार होणारा खडक ज्यात लॅझुराईट, सोडालाईट, कॅल्साइट व पायराइट इ. समाविष्ट असतात.
रंग :- शाही निळा (रॉयल ब्ल्यु), परपल ब्ल्यु, सोनेरी छटा असलेला ग्रीन ब्ल्यु.
शारीरिक उपचार :- मुख्यत: इंडोक्राईन ग्रंथी व मज्जासंस्थेवर उपचार, डोकेदुखी, अर्धशिशी, लिम्फग्रंथी, बोनमॅरो, नाक, कान अवयवातील दाहकता यावर प्रभावी.
भावनिक उपचार :- स्वत:ची जबाबदारी ओळखणे, एखादी संधी हुकल्यास दुसऱ्याला दोष न देत बसता स्वत:तील कमतरता शोधणे.
व्यवहारी उपयोग :- तुम्हाला एखाद्या कार्याची किंवा स्वत:ची प्रसिद्धी हवी असल्यास त्या कार्याच्यावेळी लॅपिस जरूर जवळ ठेवा.
कामाच्या ठिकाणी :- लॅपिसला “करीअर स्टोन” असे ही म्हणतात. कारण “प्रमोशन” ह्याकडे आकर्षित होतात.       

लॅपिस लॅझुली हे आभूषणात वापरले जाणारे प्रथम जेमस्टोन आहे. लॅपिस हा सत्याचा खडा आहे. लिहिताना, बोलताना हा सत्याला प्रोत्साहीत करतो. खोल मनातील संवाद साधताना लॅपिस वापरावा. प्रेमात लॅपिस मुळे हृद्य हृदयाशी संवाद साधण्यात यशस्वी ठरतो. लॅपिस मैत्रीसाठी ही आदर्श मानला गेला आहे, कारण लॅपिस नात्यांमध्ये संतुलन ठेवुन नाती टिकवण्यास मदत करतो.

भुतबाधा, विषबाधा, सर्पदोष या पासून मुक्ती मिळवण्यासाठी, नजर लागु नये तसेच शरीरातील व त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यासाठी उपयोगी.

सारांश :- वास्तूमध्ये स्त्रियांच्या सर्व प्रकारच्या Health Problems साठी आणि आर्थिक प्रगतीसाठी लॅपिस आग्नेय दिशेस ठेवावे ( ४ x ४ इंच कमीत कमी). मानसिक आजारी लोकांसाठी हा स्टोन उपयोगी येतो. वायव्य disturb असेल तरी हा स्टोन फायदेकारक आहे. प्रमोशन आणि इन्क्रिमेंट साठी ही हा स्टोन प्रभावी आहे. याला लकी आणि करिअरसाठीचा स्टोन म्हणूनही ओळखतात.

लॅपिस लॅझुली स्टोन खरेदी करण्यासाठी पुढील लिंक https://amzn.to/3qFULrk

लॅपिस लॅझुली स्टोन ब्रासलेट खरेदी करण्यासाठी पुढील लिंक https://amzn.to/3jC6zJy

६) टायगर आय (Tiger Eye) :-

Tumbled-Golden-Tiger-Eye-Africa---Tumbled-Stones-01tiger_eye_meditation_bracelet1

प्रकार :- ऑक्साईड क्वार्टस
रंग :- मातकट, चॉकलेटी, सोनेरी पट्ट्या
शारीरिक उपचार :- पोटातील विकार, अल्सर, स्प्रेन, सांधेदुखी इ. वर प्रभावी/ शारीरिक उर्जा व ताकद वाढवून शरीर संतुलित ठेवण्यास मदत करतो.
भावनिक उपचार :- चुकीच्या आहार पद्धतीस अटकाव करतो. सिगारेट, दारू, ड्रग्ज या सारख्या हानिकारक सवयींवर ताबा मिळवण्यासाठी इच्छा शक्ती व भावनिक स्थिरता प्रदान करतो. आरोग्य सुधार उपचारांना यश येण्यासाठी टायगर आयचा वापर उपयुक्त ठरेल. घसाचे विकार, जननसंस्थेशी संबंधीत विकारांमध्ये तसेच मोडलेली हाडे सांधण्यासाठी उपयोगी आहे.
व्यवहारीक उपयोग :- पैशाची स्थिर आवक घरात सतत आकर्षित करण्यासाठी टायगर आयचा उपाय करून बघा. एखाद्या चांगल्या दिवशी झाकण असलेल्या भांड्यात टायगर आय ठेवा व त्यात रोज एक नाणं टाकत रहा. भांड नाण्यांनी भरलं की ते पैसे दान धर्मात किंवा स्वत:च्या हौसेसाठी खर्च करा व परत सुरुवात करा, नक्की प्रचीती येईल.
कामाच्या ठिकाणी :- व्यापाऱ्यांसाठी किंवा नवीन व्यापार उद्योग सुरु करणार्यांसाठी तसेच ज्ञान व कुशलता ह्यावर आधारीत व्यापार यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. आत्मविश्वास वाढवतो. रोमन सैनिक स्वत:मधील शूरता वाढवण्यासाठी टायगर आय बरोबर नेत असत.

टायगर आयची घडण अशाप्रकारे झाली आहे की समोरच्या माणसाची नकारात्मक उर्जेला आपल्यामध्ये शोषण्यासअ अटकाव करतानाच त्याच्या बद्दलची भीती प्ररावर्तीत करतो व आपल्याला मानसिक बल प्रदान करतो. एखाद्या माणसाची विश्वासहर्ता तपासण्यासाठी टायगर आय हातात धरा व तुमच्या मनाचा कौल घ्या. तुमच्या मनावर विश्वास ठेवा. तुम्ही कोणत्याही स्पर्धेत भाग घ्यायला घाबरत असाल किंवा तुमच्या कडून हवी तशी कामगिरी होत नसेल तर तुम्ही टायगर आय वापरून बघा तुमची भीती पळून जाईल व तुम्ही चमकून उठाल. तुमची एखादी वस्तू मार्केटमध्ये विकली जात नसेल तर तुम्ही टायगर आयची मदत घ्या, तुम्ही नक्की यशस्वी व्हाल.

तुमच्या पाळीव प्राण्यांना अगोचर होण्यापासून टायगर आय वाचवू शकतो. प्राण्यांना पाळीव किंवा ट्रेन करण्यासाठी ह्याचा उपयोग होतो.

सारांश :- आत्मविश्वास वाढवतो तसेच Money Flow खेचून आणतो. घरामध्ये ठेवायचा असेल तर नैऋत्य दिशेमध्ये ठेवावे. ऑफिस मध्ये मेन बॉस च्या टेबलावर टायगर आय चा स्टोन असलाच पाहिजे तसेच Bracelet किंवा Pendant घालावे. याचा कोणताही Side Effect नाही. फक्त अगोदरच aggressive असलेल्या व्यक्तींनी घालू नये.     

टायगर आय स्टोन खरेदी करण्यासाठी पुढील लिंक https://amzn.to/3hcVDkb

टायगर आय स्टोन ब्रासलेट खरेदी करण्यासाठी पुढील लिंक https://amzn.to/2SLLvFy

७) ऱ्होडोक्रोसाईट (Rhodochrosite) :- 

प्रकार :- मॅग्नीज कार्बोरेट
रंग :- गुलाबी, कधी पांढरे किंवा पिवळसर हलके पट्टे, जरी भडक गुलाबी ते लाल या रंगा दरम्यान आढळत असला तरी क्वचित भगवा, पिवळा व चॉकलेटीही सापडू शकतो.
शारीरिक उपचार :- रक्ताभिसरण, हृदयाचे आजार, ब्लडप्रेशर, अस्थमा, अर्धशिशी.
भावनिक उपचार :- आपल्या शरीरातील मानसिक चक्रातील काही कारणाने बंद झालेल्या उर्जा स्त्रोत्रांना उघडण्यास चालना देईल. त्यामुळे पृथ्वी तत्त्वातून निघणारे प्रकाश व जीवन उर्जा मूळ चक्राद्वारे शरीरात वर पर्यंत तसेच हृद्य चक्राद्वारे मुकुटापासून खाली पृथ्वी पर्यंत पोहचेल. ह्या हालचालीमुळे माणसाचा भविष्यकाळ सुकर होईल. प्रेम व्यक्त करण्यास घाबरणाऱ्या प्रेमवीरांनी वापरल्यास नकाराची भिती न बाळगता प्रेमाची कबुली देण्याचे धाडस करील.
व्यावहारिक उपयोग :- पहिल्यांदा शाळेत-कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांसाठी उपयोगी. ह्यामुळे त्यांना लवकर मित्र-मैत्रिणी भेटतील व नवीन वातावरणात रमुन जाण्यास मदत होईल.
कामाच्या ठिकाणी :– लहान जागेत, दाटीवाटीने काम करणाऱ्यांसाठी खेळीमेळीने काम व्हावे म्हणून ऱ्होडोक्रोसाईट वापरता येईल. जेथे व्यक्तिमत्व व्यावसायीकपणाच्या आड येत असेल त्या ठिकाणी ऱ्होडोक्रोसाईटची मदत घ्यावी.

ऱ्होडोक्रोसाईट माणसातील मना-मनाचा संवाद घडवून आणण्यास मदत करतो. तुम्हाला तुमच्या हरवलेल्या मित्र किंवा नातेवाईकांशी किंवा दूर असलेल्या प्रिय व्यक्तीशी संपर्क साधायचा असल्यास तुम्ही ऱ्होडोक्रोसाईटचा टेलीपॅथीक उपाय करून पहा. तुम्हाला हव्या असलेल्या व्यक्तीच्या फोटो शेजारी हा खडा ठेवा. त्या खड्याभोवती तुम्ही दोन्ही हात ठेवुन त्या व्यक्तीचे तीनदा नाव उच्चारा व लवकरात लवकर तुमच्याशी संपर्क साधण्याची मनापासुन विनंती करा. ती व्यक्ती तुम्हाला भेटेल असा सकारात्मक विचार करा. तुमची इच्छा पूर्ण होईल. तुमच्या हरवलेल्या पाळीव प्राण्यासाठीही असाच उपाय करावा. फोटो नसेल तर त्याच्या बसण्याच्या जागेवर खडा ठेवा. नव-मातांना मातृत्वाची जबाबदारी सुकर होण्यासाठी ह्या खड्याचा फायदा होईल.

सारांश :- वशीकरण स्टोन ही याला म्हणतात. हा स्टोन हातात घेऊन व्यक्तीचे स्मरण केल्यास त्या व्यक्तीला फोन किंवा भेटण्याचा योग येतो. Telepatis साठी उपयोगी येतो.

ऱ्होडोक्रोसाईट स्टोन खरेदी करण्यासाठी पुढील लिंक https://amzn.to/3wdAElo

ऱ्होडोक्रोसाईट स्टोन ब्रासलेट खरेदी करण्यासाठी पुढील लिंक https://amzn.to/36aqNlG

८) रेनबो मुनस्टोन (Rainbow Moonstone)

प्रकार :- फेल्डस्पर
रंग :- दुग्ध पांढरा इंद्रधनुष्य छटांसह.
शारीरिक उपचार :- हार्मोन्स, फर्टीलीटी, थॉयरॉइड, पिचुटरी ग्रंथी, मासिक धर्म, बॉवेल्स, स्तन व गर्भपिशवी संबंधित शस्त्रक्रियेनंतर रिकव्हरीस उपयुक्त.
भावनिक उपचार :- एकटे वाटणाऱ्या, स्वत:त हरवणाऱ्या, एकलकोंड्या लोकासाठी फारच हा खडा उपकारक आहे. सर्वच भावनिक उपचारांसाठी ह्याचे महत्त्व आहे.
व्यवहारीक उपयोग :- तुमच्या झाडांच्या सुदृढ वाढीसाठी व फुलपाखरांना आकर्षित करण्यासाठी पौर्णिमेच्या तीन दिवस आधी किंवा जेव्हा आकाशात इंद्रधनुष्य दिसेल तेव्हा हा खडा तुमच्या बागेत ठेवा.
कामाच्या ठिकाणी :- कर्मचार्यांच्या संवेदनशील समस्या सोडवताना किंवा कामगार वर्गाशी सलोख्याचे संबंध जोडताना हा खडा जरूर परीधान करावा.

रेनबोस्टोन तुमच्या उशीखाली किंवा जेथे चंद्रीकरीण पडतात अशा जागी ठेवल्यास तुम्हाला शांत झोप लागुन गोड स्वप्ने पडतील. रेनबोस्टोन फार सौम्य आहे. तो तुम्हाला दिर्घ आजारातून उभारण्याची शक्ती देईल, स्वत:ला इजा पोह्चवणाऱ्या व्यक्तीमधील अशी प्रवृतींपासून दुर नेण्यास हा खडा त्यांना सहाय्यक ठरेल. मुलांमधील शैक्षणिक समस्यांचे निर्मुलन करण्यास मदत करील.

सारांश :- ज्यांना झोप लागत नाही त्यांनी हा स्टोन उशी खाली ठेवावा. लाईटमध्ये धरल्यास ७ कलर दिसतील. Communication संबंधी अडचणी असणाऱ्यांनी, मध्यस्थींनी घालावा. Communication विक असेल तर सुधारते व चांगली झोप लागते.

रेनबो मुनस्टोन स्टोन खरेदी करण्यासाठी पुढील लिंक https://amzn.to/2URnNbt

रेनबो मुनस्टोन स्टोन ब्रासलेट खरेदी करण्यासाठी पुढील लिंक https://amzn.to/3jEWfka

९) रुबी इन फससाईट (Ruby in Fuchsite)

प्रकार :- सिलीकेट, कोरन्डमच्या समावेशासह.
रंग :- हिरवा, लाल रंगाच्या समावेशासह.
शारीरिक उपचार :- सततचा ताण, जखम, प्रतिकार शक्ति, इन्फेक्शन, मणका, तांबड्या-पांढऱ्या पेशी, चालताना तोल जाणे, हृद्य आजारानंतरची रिकव्हरी इ. वर प्रभावी.
भावनिक उपचार :- आकस्मित धसक्यातुन किंवा निराशेतून बाहेर पडण्यास मदत होते. सत्य परिस्थितीला सामोरी जाण्याचे धैर्य प्राप्त होते. समस्या कितीही निकट असो, निराश न होता, न घाबरता ती सोडवण्यासाठी सकारात्मक दृष्टी प्राप्त होते.
व्यवहारिक उपयोग :- अनपेक्षित घटना घडणे, कल्पने पलीकडील गोष्टी समोर येणे. सरकारी कर्मचार्यांच्या होणाऱ्या वारंवार बदल्यांमुळे येणारा ताण, अशावेळी हा खडा ठेवावा.
कामाच्या ठिकाणी :- काम करताना अनेक लोकांशी संबंध येतो. ज्यांचे विचार कामाची पद्धत व इतर अनेक बाबींमध्ये भिन्नता असते. तुमच्या तत्त्वांना मुरड घालावी लागणार नाही.

फस्साईट हा मस्कोवाईट परीवारातील हिरव्या क्रोमियमने समृद्ध झालेला दगड आहे. त्यातील रुबीच्या समावेशामुळे तो उर्जित दगड झाला आहे. हा दगड पृथ्वीतत्त्व व वायुतत्त्वाचे प्रतिनिधित्व करतो. रुबी प्रेम व अग्नीचे प्रतिक आहे. ह्या सर्वांची उर्जा एकत्रित होऊन मन व शरीराला पुनरुर्जीत करतात. रुबी मनातील आकांक्षांना चालना देऊन ध्येयाकडे वाटचाल करण्याची प्रेरणा देतो. तसेच जीवनात कोठेही केव्हाही यश प्राप्तीसाठी मनात धैर्य निर्माण करतो. फस्साईट मसाजसाठी वापरल्यास मनातील व शरीरातील ताण-तणावाची जागा आत्म संतुलन व प्रसन्नता घेईल. तुम्ही मोठ्या संकटातून, भावनिक क्लेशातून किंवा जीवनातील अत्यंत वाईट, कठीण पर्वातून बाहेर पडला असाल तेव्हा रुबीईन फस्साईट तुम्हाला कटु आठवणी विसरून जीवनाकडे बघण्याचा नवा दृष्टीकोन देण्यास मदत करील. तुमच्या आयुष्यात मोठे बदल होताना जसे तुम्ही जोडीदाराच्या देशात स्थायीक होणार असाल किंवा कायमचा देश सोडणार असाल तेव्हा रुबीईन फस्साईट जवळ ठेवा तुम्हाला नवीन परिस्थितीशी जुळवून घेताना उपयोगी ठरेल.

सारांश :- रुबीचा रेड कलर मध्येच आलेला असतो. हा स्टोन fighting sprit देतो. एखादा व्यक्ती एखाद्या क्षेत्रात मागे पडत असेल त्यांनी घालावा. Out ऑफ station जाणार्याने आपल्या जवळ हा स्टोन बाळगावा. हा स्टोन एकटेपणा घालवतो.

रुबी इन फससाईट स्टोन खरेदी करण्यासाठी पुढील लिंक https://amzn.to/2Tt1loI

रुबी इन फससाईट स्टोन ब्रासलेट खरेदी करण्यासाठी पुढील लिंक https://amzn.to/3xehBIN

१०) स्मोकी कॉर्टज (Smoky Quartz) :

प्रकार :- कॉर्टज
रंग :- धुरकट चॉकलेटी किंवा करडा, राखाडी
शारीरिक उपचार :- प्रदीर्घ आजारातून उठल्यावर किंवा नैराश्याच्या गर्गेतून बाहेर पडल्यावर शारीरिक उर्जेचे पुन:संचयन करताना कॉर्टजची मदत होते. शरीरातील बंद उर्जा स्त्रोत पायातील ताठरता, अॅडिशनल ग्रंथी, किडनी, पित्ताशय विशेषता मुतखडा वा शरीरातील जुने दुखणे यावर उपयुक्त.
भावनिक उपचार :- नैराश्य, निद्रानाश, आत्मघात, दुख:चा उद्रेक, सायकॉलॉजिकल समस्यांवर प्रभावी.
कामाच्या ठिकाणी :- कोणतीही नकारात्मकता शोषून घेण्याची क्षमता कॉर्टजमध्ये आहे. ती शक्ती आंतरीक असो की बाह्य कॉर्टज ह्यासाठी सक्षम आहे. फक्त खडा आठवड्यातून एकदा स्वच्छ करून घ्यावा.
व्यवहारीक उपयोग :- घर, गाडी, दागिने, किमती वस्तू यांची चोरी, नुकसान किंवा अपघातापासून वाचवण्यासाठी घरात, तिजोरीत किंवा गाडीत ठेवा.

स्मोकी कॉर्टज आपल्या बॅडलकच्या विरोधात उभा राहणारा आपला रक्षक आहे. स्वित्झर्लंड, जर्मनी व Astriya देशांमध्ये घरात वाईट शक्ती प्रवेश करू नये म्हणून बेडरूमच्या भिंतीवर स्मोकी कॉर्टज लावण्याची प्रथा आहे. स्मोकी कॉर्टजला ड्रायविंग क्रिस्टल असेही म्हणतात, कारण हा खडा फक्त गाडीला रस्त्यांवरील अपघातांपासूनच नाहीतर गाडीतील मेकॅनिकल ब्रेकडाऊन किंवा टेक्निकल ना दुरुस्तीपासूनही सुरक्षित ठेवतो. एवढेच नाही तर स्मोकी कॉर्टज गाडीत असल्यामुळे लांबच्या प्रवासातील थकवा किंवा ट्रॅफिकजाममुळे येणारा ताण दूर करतो व चालकाला तरतरीपणा देतो. आपली कमनशिबी, दु:ख, अशक्यप्राय अडथळे यापासून बचाव करण्यासाठी स्मोकी कॉर्टज वापरावा.

आपल्या जीवनातील वाईट गोष्टींना दूर सारण्यासाठी हा उपाय करा. हातात स्मोकी कॉर्टज घेऊन बोट जमिनीकडे दर्शवित उभे राहा. जीवनातील सर्व वाईट गोष्टींना मनात आणून गळून जाण्याची विनंती करा. मग त्या खड्यासह वाईट गोष्टींना जमिनीत गाडून त्यावर एखादे रोप लावा. घराबाहेर करायला न जमल्यास घरात छोटी कुंडी आणून करू शकता.

स्मोकी कॉर्टज स्टोन खरेदी करण्यासाठी पुढील लिंक https://amzn.to/3xkrmFK

स्मोकी कॉर्टज स्टोन ब्रासलेट खरेदी करण्यासाठी पुढील लिंक https://amzn.to/3jDATDK

११) रोज (Rose)

सिलिकॉन डायऑक्साईट, मॅगनिजसह, कधी सुईसारखे टोकदार किंवा बदामाच्या आकारात (हार्टशेप) आढळतात.
रंग :- गुलाबी (बेबी पिंक) अर्धपारदर्शक, चमकदार, कधी भुरकट गुलाबी, कधी गुलाबी.
शारीरिक उपचार :- मुख्यत: मातांना किचकट बाळंतपणासारखा उपयुक्त, त्वचा, डोकेदुखी, फर्टीलिटी, जेनीटल्स, स्त्रीरोग यांवर प्रभावी खडा. रात्रीची वाईट स्वप्ने, रात्रीची भीती घालवण्यासाठी.
भावनिक उपचार :- नैराश्येतून बाहेर पडण्यासाठी मनातील क्षमाशीलता वाढवण्यासाठी व प्रत्येक वाईट प्रवृत्तीवर वरचढ होण्यासाठी.      
व्यवहारीक उपयोग :- लहानांपासून थोरांपर्यंत निद्रनाशावरील प्रभावी खडा. रात्रीची वाईट स्वप्ने, रात्रीची भिती घालवण्यासाठी.

कामाच्या ठिकाणी :- तुमच्या कामाच्या जागी पॉलिश न केलेला एक मोठा खडा ठेवल्यास तुमच्या विरोधात चालणारे कट, निंदा (गॉसिपिंग) या पासून सुटका मिळेल. “रोज” ला मातृत्व क्रिस्टल असेही म्हणतात. कारण आई-बाळाचे नाते दृढ करण्यात मदत करतो. विशेषतः तुमची आई गेल्यास तिचा ओलावा, तुमच्या मनात जागृत राहील. गरोदर स्त्रियांनी रोज क्रिस्टल रोज थोडा वेळ पोटावर ठेवल्यास आहे व बाळाचे बंध घट्ट होण्यास मदत होईल. गरोदर स्त्रियांनी हॉस्पिटलमध्ये जाताना रोज कॉर्टज् बरोबर नेऊन बाळ जन्मल्यानंतर त्याच्या जवळ ठेवावे त्यामुळे आई व बाळ दोघांना सुरक्षित वाटेल.

प्रेमाचे नाते घट्ट करण्यासाठी एकमेकांना जोडलेल्या बदामाच्या आकारातील रोज कॉर्टज् (हार्ट शेप व्टीन रोज कॉर्टज्) व गुलाबी रंगातील मेणबत्त्या जोडीदाराला भेट द्या. स्वत:चा व जोडीदाराचा फोटो हार्टशेप रोज कॉर्टज् खड्यात pendant तयार करा किंवा खड्यासह फ्रेम करा. लहानपणापासून असणारे भयगंड, उपेक्षेची भावना दूर करण्यासाठी, तसेच प्रेमभंगाच्या दु:खातून बाहेर येण्यासाठी वापरावा.

सारांश :– प्रेमाचं प्रतिक, Counter सेलिंग, MR, Communication Skill करण्यासाठी नैऋत्य दिशेस पिरॅमिड ठेवणे (४ x ४ – कमीत कमी). घराच्या वायव्य व नैऋत्य दिशेस ठेवू शकतो.

रोज स्टोन खरेदी करण्यासाठी पुढील लिंक https://amzn.to/3wbFj7d

रोज स्टोन ब्रासलेट खरेदी करण्यासाठी पुढील लिंक https://amzn.to/3xfWRAG

१२) अमेथीस्ट (Amethyst)

प्रकार :- जांभळ्या रंगातील कॉर्टज्
रंग :- जांभळा, लवेंडर ते गडद जांभळा
शारीरिक उपचार :- मानव, वनस्पती व प्राणी या सर्वांसाठी गुणकारी. अर्धशिशी व डोकेदुखी अमेथीस्ट वाहत्या पाण्यात ओला करून कपाळावर अँटी क्लॉकवाईज् फिरवल्यास गुण येईल.
भावनिक उपचार :- पुरातन ग्रीक भाषेत अमेथीस्ट म्हणजे विषापासून किंवा वाईटापासून अबाधित ठेवणारा, मुलांमधील चंचलता कमी करण्यास मदत होते. व्यसनाधीनता, पल्सीव डीसऑर्डर यावर प्रभावी.
कामाच्या ठिकाणी :- अमेथीस्टचा खडा स्वच्छ धुवून पाण्यात काही तास ठेवा. नंतर हे अमेथीस्टचे सिद्ध पाणी पिण्यासाठी किंवा इतर पेयात मिसळून प्या. त्यामुळे कामाचा ताण कमी होऊन शांत वाटेल. अमेथीस्टच्या बाबतीत असे म्हटले जाते कि अमेथीस्ट खडा तुम्ही समोर धरून तुमच्या आवडत्या व्यक्तीचे नाव आंतरीक प्रेमाने घ्या. ती व्यक्ती अगदी दुसऱ्याशी वचनबद्द असली तरीही तुमची हाक ऐकेल.

निद्रानाश वा रात्रीची वाईट स्वप्नांपासून बचाव करण्यासाठी अमेथीस्ट बेडरूममध्ये ठेवा. मुलांना वाटणारी अंधाराची भीती किंवा लहान-मोठ्यांना होणारा होम सिकनेस दूर करण्यासाठी याचा उपयोग होतो. रेकी ट्रीटमेंटचा प्रभाव वाढवण्यासाठी अमेथीस्टचा वापर करतात.

मेडीटेशन किंवा विजूअलायजेशन करताना दोन्ही भुवयांच्यामध्ये ठेवल्यास लवकर मन एकाग्र होईल. इतर खड्यांना रिचार्ज करण्यासाठी अमेथीस्ट त्यांच्या जवळ ठेवा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे दारूचे व्यसन सोडवण्यासाठी हा खडा उपयुक्त आहे.

सारांश :- Education साठी, Concentration साठी, दारू पिणार्यांसाठी माळ. आग्नेय दिशा सोडून इतर सर्व दिशेत ठेवू शकतो. व्यक्तीला शांत करते.

अमेथीस्ट स्टोन खरेदी करण्यासाठी पुढील लिंक https://amzn.to/3ylcI0G

अमेथीस्ट स्टोन ब्रासलेट खरेदी करण्यासाठी पुढील लिंक https://amzn.to/3hsYRyS

१३) ग्रीन अवेनच्युराईन (ग्रीन जेड) (Grenn Aventurine):-

प्रकार :- मायक्रो क्रिस्टलाईन कॉर्टज्, कधीतरी त्यात मायका समाविष्ट असल्यास अवेनच्युराईनला मेटॅलिक चमक येते.
रंग :- फिकट ते गडद हिरवा.
शारीरिक उपचार :- अनियमित हृदयाचे ठोके, फर्टीलीटी, जेनीटो-युरीनल प्रॉब्लेम्स, दुष्टी विकार जसे लांबची नजर, अॅस्टीगमेटीजम् (डोळ्यांचे विकार), डिसलेक्सीया (लहान मुलांना लिखाणाविषयी समस्या) या सर्वांवर प्रभावी.
भावनिक उपचार :- हा खडा रात्रभर हिरव्या झाडांच्या मातीत गाडून ठेवा. सकाळी खडा हातात घ्या त्यामुळे तुमच्या निराशा दु:खाची जागा आशादायी भावना व प्रसन्नता होईल.
व्यवहारीक उपयोग :- ह्याला लकी क्रिस्टल म्हणतात. हा खडा हिरव्या पाकिटात घालून तुमच्या जवळ ठेवा. हा खडा चार रस्त्यावर (चौकात) ठेवल्यास संधी तुमच्याकडे चालून येतील.
कामाच्या ठिकाणी :- हा मनी स्पिनर क्रिस्टल आहे. तुम्ही संधी घेण्यास तयार असाल तर ह्याचा उपयोग होईल. लहान-मोठ्यांचे लिखाण काम, टायपिंग, कम्पुटर, ज्ञान ह्यातील वळणदार लिखाण व कामात कलात्मकता वाढीस लावतो.

ग्रीन अवेनच्युराईन गर्भधारणेसाठी उपयुक्त खडा मानतात. स्त्री ओव्युलेशन पिरीयडच्या जवळ असताना जमिनीत एक लहान खड्डा खोदून त्यात एक कोंबडीचं अंड फोडून टाका, अंड्याच्या रिकाम्या कवचात एक ग्रीन अवेनच्युराईन खडा ठेवून तेही त्याच खड्यात पुरून टाका.

होमिओपॅथीक उपचारांचा प्रभाव वाढविण्यासाठी ह्या खड्याचा उपयोग करतात. तुमचं घर किंवा ऑफिस शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्यास ग्रीन अवेनच्युराईन जवळ ठेवा.

सारांश :- Money Flow खेचून आणतो, Prosperity चा स्टोन. illness घालवितो. घराच्या उत्तरेला ठेवू शकतो.

ग्रीन अवेनच्युराईन स्टोन खरेदी करण्यासाठी पुढील लिंक https://amzn.to/3jDGOc0

ग्रीन अवेनच्युराईन स्टोन ब्रासलेट खरेदी करण्यासाठी पुढील लिंक https://amzn.to/3wgrlRH

१४) स्क्रॉल ब्लॅक टर्मोलीन (वाईट नजरेपासून संरक्षणात्मक) (Scroll Black Tourmaline)

प्रकार :- सिलिकेट (सेमी प्रेसियस)
रंग :- काळा
शारीरिक उपचार :- सांधेदुखी, प्रतिकार शक्ती, हार्टप्रॉब्लेम, कंबर, पायामधील सल व मांसपेंशीची ताठरता कमी करण्यास मदत करतो. अन्ननलीकेच्या आजारांवर प्रभावी.
भावनिक उपचार :- मानसिक त्रास, ताण, आत्महत्येचा विचार, स्वत:ला हानी पोहोचणे, ड्रग्जच्या आहारी जाणे, दुख:तून बाहेर न पडणे अशा परिस्थितीत स्क्रॉलची मदत होते. एक्क्लकोंडे किंवा मनातील भिती डॉक्टरची किंवा कसलीही – अशा लोकांसाठी फायदेशीर.
व्यवहारीक उपयोग :- निंदक, कजाग शेजारी, मानसिक-शारीरिक त्रास देणारे जवळच्या लोकांपासून सुरक्षा मिळण्यासाठी स्क्रॉल परिधान करावा.

स्क्रॉलचा उपयोग तुम्हाला अशा मित्र-मैत्रिणी समोर करता येईल जे स्वत:चे प्रॉब्लेम्स, दु:ख तुमच्या माथी मारून मोकळे होतात किंवा जे तुम्हाला एखाद्या गोष्टी बद्दल अतिविचार करायला लावून घाबरून सोडतात.

सारांश :- ज्या व्यक्तीला दृष्ट लागते त्या व्यक्तीने घालावे, नजरेच्या त्रासापासून मुक्त करतो. याला दिशेचे बंधन नाही. घराला नजर लागू नये यासाठीही याचा उपयोग केला जातो. सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या वरती ठेवू शकतो. नकारात्मक उर्जेला बाहेर काढण्याचे काम हा स्टोन करतो. Car protection Kit मध्ये याचा समावेश आहे.

स्क्रॉल ब्लॅक टर्मोलीन स्टोन खरेदी करण्यासाठी पुढील लिंक  https://amzn.to/3jCy85v

स्क्रॉल ब्लॅक टर्मोलीन ब्रासलेट खरेदी करण्यासाठी पुढील लिंक  https://amzn.to/3Apunq8

१५) अॅमोनाईट  (Ammonite)

प्रकार :- अत्यंत दुर्मिळ असा अॅमोनाईटपासून निर्माण झाला आहे.
रंग :- चॉकलेटी, करडा
शारीरिक उपचार :- जनुकीय प्रसारित रोग, जुनी दुखणी अशा रोगांवर प्रभावशाली रत्न. गरोदरपणातील गुड-लक क्रिस्टल सत्तरी-ऐंशीमधील आजारांना प्रभावहीन करून वेदनाशमनाचे काम करतो.
भावनिक उपचार :- वारंवार होणाऱ्या चुकांपासून वाचवतो. नाते-संबंधाना जोडतो. सिजेरीन किंवा इमर्जन्सी डिलिवरी नंतर येणाऱ्या समस्या कमी करण्यासाठी बाळाच्या पाळण्याजवळ ठेवावा.

व्यवहारीक उपयोग :- अॅमोनाईट घरातील सुख, आरोग्य, धन व आनंद कायम टिकवून ठेवतो. गुड-लक व संरक्षणात्मक शक्ती देणारा म्हणून अॅमोनाईट ऑस्ट्रेलियापासून हिमालयापर्यंत प्रसिद्द आहे.

कामाच्या ठिकाणी :- धंद्याची सुरुवात करताना अॅमोनाईटची ग्राउंडींग पॉवर फायदेशीर ठरेल. फॅमिली बिझनेससाठी हा लकी चार्म सिद्द होईल.

सारांश :- जीवाश्म स्टोन (Money Back Gurantee), युनिव्हर्सल Energy खेचण्याची ताकद. लक्ष्मीमंत्र, बगलामुखी मंत्र, दुर्गाबिसा मंत्र, कुबेर मंत्र, महामृत्युंजय मंत्र (जलाभिषेक).

अॅमोनाईटस्टोन खरेदी करण्यासाठी पुढील लिंक https://amzn.to/3hybh8s

१६) अमॅझोनाईट (Amazonite)

प्रकार :- फेल्ड्स्पर
रंग :- निळसर हिरवा, फिरोजी ते गडद हिरवा पांढऱ्या रेघांसह
शारीरिक उपचार :- आरोग्यपूर्ण जीवन जगण्यासाठी अमॅझोनाईटची मदत होते. विशेषता नर्वस (मज्जातंतू) न्युरोलोजीकल समस्या, स्तनांशी निगडीत आजार, गळा, थायरॉइट ग्रंथी, वरील भागातील मणके, आजारानंतरची रिकव्हरीसाठी प्रभावशाली.
भावनिक उपचार :- विशेषता स्त्रियांमधील स्वयंभाव वाढवून स्वत:ला दुर्लक्षित करण्याच्या सवयीला प्रतिबंध करतो. मनातील रागाला तसेच चिडचिडेपणाला सकारात्मक उर्जेत रुपांतरीत करतो.
व्यवहारीक उपयोग :- मुख्यता नोकरी करणाऱ्या स्त्रियांचा ताण कमी करून कामाच्या सर्व आघाड्यांवर पुरून उरण्याचा स्टॅमीना देतो.

कामाच्या ठिकाणी :- तुम्हाला नवीन संधी साधण्यासाठी योग्य ठिकाणी योग्य वेळी पोहचण्याची प्रेरणा देईल.

स्वयंपाकघरात एका डिशमध्ये अमॅझोनाईट खडे भरून ठेवा, घरातील इतर सदस्यांना तुम्हाला मदत करण्याची आपोआप प्रेरणा मिळेल, मुलांच्या खोलीत ठेवल्यास त्यांना नीटनेटकेपणा व स्वच्छतेची सवय लागण्यास मदत होईल. अमॅझोनाईटची लक-चार्म बॅग तयार करा. एका पाकिटात (लहान पिशवीत) तीन अमॅझोनाईट खडे, सुकलेली तुळशीची व पुदिन्याची पाने भरून ते पाकीट पेटत्या मेणबत्ती समोर, मेणबत्ती संपूर्ण विझेपर्यंत ठेवा. तुमची लक-चार्म बॅग तयार. हि बॅग तुम्ही स्पर्धेचे एन्ट्री फॉर्म, लॉटरीचे तिकीट इ. बरोबर ठेवा. ऑनलाईन लॉटरी किंवा स्पर्धेसाठी कम्प्युटर जवळ ठेवा.

तुमच्या कंपनीच्या भरभराटीसाठी किंवा नवीन ऑर्डर मिळविण्यासाठी तुमच्या कामाच्या जागी वर्तुळाकारात नऊ अमॅझोनाईट लहान खडे ठेवा. तुमच्यातील बल-धाडस, एकाग्रता वाढवण्यासाठी किंवा एखादे काम किंवा ऑर्डर तुम्हाला मिळवण्यासाठी नऊ खडे बंद हातात घेऊन नऊ वेळा हलवा.

स्त्रियांच्या छुप्या कारवायांना तोंड देण्यासाठी ह्याचा उपयोग होईल.

अमॅझोनाईट स्टोन खरेदी करण्यासाठी पुढील लिंक https://amzn.to/3hwfDNj

अमॅझोनाईट स्टोन ब्रासलेट खरेदी करण्यासाठी पुढील लिंक https://amzn.to/3yeKvc7

१७) ब्लडस्टोन / हेलिओटॉप (Blood Stone)

प्रकार :- चाल्सीडॉनी प्रकारातील जस्पर
रंग :- गडद हिरवा, लाल किंवा नारिंगी ठिपके असलेला, कधी पांढरे ठसे असलेला.
शारीरिक उपचार :- पाठीच्या खालच्या भागातील वेदना, नाकातून रक्त येणे, अनेमिया, मधुमेह, हाय BP, रक्ताभिसरण, बोनमॅरो, आतडे, मासिक धर्मातील समस्या व गरोदरपणात उपयोगी.
भावनिक उपचार :- दबाव, ताण, धमक्या, मानसिक व शारीरिक छळ यावर प्रभावी.
व्यवहारिक उपयोग :- सर्व प्रकारचे खेळ खेळताना किंवा व्यायाम प्रकार करताना हा जवळ ठेवा.  

कामाच्या ठिकाणी :- अती स्पर्धात्मक वातावरणात काम करणे, अत्यंत कठीण ध्येय गाठण्याचे प्रेशर, यासाठी हा ब्लडस्टोन जवळ असावा. हेलिओट्रोप म्हणजे सूर्यासह वळणारा सूर्याचा दगड. अनेक संस्कृतीची धारणा आहे कि, हा सूर्याची शक्ती प्रसारित करून अनेक रोगांवर उपचार करणारा दगड आहे. हा दगड माता व मातृत्वातील अडचणी समजून घेण्यास मदत करतो. दबावाखाली राहणाऱ्या मुलांच्या जवळ ठेवल्यास त्यांच्यात फरक जाणवेल. धन किंवा पैसे आकर्षित करण्यासाठी घरात किंवा ऑफिसमध्ये एका काचेच्या भांड्यात काही नाण्यांसह ब्लडस्टोन अशा ठिकाणी ठेवा जेथे सूर्याची किरणे त्यावर पडतील. स्पर्धा जिंकण्यासाठी, खेळात विजय मिळवण्यासाठी तुम्ही खेळाडू असा व प्रेक्षक तुमच्या जवळ ठेवा.

सारांश :- Dark Green with Red Color spot. ज्यांना रक्ताचे विकार आहेत त्यांनी हा स्टोन घालावा. खेळाडूनेही हा स्टोन घालावा. घराच्या पूर्वेला ठेवू शकतो.

ब्लडस्टोन / हेलिओटॉप स्टोन खरेदी करण्यासाठी पुढील लिंक https://amzn.to/3hapaeb

ब्लडस्टोन / हेलिओटॉप ब्रासलेट खरेदी करण्यासाठी पुढील लिंक https://amzn.to/3xh77IN

१८) Citrin

प्रकार :- कॉटेज, नैसर्गिक रित्या उष्ण झालेला.
रंग :- पिवळा, पारदर्शक धूसर पिवळा ते सोनेरी, मधासारखा किंवा जवळ-जवळ चॉकलेटी.
शारीरिक उपचार :- त्वचेचे विकार, अॅलर्जी, लिव्हरच्या समस्या मेमरी लॉस, मुलांमधील बेड वेटिंग इत्यादींवर प्रभावी.
भावनिक उपचार :- अति कामाची सवय, कामाचा ताण, अति धाडस करण्याची सवय, जुगार, वाईट सवयींपासून सुटका करण्यास मदत होते.
व्यवहारीक उपयोग :- ह्या दगडाचा पिरॅमीड ठेवल्यास धन व सुआरोग्यास आकर्षित करून घरात आनंद व प्रकाश पसरवतो.
कामाच्या ठिकाणी :- बँक, कॅसिनो, मिडिया, स्पोर्ट व फिटनेस क्षेत्र, मेडिकल क्षेत्र. या सर्व क्षेत्रातील लोकांसाठी सहाय्यक. नैसर्गिक Citrin मध्ये स्थायुरूपी सूर्यप्रकाश समाविष्ट आहे. Citrin परिधानाचा दुहेरी फायदा होतो. निंदा, मत्सर, जळफळाट या विरुध्द तुमची ढाल बनतो व त्याच वेळी तुमच्याकडे धन आकर्षित करतो. गुड-लक जागृत करतो. नवजात बालकाच्या जवळ ठेवल्यास त्याच्यामधील शहाणपण, हुशारी, आनंद, स्म्ज्म उत्सुकता, विश्वास, धन इ. भावना वाढीस लागते.

चमकदार पिवळा Citrin फास्ट मनी व कमर्शियल सक्सेसाठी खूप फायदेशीर आहे. पर्समध्ये ठेवल्यास पैसे आकर्षित तर करतोच पण अनावश्यक खर्चावर आळा घालतो.

सारांश :- गुरुचं उपरत्न म्हणूनही धारण केला जातो. Money Flow आपल्याकडे खेचून घेण्याची ताकद. ईशान्य दिशेत वास्तुदोष असल्यास किंवा Block झाल्यास दीड किलो Citrin तिथे ठेवून देणे. आग्नेय दिशेला वास्तू दोष असल्यास पाव किलो Citrin आग्नेयला ठेवणे. Client येत नसतील तर Citrin ची माळा किंवा पेंडेंट घालणे. व्यक्तीच्या जवळ असणे (कोणत्याही स्वरुपात) गरजेचे आहे.     

Citrin विपुलतेचा आणि प्रकटीकरणाचा खडा असून, भरभराटी, संपत्ती, समृद्धी, यश व संधी अशा अनेक चांगल्या गोष्टी आकर्षित करणारा खडा आहे. Citrin हा आर्थिक अनुमान करण्यात आणि व्यवसायिक यशात आपली मदत करतो. अमर्याद खर्च टाळण्यासाठी व धन आकर्षित करण्यासाठी आपल्या पर्स वा पॉकेट मध्ये जरूर ठेवावा. घरातील व ऑफिसातील तिजोरीत ठेवल्यास चांगला परिणाम दिसून येतील. Citrin हा सूर्यप्रकाशामध्ये निस्तेज होतो.

Citrin हा डायबेटीसच्या treatment साठी अत्यंत उपयोगी असा खडा आहे, जेव्हा तो मॉस अगेट, सोडलाईट आणि chrysocalla बरोबर combine केला जातो. तो पचनसंस्थेसाठी उत्तम असा cleanser आहे. बद्दकोष्ट सारख्या आजारामध्ये पचनास उत्तेजन देतो. Citrin लिव्हर, पोट, स्वादुपिंड सारख्या अवयवांना cleanses करतो आणि किडनी व मूत्राशय संसर्ग निष्कळ (neutralize) करण्यात मदत करतो. हा स्टोन संपूर्ण शरीरासाठी उत्तम detoxifier आहे. जो meridians मधून energy blockage काढून टाकतो. तो डोळ्यांच्या प्रॉब्लेम्स मध्ये ही मदत करतो.

Nervouse System मध्ये Citrin हा एक सर्वोत्तम स्टोन मानला गेला आहे. जो आपल्याला स्ट्रेस, थकवा, डिप्रेशन, भीती, फोबिया पासून मुक्त करतो. हा एक positivity चा स्टोन मानला गेला आहे. लक्ष न देणाऱ्या किंवा एकाग्रता नसणाऱ्या मुलांसाठी अत्यंत उपयुक्त असा खडा आहे. ज्याच्या मदतीने self confidence व self esteem मध्ये आपण सुधारणा करू शकतो.

Citrin स्टोन खरेदी करण्यासाठी पुढील लिंक https://amzn.to/3yeNaT9

Citrin स्टोन ब्रासलेट खरेदी करण्यासाठी पुढील लिंक https://amzn.to/3dCIeQe

१९) क्रिसोबेरील (Chrysoberyl)

प्रकार :- अॅल्युमिनियम ऑक्साइट, ज्यात बेरीलीनचा समावेश आहे.
रंग :- स्वच्छ पिवळा, मधाळ, पिवळसर हिरवा चॉकलेटी
शारीरिक उपचार :- अन्ननलिका, अन्नपचन, उत्सर्जन, डायरिया, फूड अॅलर्जी, चेस्ट इन्फेक्शन, रोग प्रतिकार शक्ती, दृष्टी विकार यांवर गुणकारी.
भावनिक उपचार :- अशा लोकांना अत्यंत उपयोगी जे दुसऱ्यांच्या मतानुसार, दुसर्यांच्या तत्त्वांवर चालतात, वागतात. त्यांना स्वत:ची ओळख निर्माण करण्यास मदत करतो. त्यांना जीवनाची व जगाची पारख करण्यास स्वत:ची दृष्टी मिळते.
व्यवहारीक उपयोग :- एखाद्या मोठ्या समारंभाचे, खेळांचे कार्यक्रम, सामाजिक शिबीर वैगरेचे आयोजन करताना हे रत्न परिधान करा.
कामाच्या ठिकाणी :- उच्च प्रतिची वर्गवारी अपेक्षित असणाऱ्यांसाठी हे रत्न अत्यंत उपयुक्त आहे. मुलांना जीवन मूल्य शिकविताना स्वत:ची तत्व जपताना यांचा उपयोग होतो.

क्रिसोबेरील मधील चमकदार खडा कॅटआय ज्याला सिमोफेन असेही म्हणतात. तो घाईगर्दीमुळे होणाऱ्या अपघातापासून संरक्षण देतो तसेच गुडलकचे फायदे ही मिळवून देतो. पिवळ्या रंगातील क्रिसोबेरील व्यवसायाची भरभराट करतोच शिवाय व्यवसायासाठी एखादा धनाढ्य पार्टनर मिळवून देईल. हे रत्न उच्चप्रतीचे मूल्य, यश व कामगिरी करणाऱ्यांची अपेक्षा व क्षमतेचे प्रतिनिधित्व करते.

क्रिसोबेरील स्टोन खरेदी करण्यासाठी पुढील लिंक  https://amzn.to/3w8BIHj

क्रिसोबेरील स्टोन ब्रासलेट खरेदी करण्यासाठी पुढील लिंक  https://amzn.to/3htn0p1

२०) अंबर (Amber)

रंग :- अर्ध पारदर्शक ऑरेन्ज, सोनेरी पिवळा किंवा चॉकलेटी
शारीरिक उपचार :- फर्टीलीटी, दंतविकार, वेदनाशामक
भावनिक उपचार :- स्वत: निर्माण केलेलं अडथळे, कमजोर स्मरणशक्ती, नैराश्य, वाईट सवयी दूर करण्याचे धैर्य देतो.
व्यवहारीक उपचार :- दागिन्यात वापर केल्यास शरीरातील टॉकजिन्स (विषारी पदार्थ) दूर करण्यास मदत.
कामाच्या ठिकाणी :- समोरच्याची ताठर भूमिका व विरोधी वागणूक सौम्य होऊन तुमच्या विचारांशी सहमत करण्यास मदत करील. अंबरला वाघाच्या काळजाचा मानतात कारण अंबर परिधान करण्याऱ्यास धैर्यशीलता, शौर्याशीलता प्रदान करतो. आंतरिक उर्जा उर्जित करण्यास सहाय्यक ठरतो व निस्सीम प्रेमाची प्राप्ती करवितो. अंबर मधील इलेक्ट्रोस्टॅटीक ऊर्जेमुळे त्याला सर्वोत्कृष्ट उपचारक म्हणून ओळखतात.

सारांश :- शरीरामध्ये उष्णता निर्माण करतो, प्रतिकारशक्ती वाढवितो. मुलांना वयाच्या १२ वर्षानंतरच स्टोन दिला जातो परंतु हा स्टोन कोणालाही कधीही देवू शकतो. हा स्टोन कंबरेला बांधला जातो. यामुळे दात येतानाचे आजार मुलाला जाणवणारच नाही. अनुत्साही व्यक्तीसाठी हा स्टोन उपयुक्त फक्त उष्णता असलेल्या व्यक्तीने हा स्टोन घालू नये. विशिष्ट झाडाच्या चिकापासून बनवला जातो. 

अंबर स्टोन खरेदी करण्यासाठी पुढील लिंक  https://amzn.to/3dzuS76

२१) सनस्टोन

रंग :- सोनेरी नारंगी, लाल, लालसर चॉकलेटी किंवा चॉकलेटी-नारंगी आणि हिरवा चमक असलेला.
शारीरिक उपचार :- शरीराचा खालचा भाग सनस्टोनच्या प्रभावाखाली येतो. पचनसंस्था, जननसंस्था, पोटातील अल्सर, तळवे व पाय.
भावनिक उपचार :- सर्व प्रकारच्या भितीदायक भावना, पाण्याची भीती, डॉक्टरची भीती इत्यादीवर गुणकारी.
कामाच्या ठिकाणी :- पुढे जाण्यासाठी, लीडरशीप वा प्रमोशनची संधी चालून येण्यासाठी सनस्टोन परिधान करावा.

अपेक्षित भरभराट होते. कोणत्याही स्पर्धेत गुडलक व प्रसिद्धी मिळवून देते. कामाच्या धबगड्यातून स्वत:साठी वेळ काढण्याची उर्मी मिळते. तुमची उर्जा व धन शोषित करणार्यांपासून तुमचा बचाव करतो व तुमचे शोषण करणाऱ्यांसमोर तुम्हाला कणखर बनवतो. तुम्ही भावनिक दृष्ट्या दुसऱ्यांवर अवलंबून असाल तर तुमच्यासाठी हा उपयुक्त क्रिस्टल आहे.

सारांश :- Prosperity, Good Luck Stone आहे. सनस्टोन चा Pyramid बिजीनेस च्या गल्ल्यात, घरात कॅश च्या गल्ल्यात ठेवणे, पैसा खेचून आणतो.

सनस्टोन स्टोन खरेदी करण्यासाठी पुढील लिंक https://amzn.to/2Tn7wLj

सनस्टोन स्टोन ब्रासलेट खरेदी करण्यासाठी पुढील लिंक https://amzn.to/3xdvcAo

२२) रेड कारनेलीन

रंग :- लालसर चॉकलेटी, लालसर नारंगी
शारीरिक उपचार :- विशेषता पुरुषांच्या समस्यांवर प्रभावी, उर्जाहीनता, सांधेदुखी, मेल पोटेन्सी इत्यादींवर गुणकारी.
भावनिक उपचार :- मनातील राग, मत्सर, नात्यातील पझेसीवनेस कमी करण्यास सहाय्यक.
व्यवहारीक उपयोग :- हे जवळ असल्याने अलक्ष्मी जवळ फिरकणार नाही. उलट भरभराट तुमच्याकडे आकर्षिली जाईल. पैशाची जमवाजमव करताना हे परिधान करा.

कामाच्या ठिकाणी :- “क्रिस्टल ऑफ अॅम्बीशन” म्हटल्या जाणाऱ्या कारनेलीनला उच्च स्थानाचे ध्येय असणार्यांनीअवश्य जवळ ठेवावा. कामाच्या जागेतील सहकार्याचा, वरिष्ठाचा दबाव व अशक्य वाटणारे टार्गेट पूर्ण करण्याचा ताण यावर कारनेलीन उपयोगी ठरतो. रेडकारनेलीनला सूर्याचा दगड मानतात तसेच नर उर्जास्तोत्र ही म्हणतात. ज्या महिलांना स्वत:हास सिद्द करायचे असेल, कोणाच्याही मदतीशिवाय करीअर घडवायचे असेल किंवा स्वत:चे अस्तित्व टिकवायचे असेल अशा महिलांसाठी सहाय्यक कारनेलीनची अंगठी लकी व सुरक्षात्मक मानली जाते. अवजारांपासून होणाऱ्या अपघातांपासून सुरक्षा, प्रॉपर्टी विकणे, खरेदी करणे किंवा भाड्याने देणे यासाठी सहाय्यक स्टेजवर सादर होताना आत्मविश्वासासाठी उपयोग होतो. घराच्या संरक्षणासाठीही ह्याचा उपयोग करतात.

सारांश :- Ladies Special, Ladies ने त्यांच्या Health-Wealth, Prosperity साठी वापरावा. हा वास्तूत आग्नेय दिशेत ठेवतात. Ambitious माणसांनीही हा स्टोन घालावा.

रेड कारनेलीन स्टोन खरेदी करण्यासाठी पुढील लिंक https://amzn.to/3AqzHJA

रेड कारनेलीन स्टोन ब्रासलेट खरेदी करण्यासाठी पुढील लिंक https://amzn.to/3htkij5

२३) जेड

जेड या रत्नाला हरीतमणी असे ही म्हणता. हे रत्न धारण केल्याने व्यक्तीत वाकपटूता येते. हे रत्न व्यक्तीस दुर्घटनेपासून व जादू टोण्याच्या कुप्रभावापासून वाचवते हे रत्न धारण केल्यावर पोटदुखीचा आजार कमी होतो. किडनीची कार्यक्षमता वाढवण्यासाठी जेड हा एक उत्तम असा स्टोन आहे. घशाचे विकार, फुफ्फुसाचे विकार, मूत्रपिंडाच्या विकारात हा उपयोगी ठरतो. हृदयविकारात अत्यंत गुणकारी, रक्तशुद्धीसाठी उपयोगी आहे. जेडमध्ये रक्त थांबविण्याची नैसर्गिक गुणवत्ता आहे म्हणून गर्भधारणेत स्त्रीने जेड वापरावा.

खेळामध्ये हे रत्न सफलता प्राप्त करून देतो. हा एक यशदायी व भरभराटीचा स्टोन आहे. वेगवेगळ्या संधी प्राप्त करून देतो, गुडलक आणतो व ऐश्वर्यसंपन्न बनवतो.

जेड स्टोन खरेदी करण्यासाठी पुढील लिंक https://amzn.to/3qIRWWf

जेड स्टोन ब्रासलेट खरेदी करण्यासाठी पुढील लिंक https://amzn.to/3xestq5

२४) ओपल

ओपल हे सर्वात सुंदर व देखणे रत्न आहे. या रत्नामध्ये इंद्रधनुष्याचे रंग बघायला मिळतात हृद्य, पोट व पचनसंस्था यावर उपयुक्त सगळ्या तऱ्हेचे चर्मरोग, उष्णतेमुळे होणारा त्वचेचा दाह इ. वर प्रभावशाली आहे. शरीरातील अशुद्ध द्रव्ये बाहेर फेकण्याची क्षमता यात आहे. अर्ध डोकेदुखीचा विकार व ज्यांची स्मरणशक्ती कमी आहे त्यांनी जर हे रत्न कपाळावर किंवा भुवयांवर घासले तर त्याचा वरील विकार कायमचा नष्ट होऊ शकतो.

ओपल स्टोन खरेदी करण्यासाठी पुढील लिंक https://amzn.to/3dEgg6y

ओपल स्टोन ब्रासलेट खरेदी करण्यासाठी पुढील लिंक https://amzn.to/3ApaEXl

२५) मेलाकाईट

हा एक अत्यंत प्रभावशाली स्टोन आहे. हा स्टोन Negative Energy व प्रदूषण सहज शोषून घेऊ शकतो. एखाद्याच्या घराजवळ Nuclear किंवा Natural Radiation Sources असल्यास आपल्या घरात मेलाकाईट स्टोन जरूर ठेवा, तो Electromagnetic Pollution ला मारून टाकतो.

घरात किचनमध्ये ओव्हन जवळ, टिव्ही व कंप्युटर जवळ ठेवल्यास त्याच्यातून येणाऱ्या रेडीयेशन्स पासून आपला बचाव होतो. या स्टोन पासून Intution Power मध्ये वाढ होते. तसेच बिजीनेसमध्ये successs येण्यासाठी वापरला जाऊ शकतो.

मेलाकाईट Blood Pressure कमी करण्यास मदत करते तसेच संधिवात, पॅराथाइरॉइड, Fracture मध्ये उपयोगी आहे. डायबेटीस झाल्यास गळ्यात घातल्यास उत्तम.

मेलाकाईट स्टोन खरेदी करण्यासाठी पुढील लिंक https://amzn.to/3qGLfUR

वास्तूतज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय वास्तूसंदर्भात व वरील उपायांसंदर्भात कोणताही निर्णय घेवू नये. 

अधिक माहिती साठी संपर्क :-
वास्तुशास्त्र / ज्योतिष / रेकी तज्ञ श्री. मनोजकुमार आप्पा मोहिते
इमेल :- vastusiddhii@gmail.com
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhii/
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhi
Calling No. 83698 84338
Whatsapp no. 88280 53505