जिना


वास्तुशास्त्रानुसार जिना कोठे आणि कसा असावा त्याबद्दल काही नियम.

१) वास्तूच्या आतमध्ये किंवा बाहेर जर जिना बनवायचा असेल तर तो नैऋत्य, दक्षिण, आग्नेय, पश्चिम किंवा वायव्य भागातच बनवावा.

२) जिन्याच्या पायऱ्या या विषम संखेत असाव्यात (उदा. १, ३, ५ इ.)

३) जिना फक्त पूर्व-पश्चिम किंवा उत्तर-दक्षिणच क्लाॅकवाईस चढता असावा.

४) जिन्याने वरच्या माळ्यावर गेल्यानंतर व्यक्तीचे तोंड पूर्वेला किंवा दक्षिणेला येईल अशी जिन्याची व्यवस्था करावी.

५) जिन्याखाली स्टोरेज बनवू नये.

६) सर्वात वरच्या जिन्यावर छत बनवावे, जिना उघडा ठेवू नये.

वास्तूतज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय वास्तूसंदर्भात व वरील उपायांसंदर्भात कोणताही निर्णय घेवू नये. 

अधिक माहिती साठी संपर्क :-
वास्तुशास्त्र / ज्योतिष / रेकी तज्ञ श्री. मनोजकुमार आप्पा मोहिते
इमेल :- vastusiddhii@gmail.com
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhii/
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhi
Calling No. 83698 84338
Whatsapp no. 88280 53505

24 thoughts on “जिना

  1. शिवकुमार पुराणिक

    घराचे मुख्य दक्षिणेकडे आहे.घराच्या बाहेर पुर्व भागच जिना करण्यासाठी शिल्लक आहे. जागा कमी आहे. घराच्या दारापासुन मुख्य दरवाजा पर्यंत दक्षिणेकडे 25 फुट जागा आहे. मात्र ही जागा वडीलांच्या ताब्यात असून ते जिना करण्यासाठी जागा देत नाही. गोलाकार जिना करण्यासाठी कसा जिना करावा. मार्ग दर्शन करावे. हि विनंती.

    Like

    Reply
    1. Vastusiddhii Consultant Post author

      तुमच्या घराचा diagram पाठवा त्याशिवाय काही सांगता येणार नाही. त्या diagram वर ज्या प्रश्नाचे उत्तर हवे आहे ते व्यवस्थित लिहा.

      Like

      Reply
  2. अमित परदेशी

    माझ्या घराचा जिना उत्तरेला उत्तरेकड चढणारा येत आहे व उत्तर -दक्षिण जिना चालेल का.2गुंठे जागा आहे खाली काही रूम रेन्टवर देणार आहोत मध्य भागी जिना प्लॉट च्या उत्तरेला चालेल का /किंवा तसा असल्यास काय अडचणी येतील

    Like

    Reply
    1. Vastusiddhii Consultant Post author

      सर, तुमच्या याच प्रश्नात बरीच प्रश्ने आहेत. कृपया एक एक प्रश्न व्यवस्थित विचारावा. त्याच बरोबर तुमच्या जागेचा किंवा घराचा diagram हि पाठवावा.

      Like

      Reply
      1. Vastusiddhii Consultant Post author

        उत्तरेला वायव्य भागात clockwise जिना चालतो, वास्तूच्या मध्यभागी जिना योग्य नाही. पोटाचे, लिव्हरचे किंवा पोटाशी संबधित इतर आजार होऊ शकतात.

        Like

      2. Rupesh Majethiya

        दुकाना मध्ये जिना बनवायचा आहे.
        जिन्याच्या खाली बसण्याची व्यवस्था करू शकतो का ?

        Like

      3. Vastusiddhii Consultant Post author

        जिन्या खाली काहीही करू नये. बसणं तर लांबचंच.

        जिन्या खाली स्टोअर रूमही करू नये. शक्यतो जिन्या खाली मोकळी जागा ठेवावी.

        Like

      4. Vastusiddhii Consultant Post author

        जिन्याच्या खाली शक्यतो काहीच करू नये, मोकळी जागा ठेवावी. बसू तर बिलकुलच नाही.

        Like

  3. Gitanjali

    नमस्कार सर मी गीतांजली दिलीप देशमुख कराड वरून बोलते तर माझा प्रश्न असा आहे की मी जे आता नवीन घर बांधणार आहे ते 21 बाय 21 घर आहे तर घरामध्ये जिन्याची योग्य दिशा सांगा किंवा घरामध्ये जिना कोणत्या दिशेला आणि कसा असावा प्लीज रिप्लाय द्या

    Like

    Reply
  4. Bhanudas Krishna Narale

    मी नवीन घर बांधण्याच्या विचारात आहे, घर पश्चिम मुखी आहे रस्ता पश्चिमेला आहे, प्लॉट ३३’ रुंदी ×६६’ लांबी आहे,
    जिना दिक्षीनेला कसा देता येईल सोबत काच्चा प्लॅन पाठवत आहे

    Like

    Reply
  5. Chaitanya lonkar

    Jina ishanya la chalo ka? : Jina ishanya la banavle ahe Purvaa pachim door ahe junya khali panyachi bhumigat taki ahe ani jina clock wise pan ahe

    Like

    Reply
    1. Vastusiddhii Consultant Post author

      जिना ईशान्येला बिलकुल चालत नाही. मान-सन्मान आणि मुलांच्या करीअर मध्ये अडचणी येऊ शकतात.

      Like

      Reply
    1. Vastusiddhii Consultant Post author

      मुख्य दरवाजा जिन्या खाली असू नये.

      पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की जिना नक्क्की कुठे आणि कसा असावा हे समजून घ्यावे.

      Like

      Reply
  6. chakradhar maldhure

    सर माझ्या घराचा जिना पुर्व दिशेला चढत जाउन उत्तर दिशेला संपतो तर तो योग्य आहे का कृपया मार्गदर्शन करावे

    Like

    Reply
    1. Vastusiddhii Consultant Post author

      नमस्कार,

      जिना वास्तूच्या कोणत्या भागात आहे त्यावर त्याचे परीणाम अवलंबून असतात. खालील लिंक वर जिन्याबद्दल माहिती दिलेली आहे.

      https://vastusiddhii.com/doors-as-per-vastu/staircase-as-per-vastu/

      कृपया सर्व माहिती व्यवस्थित वाचावी आणि काही प्रश्न असतील तर विचारावे.

      Like

      Reply
    1. Vastusiddhii Consultant Post author

      नमस्कार,

      काम कोणते आहे आणि त्यामध्ये काय काय करावे लागणार आहे यावर सर्व अवलंबून असते.

      तेव्हा मला 8369884338 वर फोन करावे, मग सविस्तर बोलूया.

      Like

      Reply

Leave a comment