घर-ऑफिस चा उंबरठा कसा असावा? – Threshold of office and home



घर-ऑफिस चा उंबरठा कसा असावा?

दरवाज्यासमोर उंबरठा असेल तर विक्षेप देवतेचा लोप होतो. नवीन फ्लॅट संस्कृतीलाही असा उंबरठा असावा. प्रत्येक दिशेचा उंबरठा वेगळा करता येऊ शकेल याचा परिणाम अतिशय शुभ होतो.

उदाहरणार्थ

१) मुख्य दरवाजावर ५ मुखी रुद्राक्षाचे तोरण लावावे तसेच ओंम, स्वस्तिक, त्रिशूळ, शुभ-लाभ, मंगल कलश, प्रणव व श्री आदि सुचिन्हांचा (पितळेची) वापर करून प्रवेश विभाग सजवल्यास विपरित ऊर्जा कमी होण्यास मदत होते.
२) पूर्व दिशेचा उंबरठा चांगल्या लाकडाचा करावा, त्यावर स्फटिक, चांदी यांचा वापर करून उंबरठा सुशोभित करावा.
३) आग्नेयेला चंदनाचा उंबरठा असावा, त्यावर पुष्कराज, हळकुंड, तांब्याची नाणी वापरून त्याचे सुशोभन करावे.
४) दक्षिण नैऋत्य दिशेचा उंबरठा जैसलमैर पिवळ्या दगडाचा करावा. त्यावर स्फटिक व शिसं धातूची पट्टी वापरून सुशोभन करावे.
५) दक्षिणेचा उंबरठा नीलम, तांब्याची पट्टी, शिसे, धातूचे गोळे, छोटा रक्तचंदनाचा तुकडा इत्यादी वापर करून सुशोभन करावे.
६) पश्चिम वायव्येचे उंबरठे, स्टेनलेस स्टील, ब्रास, निळा रंग वापरून करावेत व पश्चिमेस नीलम तर वायव्येला गोमेद या रत्नाचा वापर करावा.
७) उत्तर ईशान्येचे उंबरठे पांढऱ्या संगमरवराचे करावे. माती, स्फटिक, चांदीची नाणी वापरून सुशोभन करावं.

वास्तुशास्त्रासंदर्भात योग्य ते मार्गदर्शन उपाययोजनांसहित दिले जाईल.

वास्तूतज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय वास्तूसंदर्भात व वरील उपायांसंदर्भात कोणताही निर्णय घेवू नये. 

अधिक माहिती साठी संपर्क :-
वास्तुशास्त्र / ज्योतिष / रेकी तज्ञ श्री. मनोजकुमार आप्पा मोहिते
इमेल :- vastusiddhii@gmail.com
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhii/
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhi
Calling No. 83698 84338
Whatsapp no. 88280 53505

Leave a comment