Resale चे घर विकत घेत असताना काय करणे अपेक्षित आहे?


Resale चे घर विकत घेत असताना काय करणे अपेक्षित आहे?

सामान्य व्यक्ती त्याच्या आयुष्यात स्वत:चे घर घेण्यासाठी आयुष्यभर धडपड करत असतो, पण तेच घर जर त्याला व्यवस्थित लाभले नाही तर त्याच्या उरलेल्या आयुष्यातील सर्व सुख त्या घरामुळे हिरावून घेतले जाते. त्यासाठी घर घेताना सर्व बाजूने चौकशी करूनच घर घ्यावे हेच माझे सांगणे.

Resale चे घर विकत घेत असताना वास्तुशास्त्र तर बघायचे पण त्या घराचा पूर्व इतिहास समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

Negative बाजू…

हे घर का विकत आहेत?
पूर्वी या घरात राहणारा माणूस कसा होता?
येथे राहणारा माणूस समाजामध्ये बदनाम, कर्जबाजारी, fraud केलेला तर नव्हता ना?
तो कंगाल तर झालेला नव्हता ना?
या घरातील कोणी व्यक्तींनी आत्महत्या तर केलेली नव्हती ना?
या घरातील पुरुष accident ने मेला तर नाही ना?
या घरातील व्यक्ती आजाराने खंगून तर मेलेली नव्हती ना?
या घरातील व्यक्तीचे लग्न झालेले नव्हते का? या घरातील व्यक्तींना मुले होती का?
किंवा या घरातील लोकांना विशिष्ट आजार होते का?

Positive बाजू …

या घरातील व्यक्ती परदेशात गेलेली आहे?
या घरातील व्यक्तींनी नवीन प्लॉट घेतलेला आहे?
Business – Job मध्ये प्रगती कशी आहे?
या घरातील मुले कुठे शिकत आहेत आणि त्यांची प्रगती कशी आहे?
या घरातील मुला-मुलींची लग्न झाली आहेत का? झाली असतील तर यांचा संसार कसा चालू आहे? त्यांना मुलं किती आहेत? इ.

अशीही चौकशी करावी.

वास्तूतज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय वास्तूसंदर्भात व वरील उपायांसंदर्भात कोणताही निर्णय घेवू नये. 

अधिक माहिती साठी संपर्क :-
वास्तुशास्त्र / ज्योतिष / रेकी तज्ञ श्री. मनोजकुमार आप्पा मोहिते
इमेल :- vastusiddhii@gmail.com
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhii/
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhi
Calling No. 83698 84338
Whatsapp no. 88280 53505

Leave a comment