आग्नेय


SE

आग्नेय दिशेचा मुख्य दरवाजा :

जशी माणसाची ओळख हि त्याचा चेहराबघून होते त्याप्रमाणे प्रत्येक घराची ओळखही घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून होते.

आग्नेय दिशा हि लेडीज स्पेसिअल दिशा आहे. स्त्रियांना ५०%, पुरुषांना ३५% व इतरांना १५% प्राधान्य त्यांच्या सर्वांगीण विकासात देते.

घरात येताना-जाताना त्या दिशेचा प्रभाव त्या घरात राहणाऱ्यांवर होत असतो. खास करून कर्त्या पुरुषांवर किंवा ज्याच्या नावावर हे घर असते त्यावर हा परिणाम जास्त होत असतो.

  • निरर्थक गोष्टींवरून भांडणार, स्वभावाने कटकट्या-रागीट असणार, विनाकारण घरातील वातावरण बिघडवणार.
  • चिडचिडा, त्रागा करणारा, छोट्या गोष्टींवरून वाद नाही भांडण करणारा, नेहमी तक्रार करणारा, अशांत, समाधानी नसणारा, नेहमी करिअर घेवून अस्वस्थ असणारा असं व्यक्तीमत्व.
  • या घरात पैसा चांगला येतो पण त्याचा उपयोग इच्छेनुसार घेता येत नाही त्यामुळे या घरात ताणतणाव, भांडण होणार परिणामस्वरूप असंतोष वाढणार.
  • पुरुषांपेक्षा या घरात स्त्रियांची सर्वांगीण प्रगती चांगली व लवकर होणार.
  • या घरात धान्यलक्ष्मीचे स्थान असते त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत कामे अडणार नाहीत, पोटाची चिंता नसणार, कोठून न कोठूनतरी पैसा येतच राहणार.

सल्ला :

  • डोक्यावर बर्फ ठेवून वागणे म्हणजेच डोके शांत ठेवणे.
  • उरलेल्या पैशांमध्ये सुख उपभोगण्याचा प्रयत्न करणे, मोठ्या सुखापेक्षा छोट्या छोट्या सुखामध्ये समाधानी राहणे.
  • नोकरी-व्यवसाय करण्यासाठी स्त्रियांना प्रवृत्त करणे.
  • स्त्रियांच्या नावाची पाठी मुख्य दरवाजावर लावणे.
  • वाढदिवस, व्हॅलेंटाईन डे असे छोटे-छोटे प्रसंग साजरा करणे.

या घरातील लोकांनी करावयाचे व्यवसाय-नोकरी :

  • कोणताही व्यवसाय ज्यात सौदर्य, सर्जनशीलता असेल. उदा. Beauty Parlour, Fashion Designing, Catering, Interior Designing, Animation, Drawing, Mehandi, Tailoring, Dance, Nurshing, Cooking Classes, Novelty, Cosmetics, Small Business जे घरी बसून करता येतात, स्त्रियांच्या संबंधी कपडे, पाळणा घर इ.
  • मोठ्या व्यवसायामध्ये पेट्रोल पंप ज्याचा मुख्य दरवाजा आग्नेयला असावा, Fabrication, Welding Shop, Bakery, Laundry, Photography & Shooting, Event Management, Service Type Business, गृहउद्योग खाण्याचे पदार्थ इ.
  • स्त्रियांच्या नावाने व्यवसाय असावेत तसेच स्त्रीच मालक असावी तेव्हाच व्यवसाय व्यवस्थित चालेल – लाभ होईल व त्यातून चांगला लाभ होईल.

वास्तूतज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय वास्तूसंदर्भात व वरील उपायांसंदर्भात कोणताही निर्णय घेवू नये. 

अधिक माहिती साठी संपर्क :-
वास्तुशास्त्र / ज्योतिष / रेकी तज्ञ श्री. मनोजकुमार आप्पा मोहिते
इमेल :- vastusiddhii@gmail.com
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhii/
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhi
Calling No. 83698 84338
Whatsapp no. 88280 53505

 

Leave a comment