जुनं घर सोडून नवीन घरात जाताना किंवा जुनं घर तोडून नवीन घर बांधताना काय करणे अपेक्षित आहे?


जुनं घर सोडून नवीन घरात जाताना किंवा जुनं घर तोडून नवीन घर बांधताना काय करणे अपेक्षित आहे?

जुनं घर सोडून नवीन घरात जाताना, जुन्या घराला नाव ठेवत, आदळआपट करत कधीही जाऊ नये. वास्तूमधून बाहेर पडताना नेहमी आनंदाने आणि प्रसन्न चित्ताने बाहेर पडणे गरजेचे आहे. जुन्या वास्तूमधून नवीन वास्तूमध्ये जाताना प्रार्थना करावी. “हे वास्तुदेवता गेल्या _ वर्षापासून तू आम्हाला येते सांभाळलेले आहे. तुझ्या अंगा खांद्यावर आम्ही खेळलेलो आहोत, तुझ्या मुळे आम्ही येते वाढू शकलो, संस्कार झाले, प्रगती झाली, विविध संकटामध्ये तू आमच्या पाठीशी तटस्थ उभा राहिला”. अशी त्या वास्तूबद्दलची कृतज्ञता व्यक्त करून त्रिवार वंदन करावे, नंतर वास्तू सोडावी, मोडावी.

एखाद्या वास्तूमधून दुसऱ्या वास्तूमध्ये जाताना एक छोटीशी पूजा करावी, व एक महिन्यानंतर वास्तू सोडावी, मोडावी.

वास्तू मोडतानाही क्षमा याचनेची पूजा करावी. भारतीय संस्कृतीनेही कृतज्ञता व्यक्त करण्यास सांगितले आहे.

वास्तूतज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय वास्तूसंदर्भात व वरील उपायांसंदर्भात कोणताही निर्णय घेवू नये. 

अधिक माहिती साठी संपर्क :-
वास्तुशास्त्र / ज्योतिष / रेकी तज्ञ श्री. मनोजकुमार आप्पा मोहिते
इमेल :- vastusiddhii@gmail.com
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhii/
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhi
Calling No. 83698 84338
Whatsapp no. 88280 53505

Leave a comment