आई वडिलांची खोली चुकीच्या दिशेला असेल तर काय होईल?


१) पूर्व दिशेस पालकांचे शयनकक्ष आल्यास सकारात्मक आहे.

  • यामुळे पालक शांत राहणार.
  • मुलांच्या संसाराची जबाबदारी घेणार नाहीत.
  • यांचे देवधर्माकडे जास्त लक्ष लागणार.
  • हे मुलांच्या संसारात हस्तक्षेप करणार नाहीत.
  • परिणामस्वरूप generation gap कमी होऊन भांडणं होणार नाहीत.
  • पालकांची Health चांगली राहणार.

२) आग्नेय दिशेस पालकांचे शयनकक्ष आल्यास नकारात्मक आहे.

  • या वयात माणसाला शांती हवी असते, Relaxation हवं असत. धावपळ त्यांच्या शरीराला त्यांना मानवत नाही. गडबड गोंधळ याला शरीर साथ देत नाही.
  • या वयातील लोकांनी संसारातून निवृत्त होणे गरजेचे आहे त्याच्यामुळे त्यांना त्यांच्या जीवनात सुख समाधान मिळू शकते, यांनी देवधर्म करावा.
  • पुढच्या पिढीला वेळेतच संसार करण्यासाठी Capable करणे. संपूर्ण घराची जबाबदारी देणे.
  • एका पिढीने दुसर्या पिढीला जबाबदारी वेळेतच (Handover करणे) देणे हि काळाची गरज आहे नाहीतर कुटुंबात भांडणं होऊ शकतात.
  • पूर्व, उत्तर व ईशान्येकडे झोपणार माणूस निवृत्तीचे विचार करायला लागतो म्हणून parents ला या दिशेत झोपवणे गरजेचे आहे.
  • Parent’s ला आग्नेय दिशेच्या Bedroom मध्ये झोपविल्यास ते Aggressive होतील हे त्यांच्या शरीराला मानवणारे नाही, पर्यायी Health Problems सुरु होतील.
  • ते मुलांच्या संसारामध्ये ढवळाढवळ करणार, छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होणार.
  • मुलगा-वडील/सासू-सून यांच्यात दरी निर्माण होऊन कुटुंबे मोडली जाणार, नाती दुरावली जाणार.

३) दक्षिण दिशेस पालकांचे शयनकक्ष आल्यास नकारात्मक आहे.

  • पालकांना (५५ ते ६० वय) शारीरिक धावपळ मानवत नाही, कारण हि लोकं मुलांच्या संसाराची जबाबदारी घेतात आणि स्वतःहून त्रास करून घेतात. असे पालक हट्टी होतात. या दिशेमुळे पालक मुलांच्या संसारामध्ये ढवळाढवळ करतात. उदा. सुनेने ड्रेस कोणता घातला गेला पाहिजे, हे ठरविणे. कुठलीच गोष्ट हि मुलांची ऐकणार नाही पर्यायाने Generation Gap निर्माण होऊन कुटुंब व्यवस्था विस्कटणार.

४) नैऋत्य दिशेस पालकांचे शयनकक्ष आल्यास नकारात्मक आहे.

  • या दिशेस जर पालकवर्ग झोपत असतील तर त्यांचा प्रत्येकांवर वर्चस्व राहणार. खास करून सुनेवर त्याचा प्रभाव जास्त दिसून येणार. 
  • संपूर्ण घराची जबाबदारी पालक घेणार. अशा वयोगटातील लोकांना जास्त धावपळ, टेन्शन जमत नाही. परिणामस्वरूप त्यांचे indirectly health प्रॉब्लेम्स सुरु होतात. 
  • हि माणसे शेवटपर्यंत घराची चावी सोडत नाहीत. सून समजूतदार नसेत तर या घरात दररोज भांडणे होणारच.
  • पालक मुलांच्या संसारात ढवळाढवळ करणार, परिणामस्वरूप कुटुंब व्यवस्था विस्कळीत होणार.
  • जर सून समजूतदार असेल तर ती जबाबदारी झटकून पालकांवर अवलंबून राहणार. पालकही आनंदाने ती जबाबदारी घेणार. परिणामस्वरूप मुलं-मुली फिरायला जाणार, पिक्चरला जाणार, लेट येणार. मुलं ऐशोआरामात वेळ घालवणार.

५) पश्चिम दिशेस पालकांचे शयनकक्ष आल्यास नकारात्मक आहे.

  • पालक मुलांच्या संसारात लुडबुड करतात, मुलांच्या संसाराची जबादारी घेतात त्यामुळे दोन पिढीमध्ये वाद निर्माण होतात.
  • पालकांना जबाबदारीची दगदग न पेलवण्याने Health Problems त्यांच्या मागे लागतात.

६) वायव्य दिशेस पालकांचे शयनकक्ष आल्यास नकारात्मक आहे.

  • वायव्य दिशेस झोपणारा व्यक्ती विचाराने चल-बिचल होतो त्यामुळे स्वभाव भांडखोर होतो. नवरा-बायको मध्येच जास्त भांडणे होतात. आई ईशान्य दिशेला झोपत आहे त्यामुळे त्यांच्या दोघांतील भांडणाची तीव्रता कमी असेल.
  • हे गरज नसताना देखील मुलांच्या संसारात लक्ष देतात त्यामुळे घरात भांडणे होतात.
  • येथे झोपणाऱ्या व्यक्तीला मनाची शांती कधीच लाभत नाही त्यामुळे यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतात.

७) उत्तर दिशेस पालकांचे शयनकक्ष येत असल्याने सकारात्मक आहे.

  • यामुळे पालक शांत राहणार.
  • मुलांच्या संसाराची जबाबदारी घेणार नाहीत.
  • यांचे देवधर्माकडे जास्त लक्ष लागणार.
  • हे मुलांच्या संसारात हस्तक्षेप करणार नाहीत.
  • परिणामस्वरूप generation gap कमी होऊन भांडणं होणार नाहीत.
  • पालकांची Health चांगली राहणार.

८) ईशान्य दिशेस पालकांचे शयनकक्ष आल्यास सकारात्मक आहे.

  • यामुळे पालक शांत राहणार.
  • मुलांच्या संसाराची जबाबदारी घेणार नाहीत.
  • यांचे देवधर्माकडे जास्त लक्ष लागणार.
  • हे मुलांच्या संसारात हस्तक्षेप करणार नाहीत.
  • परिणामस्वरूप generation gap कमी होऊन भांडणं होणार नाहीत.
  • पालकांची Health चांगली राहणार.

वास्तूतज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय वास्तूसंदर्भात व वरील उपायांसंदर्भात कोणताही निर्णय घेवू नये. 

अधिक माहिती साठी संपर्क :-
वास्तुशास्त्र / ज्योतिष / रेकी तज्ञ श्री. मनोजकुमार आप्पा मोहिते
इमेल :- vastusiddhii@gmail.com
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhii/
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhi
Calling No. 83698 84338
Whatsapp no. 88280 53505

 

Leave a comment