घराचे वास्तू शास्त्र


घर बांधताना (when building a new house)….

वास्तू आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टींशी निगडीत असल्याने बांधकामापूर्वी अनेक गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. समृद्धी, यश, शांती, चैतन्य यांचा प्रत्यक्ष संबंध वास्तूशी जोडला जात असल्याने वास्तूची निवड व बांधकाम करताना नियोजन व वास्तूशास्त्रातील मूलभूत नियमांचा आग्रह धरताना बहुतेकजण दिसतात. यामागे अंधश्रद्धेचा भाग नाही, तर घर बांधतच आहोत तर वास्तूचे काही नियम पाळल्यास काय हरकत आहे, असा सरळ विचार त्यामागे असतो.

  • घर बांधण्यापूर्वी सर्वांत महत्त्वाचे काम म्हणजे प्लॉट निवड. प्लॉटच्या उत्तर दिशेला किवा पूर्वेकडे मोठा वृक्ष नाही याची खात्री करतानाच दक्षिणेस खड्डा किवा विहीर नसावी याची दक्षता घ्यावी. प्लॉटचा आकार त्रिकोणी नसावा, चौरस किवा समचतुष्कोण आकार घर बांधण्याकरीता आदर्श मानले जाते.
  • वाकडे- तिकडे व अनियमित आकाराच्या प्लॉटवर बांधकाम केल्यास आर्थिक हानी किवा मतभेदात वाढ होण्याची शक्यता असते. मध्यभागी प्लॉट बसका असल्यास अनेक क्षेत्रात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. पूर्व दिशेकडे तोंडवळा असणारे घर शुभ मानले जाते. स्वयंपाक घर मोकळे, हवेशीर असण्यासोबतच त्यांची दिशाही लक्षात घ्यावी.
  • गृहिणी स्वयंपाक करताना तोंड दक्षिणेकडे नसले म्हणजे झाले. टॉयलेटसची दिशा व जागा ठरवताना विशेष खबरदारी घ्यावी. दक्षिण किवा पश्चिमेस टॉयलेट्स ठेवल्यास योग्यच. उत्तर दिशेकडील प्लॉटही उत्तम. नदी, तलाव, विहिर, झरे प्लॉटच्या पूर्वेस किवा उत्तरेस असावे. घराचा मुख्य दरवाजा किवा प्रवेशद्वार कोणत्या दिशेने असावे यावंर घराचे सौदर्य खुलण्यासोबतच इतरही गोष्टी निगडीत असतात. घराचा मुख्य दरवाजा ईशान्येस असावा.
  • अगदी दुसरा पर्यायच नसला तर पश्चिमेकडे दरवाजा ठेवण्यासही हरकत नाही. घर बांधून काही जागा शिल्लक रहावी याची दक्षता घ्यावी. उत्तर किवा पश्चिमेकडचा भाग मोकळा ठेवल्यास चैतन्यात वाढच होईल.

घर बांधताना काय काळजी घ्याल? (Precautions while building a new house)

प्लॉट खरेदी केल्यानंतर घर बांधताना आपल्याला खूप गोष्टींचा विचार करावा लागतो. प्लॉटच्या चारही बाजूंनी येणारे रस्ते, प्लॉटची लांबी-रूंदी, प्लॉटवर असलेली झाडे आदी गोष्टी लक्षात घेऊन घराचे बांधकाम करावे लागत असते. घर बांधताना वास्तुशास्त्राचा आधार घ्यावा लागत असतो. वास्तुशास्त्रात घर कुठे बांधावे व कुठे बांधू नये, या संदर्भात काही नियम व माहिती सांगितली आहे. ती पुढील प्रमाणे…

  • ब्रह्मदेव, विष्णू, सूर्य, शिवशंकर तसेच जैन मंदिरासमोर किंवा मागील प्लॉटवर घराचे बांधकाम करू नये.
  • घर बांधताना उत्तर, पूर्व व इशान्य दिशेला अधिक जागा सोडावी. घराच्या छताचा उतारही उत्तर किंवा इशान्य दिशेला केला पाहिजे. घरातील नळ किंवा घराबाहेर केलेली बोअरवेल ईशान्य किंवा नैऋत्य दिशेच्या कोपर्‍यातच पाहिजे.
  • खिडक्या पूर्व व उत्तर दिशेला जास्त प्रमाणात ठेवल्या पाहिजेत. दक्षिण दिशेला खिडक्या ठेवू नये. आग्नेय कोपर्‍यात स्वयंपाक खोली ठेवावी. आउट हाऊस नेहमी पश्चिम किंवा दक्षिण दिशेला व गाडी ठेवण्याचे शेड पूर्व किंवा उत्तर दिशेला बनवले पाहिजे.

घराच्या मुख्य दरवाज्याचेही काही नियम आहेत (Rules of main entrance door of house)

  • घराच्या मुख्य दरवाज्यासमोर रस्ता नसावा. दरवाज्यासमोर रस्ता असल्यास आपल्या विकासात बाधा येते.
  • दरवाज्यासमोर मोठे झाड असल्याने घरातील मुले नेहमी आजारी पडतात.
  • दरवाज्यासमोर नेहमी पाणी वाहते ठेवल्याने नेहमी आर्थिक नुकसान होत असते.
  • दरवाज्यासमोर मंदिर असेल तर घरात कधीच सुख नांदत नाही.
  • घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर स्तंभ (खांब) असतील तर त्या घरातील महिला नेहमी आजारी पडतात.
  • जमिनीच्या तुलनेत घराचा दरवाजा खोलगट भागात असेल तर घरातील मुख्य पुरुष व्यसनाधीन व नेहमी दु:खात बुडालेला असतो.
  • घरासमोर रस्ता, मंदिर असेल तर घरासमोर अधिक जागा सोडल्याने दोष नाहीसे होतात.
  • घराचे मुख्य प्रवेशद्वार घरातील इतर दरवाजापेक्षा मोठे असावे.

द्वार भेद (Gate distinction)… 

१) मुख्य दरवाजासमोर मोकळी जागा असणे गरजेचे आहे, म्हणजे पूर्वीच्या भाषेत आंगण असणं होय, कारण मुख्य दरवाजातून (प्रवेशद्वारातून) आपल्या घरात विशिष्ट प्रकारची positive energy म्हणजे लक्ष्मी येत असते, येणारी लक्ष्मी ही राजमार्गाने आली पाहिजे, सन्मानाने आली पाहिजे.
२) आपल्या दरवाजासमोर दुसऱ्याचा प्रवेशद्वार चालत नाही, ते वास्तुशास्त्रास मान्य नाही, जागा मोकळी पाहिजे.
३) मुख्य प्रवेशद्वारासमोर चढता-उतरता जिना चालत नाही, चढता जिना असेल तर अडचण त्यात झाली पाहिजे, उतरता जिना असेल तरी चालत नाही, कारण खाली खड्डा आला, नुकसान जास्त होते.
४) दरवाजासमोर किंवा बाहेर कमीत कमी १० ते १५ फुट अंतर पाहिजे नाहीतर positive एनर्जी कमी होईल त्यामुळे चांगल्या संधी येण्याचं प्रमाण कमी होऊन प्रगती होणार नाही.
५) वास्तुशास्त्रात lift मान्य नाही, lift असणं हे आपल्या घराच्या दृष्टीने negative आहे.
६) दरवाजासमोर भिंत आली तरी अडचणी येतात.
७) एखाद्याचं घर, दुकान, रस्त्याला लागून आहे व घर व दुकानासमोर झाड, गटार, इलेक्ट्रीक खांब, कचरापेटी, इलेक्ट्रीकची लाल डिकी, दरवाजासमोर मंदिर, हॉस्पिटल असे काही आले म्हणजे त्याला द्वारभेद झाला असं म्हणतात, म्हणजे मुख्य दरवाजासमोर अडचण आली व ती घरात येते.
८) मुख्य दरवाजाच्या बाजूला चप्पल रॅक नको, आत व बाहेर मोकळी जागा पाहिजे, तसं नसेल तर common वास्तुदोष आहे, ह्याला पर्याय एक, ओपन स्पेस – तेथून चप्पलेचे कपाट हलवा, दूर ठेवा.

द्वारभेद दोषावर रेमेडीज ने उपाय करता येतो.

ओपन स्पेस (Open space near house)… 

घराच्या आजूबाजूला असलेली open space (मोकळी जागा) म्हणजे बाल्कनी, व्हरांडा, आंगण.  दक्षिण पश्चिमेला ओपन स्पेस असेल तर ताम्रकीरणं शोषली जातात, विशिष्ट percent ताम्रकीरणांचा प्रभाव वाढला कि घातक ठरतात, त्याचा परिणाम मानवाला घातक ठरतो. उत्तर व पूर्वेला balcony आली तर positive असते, पूर्व जर सरळ असेल तरच.

किचन (Setup of Kitchen)…

१) किचन मध्ये जेवण बनवताना चेहरा नेहमी पूर्वेकडे असनं सर्वात चांगलं, जर पूर्वेकडे नाही मिळाला तर उत्तरेला चेहरा गेला तरी चालेल.
२) किचनच्या दक्षिणेला सर्वात जास्त वजन देणे गरजेच आहे.
३) किचनच्या पश्चिमेला second priority देणे (वजन ठेवण्यासाठी).
४) किचनच्या पूर्वेची wall जेवढी मोकळी ठेवता येईल तेवढी ठेवणे, उत्तरेची wall पण ओपन ठेवणे.
५) किचन मध्ये ग्रोसरी (धान्य साठवण) हे नेहमी दक्षिण-पश्चिमेला ठेवणे, येथे रोज वापरायचे धान्य ठेवणे.
६) किचन ची crockery पूर्व-उत्तर भागातच ठेवणे .
७) किचनच्या वायव्य भागात आपल्याला अन्न धान्याचा थोडातरी साठा display ला पाहिजे. उदा: तांदूळ, गहू, मसाले पदार्थ, डाळी इ.
८) Fridge, Mixer, Oven यांना किचनच्या आग्नेय भागात setup देऊ शकता.
९) किचनच्या वायव्येला एक फोटो फ्रुट, अन्नधान्याचा original किंवा फ्रेम असेल तर चालेल असा ठेवणे.
१०) फ्रिजवर कुठल्याच पद्धतीचे सामान न ठेवणे.
११) मॉड्युलर किचन सर्वात चांगलं. किचन मध्ये सर्व सामान display बंद असावं, जेवढा पसारा कमी तेवढ चांगलं. किचनच्या platform वर फक्त gas व दिवसभरात जेवण एवढेच ठेवणे.

घरातील लाद्या (Tiles of house)…

१) टाईल्स मध्ये फुलांचे किंवा फ्रूटचे डिझाईन लावणे.
२) Dull भिंती आपल्या घरात नको.
३) घराला नेहमी लाईट कलर करावा किंवा hall मध्ये टाईल्स लावाणे.
४) घरात कोणत्याही room मध्ये धोलपुरी लादी लाऊ नये किंवा मार्बल लाऊ नये.
५) Perfect ईशान्याला देवघर आला तर देवघर मार्बलचेच बनवा किंवा त्या भागातच मार्बल ची टाईल्स लावा.
६) मार्बलची लादी घराला लावली तर सतत health problem चालू राहतील.

कर्त्यापुरुषाचा शयनकक्ष (Master Bedroom) (SW) :- कर्त्यापुरूषाची जागा…

घरमालकाची जागा म्हणजे नैऋत्य दिशा आहे. घरमालकाची राहण्याची जागा. Master Bedroom चा अधिकारी झोपण्यासाठी first-वडील, second-मोठा मुलगा, third-छोटा मुलगा असे प्राधान्य द्यावे.

First Option :-

१) जो संपूर्ण घराची जबाबदारी घेतो किंवा घेणार आहे त्यानेच master bedroom मध्ये झोपावे.
२) जो बेफिकीरपणे वागतो मग तो मोठा मुलगा असला तरी त्याला master bedroom मध्ये झोपवू नये.
३) वास्तुशास्त्रानुसार जो जबाबदारी घेतो व वयाच्या 50 च्या आतील व्यक्तीने master bedroom मध्ये झोपलंच पाहिजे.

Second Option :-

दक्षिणेला मोठा मुलगा, नैऋत्येला वडील व पश्चिमेला छोटा मुलगा झोपत असतील तर मोठ्या मुलाचं वय
30-35 असेल तर त्याला SW (नैऋत्य) लाच झोपवावे, वडील 50 च्या पुढे गेले कि त्यांना पूर्वेला झोपवावे, छोटा मुलगा 25 वयाचा असेल तर त्याला पश्चिमेला झोपवावे ,कारण त्याला अनुभव नसतो ,जबाबदारी नसते म्हणून छोट्या मुलाला चुकूनही SW (नैऋत्य)ला झोपवू नये.

जर एखाद्या घरात सगळे कमवतात उदा.आई, वडील, मोठा मुलगा, लहान मुलगा, तर बघावे कि कोणती व्यक्ती घराची जबाबदारी जास्त सांभाळू शकते. अश्याच व्यक्तींनी SW (नैऋत्य) ला झोपावे. जर छोटा मुलगा जास्त कमावतो व तो चांगल्या पद्धतीने संपूर्ण घर सांभाळतो तर त्याला SW (नैऋत्य) ला झोपवावे. जर SW (नैऋत्य) नाही मिळाली तर S (दक्षिण) ला झोपवायला हरकत नाही. त्या घरातील सगळ्यात strong जागा / bedroom कोणती असेल तर तिथे झोपवावे.

एखाद्या घरात फक्त म्हातारे आई-वडील राहतात व त्यांचा मुलगा लांब असतो (बाहेरगावी राहत असेल) अशांनी म्हणजे आई-वडिलांनी SW लाच झोपावे.

SW ची जागा कधीही मोकळी ठेवू नये. घरातील एक व्यक्ती तिथे झोपलाच पाहिजे.

जर एखाद्या घरात फक्त आई व मुलगी राहत असेल तर त्या दोघीही लेडीजने SW (नैऋत्य) ला झोपावे. मात्र जर काही महिन्यानंतर मुलीचं लग्न करायचं ठरवलं तर मुलीने वायव्यला झोपावं.

SW (नैऋत्य) ची arrangement करताना दक्षिण भिंतीला त्यांचा बेड गेला पाहिजे. झोपताना डोकं दक्षिणेला, पाय उत्तरेला गेले पाहिजे.

तिजोरीची जागा SW (नैऋत्य) मध्ये करणे गरजेचे आहे.

कपड्याचं कपाट दक्षिण व पश्चिम भागातच करणे.

पूर्व व उत्तरेला dressing table करणं गरजेचं आहे.

उत्तरेच्या भिंतीला working table पाहिजे.

Master Bedroom च्या उत्तरेच्या भिंतीला computer table ठेवणे, laptop table पण चालेल.

Master Bedroom च्या नैऋत्य दिशेत family photo येणं गरजेचे आहे.

त्या घरात जेवढे राहतात ,त्या सर्वांचा फोटो म्हणजे मोठा भाऊ किंवा इतर भाऊ व आई-वडील या सर्वांचा चांगला contact
असला पाहिजे तरच एकत्र family चा फोटो लावणे.

Master bedroom च्या वायव्य भागात अनेक वेळा राधाकृष्णाचा फोटो ठेवायला लावतात का तर नवरा-बायको मध्ये वाद निर्माण होतात ते कमी व्हावे म्हणून, किंवा अगदी जर फोटो ठेवायचा असेल तर त्या घरातल्या नवरा-बायकोचा दोघांचा हसरा पोझमधला त्यांना आवडणारा फोटो जरूर लावणे कारण त्या आठवणीने त्यांच्यातला दुरावा कमी होतो.

मुलांचा शयनकक्ष (Children Bed)…

मुलांनी अभ्यास करताना नेहमी पूर्व दिशेकडे पाहूनच अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यांच्या room मध्ये cricket पटू, इतर खेळाडूंचे फोटो लावले तर चालेल, पण hero-heroine चा फोटो कधीही लावू नये.

मुलं लहान असे पर्यंत म्हणजे ४ थी पर्यंत कार्टून घरात लावले तर चालेल पण नंतर नको, कारण मुलं जशी जशी मोठे होतात तसे ते कार्टून सारखे बनतात, आपल्याला त्यांना तसे बनून द्यायचं नाही.

मुलांचा कल ओळखून तसा फोटो लावणे, आणि अगदी विचार केलाच तर मुलांच्या room मध्ये स्वामी विवेकानंदांचा फोटो लावणे, कारण फोटो आयडियल आहे, सात्विक आहे.

समजा एखाद्या मुलाला-मुलीला मोठं झाल्या नंतर hero-heroine बनायचं आहे तर त्याचा-तिचा आवडता hero-heroine ज्याचं life खूप चांगलं आहे ,असा hero-heroine चा फोटो लावावा.

मुलांच्या bedroom मध्ये सरस्वती चा फोटो पाहिजे, दररोज गुरूबद्दल आदर पाहिजे.

मुलांच्या room मध्ये भडक कलर, भडक चित्र वापरायचे नाही.

मुलांच्या बेड वरची बेडशीत हि कार्टून ची राकू नये.

मुलांचा separate पद्धतीचा बेड असावा, अगदीच जागा कमी असेल तर bag बेड चालेल.

मुलांच्या उत्तर किंवा पूर्वेच्या front ला शिवाजी महाराजांचा फोटो लावणे.

मुलींच्या bedroom मध्ये दक्षिणेच्या भिंतीला त्यांच्या चांगल्या पोज मधले फोटो लावणे.

आरसा (Mirror positions in house)…

१) आरशाचा विचार केला तर आपल्या घरात आरसा कुठेही लावला नाही पाहिजे. जर आरसा असेल तर त्याला पडदा लावला पाहिजे, कारण आरशात नेहमी बाहेरचे प्रतिबिंब पडतच असतात, आणि ते प्रतिबिंब positive व negative असू शकतात.
२) ज्या ठिकाणी तुम्ही आरसा लावला असेल तेथे त्या आरशातून बघणे कि बाहेरचं प्रतिबिंब पडतं का नाही, जर पडत असेल तर तेथून आरसा काढून टाकणे.
३) आरसा हा नेहमी बंद असावा, कारण तो जर ओपन असेल तर सर्व प्रतिबिंब तो खेचत असतो, तेही डबल वेगाने आपल्यावर टाकत असतो.
४) आरशाचा महत्त्वाचा गुणधर्म आहे कि आलेली वस्तू फेकून देणे, हे त्याच कामच आहे आणि म्हणून आरसा नको, कारण आरसा खूप negative आहे.
५) आरशाला भारतीय वास्तुशास्त्रात प्रवेश नाही.

शयनकक्षेेतील आरसे (Mirror in bedroom):-

१) Bedroom मध्ये आपण नेहमी आराम मिळावा म्हणून जातो, पण आरसा आपल्याला negative energy देतो.
२) जेव्हा माणूस झोपतो तो आयडियल असतो, तो प्रतिकार करू शकत नाही, तो न्युट्रल position मध्ये जातो. जर त्या room मध्ये आरसा असेल तर त्याची सगळी energy घेत असतो, तो आरशाचा गुणधर्मच आहे. आरसा वास्तू साठी negative आहे.
३) झोपताना वाईट विचार असेल तर तो खेचून घेतो, म्हणून सकाळी उठल्यावर आरशात चेहरा बघू नये.
४) टीव्ही चा आरसा, टीव्ही बंद असेल तरी त्या काचेत प्रतिबिंब दिसत असते, ते negative आहे.
५) आरसा bathroom मध्ये चालेल कारण त्यामध्ये बाहेरचे प्रतिबिंब पडत नाही.

अभ्यासाचा टेबल (Study table) :-

१) अभ्यासाची जागा हि उत्तर, पूर्व, ईशान्य भागातच आली पाहिजे. मुलांचे तोंड अभ्यास करताना ह्या दिशांमध्ये पाहिजे,
कारण हि जागा अभ्यासाला आयडियल position आहे, म्हणून N,E,NE भागातच अभ्यास करणे गरजेचं आहे. मग या दिशा living room मध्ये आल्या तरी चालेल.
२) समजा study room केली तर पूर्ण मोकळी असावी, त्या room मध्ये फक्त study table, पुस्तकांचा wardrobe, मुलांच्या कपड्यांचा wardrobe, एखादं चित्र, नोटीस बोर्ड, एवढंच असणं गरजेचं आहे. जेवढी हलकी व सुरक्षित room असेल तेवढं मुलांचं लक्ष वेधून घेतं. पुस्तकाचे कपाट काचेचं असावं ज्यामधून मुलांना पुस्तके दिसली पाहिजे, म्हणजे त्यांच्या नजरेत पुस्तके दिसली तर ते वाचायला घेतात.
३) मुलांचा room नेहमी पश्चिमेलाच पाहिजे, आणि त्या दिशेचं region मिळत असेल तर मुलांचा तेथे study table जरूर करावा, नाही मिळाला तर study table बनवा पण अभ्यासाला पाठांतरासाठी त्याला N,E,NE भागातच बसवावं.
४) मुलांच्या room मध्ये लाईट कलर किंवा ऑफ वाईट कलर नेहमी मारणे.
५) Study table च्या समोर ची भिंत मोकळी पाहिजे, समोर पुस्तकाचे कपाट नको.
६) Study table वर Notice board किंवा soft board फक्त पाहिजे, बाकी काही नको.
७) Study table वर पेनासाठी एक बॉक्स, चारपाच पुस्तके एवढंच पाहिजे.
८) तो नेहमी स्वच्छ ठेवावा,कारण तसं नसेल तर मुलांना अभ्यासाला रस येणार नाही,मुलं कंटाळ करणार.
९) जर study table ला सनमाइका असेल तर तो पिस्ता कलर चा किंवा light green कलरचा असणे गरजेचे आहे. किंवा कपडा टाकणे कारण हे कलर आनंद व उत्साह देणारे कलर आहे. मुलांच्या room च्या वायव्येला study table केला तर चालेल पण तेथे बसू नये.

आपल्या घरात असलेली अडगळ (Unwanted material in house)…

१) सर्वप्रथम अडगळीची खोली वास्तुशास्त्राला मान्य नाही, आपल्या घरात अडगळ-अडचण असू नये.
२) आपल्या घरातील each and every वस्तू हि सतत वापरात असली पाहिजे, काही अशा वस्तू आहेत कि ते सतत लागत नाही पण त्या आठवड्यातून एकदा तरी वापराव्यात
३) वस्तू सतत वापरायला पाहिजे कारण ती स्थिर राहिली तर त्याची energy थांबते व ती थांबली तर त्यावर धूळ साठते. मग तीच्यात फंगस तयार होतात, जेव्हा वस्तूला बुरशी लागते तेव्हा ती सडायला लागते.
४) वर्षोनुवर्ष वस्तू जपून ठेवू नये, ज्या वस्तूंना आपण १, २, ३, ४ वर्षे हात लावत नाही त्या वस्तूत negative energy तयार होते. मग त्या energy आपल्याला घातक ठरतात.
५) जर चौरंग असेल तर तो इतर लोकांना वापरायला द्या, सतत त्या वस्तूचा वापर झाला पाहिजे.
६) ज्यांच्या घरात अडगळ जास्त, त्या घरात आपण गेल्यावर त्या माणसांना काहीहि सुचत नाही, मन प्रसन्न राहत नाही.
बंगला असेल तर पश्चिम व वायव्येला storage चालेल.अडगळ जीव लावून वर्षेनुवर्ष ठेवू नका.

घराचे कॉर्नर (Corner of house)…

१) वाईट शक्ती (negative energy) कधी ओपन राहत नाही, ती नेहमी अडगळीच्या शोधात असते, आणि अडगळ हि आपल्याला सतत corner लाच दिसत असते आणि आपण अजून अडगळ करून ठेवतो.
२) हा एक अपरिहार्य भाग आहे. कमीत कमी १५ दिवसातून एकदा तरी त्या कॉर्नरमधून किंवा सगळ्या वस्तू काढून खालून झाडू मारणे फार गरजेचं आहे. वस्तू वरून-खालून साफ ठेवा.
३) कॉर्नर हि negative energy थांबवण्याची उत्कृष्ट जागा आहे. सगळ्यात घाण जागा म्हणजे corner आहे.

घराची स्वच्छता (Cleaning of house)…

कमीत कमी वर्षातून तीन वेळा आपल्या घराची पूर्ण स्वच्छता झाली पाहिजे. जून महिन्यात प्रथम स्वच्छता करावी कारण उन्हाळ्यात वाऱ्याच्या माध्यमातून धूळ येते, वातावरण ड्राय असते, पाऊस वाढला तर आद्रता वाढते, मग बुरशी होते आणि आजारपण वाढते.

तळघर (underground house)…

१) वास्तुशास्त्राला तळघर मान्य नाही. पूर्वीच्याकाळी जमिनीखाली कुटनीतीचे plan करत असतं किंवा कैद्यांना ठेवले जात असतं.
२) भौतिक सुखासाठी वास्तुशास्त्र आहे, कारण सूर्याच्या माध्यमातून प्रकाश मिळतो, जर सूर्य नसेल तर शक्ती मिळणार नाही.
३) ज्यांच्या घरात पूर्व दिशा block आहे, अशा घरातल्यांना पाय दुखीचा त्रास आहे, वजन आहे, त्या घरात कमरेखालच्या भागाची दुखणी होतात.
४) वास्तुशास्त्रच हे सूर्याच्या किरणांवर अवलंबून आहे, मग जर किरणच मिळत नाही तर माणसाची अदोगतीच होते.
Basement चा माणूस हा नेहमी खड्ड्यातच राहतो, कारण Basement मध्ये सूर्यकिरण व प्रकाश पोहोचण्याचा मार्गच नसतो, तो माणूस कधीच वर येत नाही. जर एखादा Business करत असेल तर तो १,२,३ जास्तीत जास्त ५ वर्षे फक्त चालेल शेवटी तो खालीच येतो. उदा. (खंडेलवाल basement)
५) जर एखाद्या दुकानात गर्दी होते, किंवा गर्दी खेचली जाते, तो माणूस खूप कमावतो, धंदा चांगला होतो, पण त्याच्या घरी किती पैश्याची बचत होते, घरी किती जातात,जर तसं होत नसेल तर माणसाची प्रगती होत नाही.
६) आपण नेहमी एक वर्षाचा विचार करतो, प्रगती हि नेहमी वर्षाने बघितली जाते, म्हणून आपण रेमेडीज लावतो, १ वर्षानंतर खूपच फरक पडत जातो, पण प्रगती हि नेहमी वर्षानंतर होते.

खड्ड्यातील वास्तू (The house in the pit)…

१) हि पूर्णपणे negative आहे, कारण ती खड्ड्यात गेली आहे, घरात प्रवेश केल्यावर आपण नेहमी वर चढून जातो, खड्ड्यातील घर म्हणजे कधीही प्रगती होत नाही, ती नेहमी माणसाला खालीच खेचते, जर खड्डा असेल तर तो पूर्ण भरूनच जमीन सरळ करून वास्तू बांधावी.
२) खड्ड्यातील वास्तूत राहू नये, माणूस loss मध्ये जातो, कंगालपती होऊ शकतो. Loan, Froad, असं घर असेल तर राहू नये.

औषधे (Medicine in house)…

१) औषधं आपल्या घरातील अविभाज्य भाग झाला आहे, आपण औषधं जवळ घेऊन झोपतो.
२) जी गोष्ट आपल्या जवळ नको तीच आपण जिकडे तिकडे घेऊन बाळगतो.
३) आपल्या घरातील साधा बाम व विक्स चा पण display कमी करायचा आहे.
४) औषधं हि पॅक बंद box मध्येच हवी, बाहेरून दिसली नाही पाहिजे, कपाटाच्या आत box मध्ये ठेवावी.
५) औषधांचा box संपूर्ण घराच्या पश्चिमेला ठेवा किंवा संपूर्ण घराच्या पूर्व दिशेला ठेवली गेली पाहिजे.
६) पूर्व व पश्चिम दिशा नाही मिळाली तर दक्षिण-आग्नेय व वायव्य ह्या तीन दिशांपैकी कुठेही ठेऊ शकता.
७) चुकूनही नैऋल व ईशान्य ला औषधे कधीच ठेऊ नका, खूपच negative आहे, उत्तरेला पण नकोच.
८) योग्य जागी औषध ठेवली तर त्याचा परिणाम चांगला होतो, आपली बचत चांगली राहते.
९) जी health tonic वापरतो, ते म्हणजे च्यवनप्राश यासारखी शक्ती देणारी tonic त्याचा display करायचा आहे.
SW = औषधांची घरात वाढ होणार.
N = लक्ष्मीचे स्थान आहे.
W = दिशा संपते म्हणून तेथे ठेवणे कारण सूर्य अस्त होत जातो म्हणून.
E = पूर्वेला उगवतो – ultra voilet किरणांचा प्रभाव पडल्यास चांगल राहते, तसं ते हानिकारक नाही.

तिजोरी (Locker position in house)…

१) संपूर्ण घराच्या उत्तर किंवा संपूर्ण घराच्या नैऋत्य दिशेत तिजोरी असली पाहिजे, ह्या दोन्ही पैकी कुठेहि ठेवा.
२) संपूर्ण घराची नैऋत्य दिशा ही स्थिरतत्वाची दिशा आहे त्यामुळे तिजोरी तेथे राहिली तर लक्ष्मी स्थिर राहते
३) उत्तरही कुबेराची दिशा आहे, म्हणून तेथे लक्ष्मी ठेवावी.
४) लक्ष्मीचं स्वागत करायला हवं. त्यासाठी मुख्य प्रवेश द्वार सुशोभित हवा, उंबरठ्याचं पूजन करायला हवं.
५) कॅश घेऊन घरी यायचं, हातपाय धून नंतर ते पैसे कितीही असो ते थेट जाऊन देवघरात ठेवणे, त्यावर हळदकुंकू व्हायचे. मंत्र म्हणणे नंतर २ मिनिटानंतर ते पैसे स्वीकार व नंतर ते घेऊन तिजोरीत ठेवणे. देवघरातून उचलताना पूर्ण आदरपूर्वक स्वीकारा व कपाळाला लावा, देवीचे आभार माना व नंतर कपाटात आणून ठेवा.
६) तिजोरीत फक्त पैसे, सोनं, documents, चेकबुक एकढेच ठेवणे.
७) मुख्य तिजोरीत फक्त पैसे, सोने ठेवणे बाकीचे पेपर, तिजोरीच्या बाजूला किंवा वरती ठेवणे.
८) तिजोरीत सर्वात पवित्र असा लाल रेशमी कपडा (मुलायम) ठेवणे व त्या कपड्यावर लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती ठेवा.
९) तिजोरीत लक्ष्मी समोर पैसे ठेवा तेही पैशाची घडी घालून ठेवू नका, पैसे सरळ १, २, ३, ४, ५, १०, २०, ५०, १०० असे क्रमाने ठेवणे सर्वात चांगले. नंतर शक्य झाल्यास सकाळ-संध्याकाळ देवी (लक्ष्मीमातेला) अगरबत्ती ओवळा तिचे आभार माना.
१०) जेव्हा आपण पैसे मोजतो (म्हणजे नोटा) तेव्हा मोजताना आपल्याकढे होतील (आतल्याजुने) असे मोजावे.
११) तिजोरी व कपाटाशिवाय पैसे बाहेर कुठेही ठेवू नये, एक रुपया सुद्धा घराची लक्ष्मी अस्थाव्यस्थ करते. लक्ष्मीचा अनादर करू नये. लहान मुलांच्या हातात लक्ष्मी देऊ नये, कारण ते सांभाळू शकत नाही.
१२) पैसे देताना लक्ष्मी म्हणजे नोटा सरळ करूनच देणे.
१३) लक्ष्मी हि कमीत कमी २४ तास राहिली पाहिजे, म्हणजे अखंड दिवस राहिलीच पाहिजे. चेक : अखंड २४ तास घरात ठेववा व नंतर बँकेत ठेवाव.

आपल्या घरात स्त्रियांचा आदर (Respect of women)…

१) ज्या घरात स्त्रीयांचा आदर होतो तिथेच लक्ष्मी नांदते.
२) दररोज लक्ष्मीचं पूजन झालं पाहिजे, त्यासाठी वास्तू मध्ये remedies माध्यमातून copper चे स्त्रीयंत्र पती-पत्नीने दोघांनी एकत्रित रित्या स्मरण करणे गरजेचं आहे. त्याबरोबर लक्ष्मीचा मंत्र म्हणावा, हळदकुंकू व्हायचं चिमुटभर, नमस्कार करावा दोघांनी, असं आपल्या घरात दररोज झालं पाहिजे तरच आनंदाने लक्ष्मीचं स्वागत होतं.
३) श्री सुक्तम म्हणणे सर्वात जास्त चांगलं आहे.
४) श्री सुक्तम हवन आपल्या घरात झाला पाहिजे. पारायण करणे, हवन करणे झालच पाहिजे.

कपाटातील तिजोरी (Locker in cupboard)…

१) तिजोरीला नेहमी NE दिशा दिसली पाहिजे. प्रथम NE नंतर N दिसली पाहिजे
२) पुढे ओपन झाल्यावर तिचा चेहेरा उत्तरेला पाहिजे.
३) Second Option जर दिशा नाहीच मिळाली तर पूर्वेला झाली पाहिजे.
४) तिजोरीच्या perfect समोर घरातील मंदिर नको, उत्तरेला तिजोरी ठेवली तर तेथे देवघर नको, अशावेळी थोडसं cross ठेवा. देवघराच्या समोर कधीही तिजोरी नको. कारण :- देवांच्या डोळ्यात विशिष्ट अशी एक शक्ती असते. पुन्हा देव ती शक्ती देतात त्यांचे रेंज येतात, ती ताकद आपल्याला सहन होत नसते, ती खूप प्रखर असते. कपाटाच्या वर-खाली अपवित्र वस्तू ठेऊ नये.

टॉयलेट व बाथरूम (Toilet and Bathroom)…

१) आंघोळ करताना चेहरा नेहमी उत्तरेला जाईल असं बसावे.
२) टॉयलेटला गेल्यावर चेहरा उत्तरेला गेला पाहिजे, तसा pot बसवावा.
३) जर उत्तर नाहीच मिळाली तर पूर्व दिशा.
४) टॉयलेट व बाथरूमच्या दरवाज्यावर नॉर्मल डिझाईन ठेवावी, चित्राचं combination करू नये. उदा . जर आग्नेयाला टॉयलेट आहे तर चित्र जर पाण्याचं लावलं तर अजून भडका होईल, त्याचा त्रास जीवनावर होतो.
५) म्हणून कलर, चित्र कसेही ठेवू नये.
टॉयलेट = पश्चिम वायव्येला तोंड ( कचराकुंडी या भागात )
ईशान्येला = टॉयलेट नको. उत्तर-पूर्व ला बाथरूम चालेल.

पोस्टर्स (Posters in house)…

१) जगात विविध प्रकारचे पोस्टर्स आहेत तशा पद्धतीचे वातावरण १००% आपल्या जीवनावर होतो. म्हणजे आपल्या घरात कसे फोटो आहेत, तसं वातावरण आपल्या जीवनावर होतं हे विक्राल सत्य आहे.
२) आपल्या घरात कुठल्याहि पद्धतीचे रडके फोटो लाऊ नये. चिंताग्रस्त चित्र घरात नको, जसे एखाद्याची वाट पाहत बसणारी व्यक्ती असा नको. जर modern art ची असतील तर आपल्याला त्या चित्रात शोधाव लागतं काय काढलंय ते. अशी चित्र कि ज्या चित्रात शोधावं लागतो अर्थ ते negative आहे. ज्या चित्राचा लगेच अर्थ मिळत नाही अशी चित्र नको. ज्याला सांकेतिक भाषा आहे अशी चित्र लाऊ नये.
३) घोड्याचं चित्र घरात लाऊ नये. ते अस्थिर आहे. कारण तो उभ्याने झोपतो, खातो. प्रथम दर्शी तो सतत उभा दिसतो असे चित्र नको. ते अस्थिरतेचे प्रतिक आहे. जर धावताना, बसताना, उधळताना असे असेल तर तसचं जीवन होतं माणसाचं.

आपल्या घराची कचराकुंडी (Dustbin location of house)…

१) दिवसभराचा कचरा जो आहे तो पश्चिम व वायव्येच्या भागात ठेवावा.
२) कचरा अखंड २४ तास घराबाहेर ठेवावा, म्हणजे पश्चिम किंवा वायव्येला पॅक बंद ठेवावा.
३) किचनच्या पश्चिम व वायव्य भागात आपल्या घरातील कचरा कुंडी ठेवावी.
४) जर आपल्या घरातील एखादी वस्तू लवकरात लवकर जावी असं एखाद्याला वाटत असेल तर त्याने ती वस्तू संपूर्ण घराच्या वायव्य भागात ठेवावी. म्हणजे ती वस्तू हळूहळू बाहेर जाईल.
५) ज्वेलरी विकण्यासाठी ती वस्तू म्हणजे ज्वेलरी संपूर्ण घराच्या वायव्य भागात ठेवलेली सगळ्यात चांगली आहे. कारण त्या वस्तू ला आपण गती देतो. तेव्हा ती विकली जाते.

आपले पर्सनल कपडे (Rules for personal cloths)…

१) आपले कपडे कोणासही देऊ नये, म्हणजे आपले कपडे आपल्याच नातेवाईकाला देऊ नये, कारण आपल्या कपड्यांना विशिष्ट energy लागलेली असते, मग ती ( negative / positive ) कुठलीही असो त्याचा त्रास आपल्याला होत असतो.
२) ज्यांचा तुमच्या लोकांशी संबंध येत नाही त्यांनाच अशी वस्तू द्या.
३) आपल्या कपड्यांचा चिंद्या असतात त्या घरात पुसण्यासाठी वापरू नये. पुसण्यासाठी विकत कापसे आणून पुसणे.
४) घातलेल्या कपड्यांचं अवमूल्यन करू नये. जर कपडे खराब झाली असतील ती खाडीत विसर्जन करावीत.

दारूच्या बाटल्या (Bottle of liquor)…

१) पिण्याच्या किंवा शोच्या बाटल्या आपल्या घरात नको कारण दारूला वास्तुशास्त्रात जागा नाही.
२) ज्या वस्तूंना ( गोष्टींना ) आपल्या घरात स्थान नाही त्यांना दिशाचं नियम लागू नाही.
३) ज्यांना अगदीच पाहिजे त्यांचं रुटीन झालं अशांनी संपूर्ण घराच्या पश्चिम भागात ठेवावं.
मलबार हिल्स सारख्या भागात राहणाऱ्या लोकांनी आपल्या घरातील पश्चिम भागात ठेवावी कारण त्यांचा वापर त्यामुळे कमी होतो.

बाधित वास्तू (Hunted house)…

बाधित वास्तू कशी ओळखायची ते जाणून घेण्यासाठी प्रत्येक्ष फोन करणे. 

कलर (Color as per rooms in house)…

१) लोकं आपल्या घराला वर्षोनुवर्षे कलर लावतच नाही, हे चुकीचे आहे.
२) दोन किंवा तीन वर्षातून एकदा तरी घराला कलर करणे गरजेचं आहे.
३) जेवढा कलर room ला चांगला तेवढी वास्तूला energy चांगली मिळते, जेवढा कलर dull होत जातो तशी चांगली energy खाली खाली जाते / जात राहणार.
४) जेवढा कलर मारणार तेवढं शुभ कार्य होणार किंवा शुभ energy वाढणार.
५) कलर नेहमी लाईट ठेवावा. काम चांगलं होतं, काम लांबत नाही, उर्जा चांगली राहते.
६) दिशा प्रमाणे कलर मारा.
     उत्तर, वायव्य भागात – Blue, Grey मारणे.
     पूर्व, ईशान्य भागात – Green, Pista, Off White मारणे.
     SW, W भागात – Pink, Orange.
     आग्नेय भागात – Orange, Pink.
     दक्षिण, आग्नेय, नैऋत्य, पश्चिम या भागात नेहमी pink व orange कलर नेहमी लाईट शेड मध्ये मारावा.
७) जर एखाद्याला pink कलर मारायचा आहे, त्याला तो आवडत असतो तर त्याने hall च्या फक्त एका भिंतीलाच pink मारावा व दुसरा भिंतीना off white मारावा किंवा नाही शक्य झाल्यास hall ला संपूर्ण off white लावावा व फर्निचर किंवा चादर किंवा खुर्च्यांचे कवर किंवा room चे पडदे ह्या कलर चे द्यावे.

घरातील पाणी – जलसाठा (Storage of water in house)…

१) पिण्यासाठी पाणी हे फक्त ईशान्य भागातच ठेवणे, घराच्या प्रगती व आरोग्यासाठी चांगलं आहे.
२) पूर्व, उत्तर, ईशान्य भागात पिण्याचं पाणी किंवा भांडी ठेवणे.
३) काहीही झालं तरी आग्नेय भागात पिण्याचं पाणी ठेऊ नये.
४) जर पूर्व, ईशान्य, उत्तर ह्या दिशा नाही मिळाल्या तर दक्षिण-नैऋत्य-पश्चिम या भागात पिण्याचं पाणी ठेऊ शकता.
५) पण जर फक्त पाणी दक्षिण-नैऋत्य-पश्चिम भागात आलं किंवा ठेवलं तर पाणी साठवणुकीचा ओटा लगेच साफ ठेवा व ईशान्येला पाण्याचा जग भरून पिण्यासाठी वापरावा.
६) गॅस शेगडीच्या वरती किंवा आजूबाजूला पाण्याची टाकी ठेऊ नये.

आपल्या घराची स्टेअरकेस (Staircase of house)…

१) स्टेअरकेस म्हटलं तर वजन आलं आणि वजन नेहमी दक्षिण-पश्चिम-नैऋत्य भागातच पाहिजे.
२) पूर्व-उत्तर-ईशान्य भागात अजिबात वजन नको.
३) आग्नेय आणि वायव्य भागात ५०% पेक्षा जास्त वजन असेल तर ती दिशा ५०% positive व ५०% negative होते पण जर उत्तर, ईशान्य, पूर्वेला वजन आलं तर ती दिशा negative होते.
४) पूर्व दिशेला स्टेअरकेस आली तर म्हणजे वजन आलं आलं तर, पूर्व negative होते, असं झालं तर चांगल्या संधी येण्याचं प्रमाण कमी किंवा कधीकाळी आलेली संधी त्यांना encash करता येत नाही म्हणजे प्रगतीच्या संधी त्यांना घेता येत नाही.
५) ईशान्य भागात स्टेअरकेस आली तर कर्त्यापुरुषाची स्तिथी अशी होते कि तोंडापर्यंत घास येतो पण त्यांना तो घेता येत नाही.
६) पूर्वेला वजन create झालं तर म्हणजे कपाट, wardrobe टाकलं तर चांगली संधी येत नाही, असा माणूस हताश व निराश झालेला असतो, म्हणजे अस्वस्थ झालेला माणूस होतो.
७) उत्तर दिशेला staircase आली तर पैशाच्या related problem चालू होतात, कारण दिशा block होते. staircase म्हणजे वजन.

सोसायटीच्या बाहेरील (underground water tank of house / society)…

पूर्व, उत्तर, ईशान्य भागात underground water tank आल्यास positive आहे, सोसायटीमध्ये प्रगती होईल.

१) आग्नेयाला जर underground water tank आला तर अशा ठिकाणी सोसायटीमध्ये अफरातफर होण्याचे chance आहे. त्यात पहिला effect सोसाइटीवर होतो, वादाचं प्रमाण जास्तं असतं, आर्थिक फटका, नुकसान वाद होणार.
२) नैऋत्य दिशेत जर underground water tank आला तर अशा सोसायटीत राहणारे लोकं एकमेकांना जुमाननार नाही, सगळेच leader बनण्याचे प्रयत्न करणार त्यामुळे कोणीही समजून घेणार नाही, अंधाधुंध सोसाइटीचा कारभार होणार. हम करे सो कायदा असं वातावरण राहणार. अशा सोसायटीमध्ये अपघाती मृत्यू वाढणार, सोसायटीच्या माणसांमध्ये / घरात एकोपा राहणार नाही.
३) वायव्येला underground water tank आलं तर त्या सोसायटीत लोकसभा झालीच समजा. वाद, भांडण, मारामारी, नंतर matter उभं राहतं, त्यांना समोरं जावं लागतं. अशा लोकांचे एकमेकांशी कधीच पटत नाही.
सोसायटीत लोकांचे संबंध चांगले राहणार नाही, साधा manners नसणार, त्या ठिकाणी कुठलाच plan पास होणार नाही.

उपदिशेला दोष असतील तर तीव्रता जास्त असते.

सेप्टिक टँक (Septic tank of house / society)…

१) सेप्टिक टँक नेहमी पश्चिम व वायव्य भागात पाहिजे.
२) टँक म्हणजे खड्डा. खड्डा पूर्ण भरलेला असतो, सूर्याची किरणं पडतात तेव्हा त्याचा दुषित भाग स्वच्छ करण्याचं काम इन्फ्रारेड किरणं करतात.
३) पूर्व, उत्तर, ईशान्य भागात जर tank आला तर आरोग्याच्या तक्रारी वाढतात. Health problem वाढतात, पैशाचा problem होतो. मुलांच्या शिक्षणावर परिणाम होतो. मुलांचा ग्राफ खाली घसरत जातो, अवाढव्य खर्च, कोणी कोणालाच जुमानणार नाही. अपघात होणार.
४) ब्रम्हस्थानात पाण्याची टाकी आली तर आत्महत्या, अपघात, संकटाची मालिका चालू राहणार.
वास्तूतज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय वास्तूसंदर्भात व वरील उपायांसंदर्भात कोणताही निर्णय घेवू नये.

वास्तूतज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय वास्तूसंदर्भात व वरील उपायांसंदर्भात कोणताही निर्णय घेवू नये. 

अधिक माहिती साठी संपर्क :-
वास्तुशास्त्र / ज्योतिष / रेकी तज्ञ श्री. मनोजकुमार आप्पा मोहिते
इमेल :- vastusiddhii@gmail.com
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhii/
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhi
Calling No. 83698 84338
Whatsapp no. 88280 53505

130 thoughts on “घराचे वास्तू शास्त्र

  1. सुहास

    सर माझ्या घरात किचनला लागून आग्नेय कोपर्‍या त बाथरूम आहे ईशान्य कोपर्‍यात सागवानी देवघर आहे परंतु घराच्या बाहेर ईशान्य कोपऱ्या वर ५ फुट जागा सोडून घराबाहेर टॉयलेट आहे यावर काही उपाय आहे का? कृपया सुचवावे…

    Like

    Reply
    1. Vastusiddhii Consultant Post author

      सुहास सर नमस्कार!!

      तुम्ही सांगितल्या नुसार तुमच्या वास्तू मध्ये 2 वास्तू दोष आहेत.

      १) आग्नेय ला बाथरूम आहे
      २) ईशान्य दिशेला भले ते घराच्या बाहेर असलेलं टॉयलेट

      हे दोन्ही दोष तुमच्या सर्वांगीण प्रगतीमध्ये खूप अडचण निर्माण करू शकतात.

      उपाय जाणून घेण्यासाठी कृपया whatsapp वर appointment घेऊन फोन करावे.

      Like

      Reply
  2. सदाशिवरावभाऊ राघू चौरे

    सर माझ्या घराच्या खालुन बाजुच्या शेताला पाण्याची पाईप लाईन गेली आहे तर तसे चालते का पाईप लाईन दक्षिणे कडून उत्तरे कडे पाणी जाते.या मुळे काही परिणाम होतो का?

    Like

    Reply
    1. Vastusiddhii Consultant Post author

      पाणी दक्षिणे कडून उत्तरेला जात आहे ते सर्वात उत्तम आहे. त्यामुळे काही नुकसान नाही होणार त्याची काळजी करू नये.

      Like

      Reply
  3. डिके वानखेडे

    सर फ्लॅटच्या पश्चिम दिशेला उंच पाण्याची टाकी आहे अशा ठिकाणी फ्लॅट घेतला नवीन चालेल का

    Like

    Reply

Leave a comment