मुलांचे शयनकक्ष


चिमुरड्यांची खोली

मुलांची पावले घरात पडल्याशिवाय घराला चैतन्य येत नाही. मुलं म्हणजे निखळ हास्य, चैतन्य व उत्साहाचे झरे. त्यांच्या वास्तव्याने घर न्हाऊन निघते. लहान मुलांच्या गरजा, आवडी-निवडी, छंद लक्षात घेऊन त्यांच्या खोलीची रचना करावी लागते. संस्कारक्षम वयातील लहान मुलांच्या कोवळ्या, संवेदनशील मनावर प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे घटनांचे रोपण होत असते.

लहान मुलांची खोली सजविताना सर्व गोष्टी दृष्टीकोनातून विचार करून निर्णय घेणे गरजेचे आहे. लहानग्यांच्या खोलीतील फर्निचर निवडताना विशेष काळजी घ्यावी. त्यांच्या फर्निचरला टोकदार, अणकुचीदार भाग, कोपरे राहणार नाहीत, अशाप्रकारे डिझाइन करावेत. त्यांच्या खोलीत भिंतीवर आवडते प्राणी, पक्षी, खेळाडू व निसर्गचित्रे असणारे वालपेपर्स लावल्यास एकदम छान. यामुळे मुलांच्या मनांची जडण-घडण समृद्ध होण्यास मदत होते.

मुलांचे अभ्यासाचे टेबल आरामदायक असावे. जेणेकरून अभ्यासाची गोडी निर्माण होईल. वास्तुशास्त्राचा आधार घेऊन त्यांच्या खोलीचे नियोजन केल्यास लाभासोबतच आत्मिक समाधानही लाभेल. लहानग्यांची खोली घराच्या वायव्येस ठेवणे लाभदायक ठरते. पूर्व दिशा उर्जेचे उगमस्त्रोत असल्याने दरवाजा पूर्वेकडे ठेवणे हितावह असते.

खोलीतील रंगसंगती लहान मुलांना प्रसन्न करणारी असावी. त्यांच्या खोलीची रंगरंगोटी नारंगी रंगाने केल्यास शुभ शक्ती कार्यरत होण्यास मदत होते. त्यांचा आवडता अभ्यासाचा टेबल सहसा भिंतीला चिटकवून न ठेवल्यास बरे. सरस्वती व गणपती या देवता विद्या व बुद्धीमत्तेच्या प्रतीक असल्याने त्यांचे चित्र मुलाचे खोलीत जरून लावावे. पलंगाची योजना करताना डोके दक्षिणेकडे असेल याची खात्री करून घ्यावी.

झोपेत शरीराचे चुंबकत्व कायम राखण्यासाठी याची मदत होते. पुस्तके ठेवतानाही जाणीवपूर्वक लक्ष देणे गरजेचे ठरते. पुस्तके सहसा नैऋत्य किवा पश्चिमेस ठेवणे योग्य. मुलांच्या टेबलावर अनावश्यक पुस्तकांची गर्दी करण्यात काही अर्थ नाही. आवश्यक ती व तेवढीच पुस्तके तेथे ठेवावीत. पुस्तकांची गर्दीमुळे मुलांच्या मनावर अनावश्यक दडपण येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

रात्रीचा अभ्यास करताना मुले टेबल लॅम्पचा वापर करीत असतील तर लॅम्प टेबलाच्या आग्नेय दिशेकडे ठेवणे पसंत करावे. खोलीत सहसा मोठे घड्याळ लावावे. दोलनाच्या घड्याळाने मुलांच्या एकाग्रतेत वाढ होण्यास मदत होते. शिवाय मुलांच्या खोलीत दोलनाचे घड्याळ असणे शुभकारक समजले जाते. मुलांची खोली घराच्या ईशान्य किवा वायव्येस असणे शुभ असते.

पुस्तकांचे कपाट पश्चिमेस ठेवावे. आरसा चांगल्या दर्जाचा, मजबूत व टिकावू असावा. आरसा नेहमी उत्तर किवा पूर्व दिशेच्या भिंतीवर लावावा. विजेच्या दिव्यांची बटणं मुलांचा हात पुरेल अशी योजना करून लावावी. इलेक्ट्रीकचे साहित्य उत्तम दर्जाचे व सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षित असल्याची खात्री करून घ्यावी. त्यांचे बेड जवळच घरात संपर्क करण्यासाठी टेलिफोनची व्यवस्था केल्यास अगदी झक्कास! खेळाचे साहित्य ठेवण्याकरिता विशेष व्यवस्था करावी.

मुलांना स्पर्धांमध्ये मिळणारी बक्षिसं, ट्रॉफी ठेवण्याकरिता खास शेल्फची व्यवस्था करावी. अशा गोष्टी त्यांना सतत प्रेरणा देत असतात. भिंतींच्या रंगसंगतीसोबतच खिडक्या, दारांचे पडदे निवडताना खोलीतील रंगसंगती व मुलांची आवड लक्षात घ्यावी.

मुलांचे मन सर्जनशील असते. दररोज नवीन अनुभव त्यांच्या गाठिशी जमा होत असतात. मुलांची कला, कौशल्य मुक्तपणे अभिव्यक्त होण्याकरिता त्यांच्याशी उत्तम संवाद ठेवण्यासोबतच ड्रॉइंग बुक, पेन्सिल, स्केच बुक, रंगाच्या काड्या, फळा, पेन इत्यादी साहित्य त्यांच्या खोलीत असावयास हवे.

मुलांची खोली घराच्या पश्चिम, उत्तर अथवा पूर्व दिशेला असावी. मुलांच्या खोलीतील सजावटीमुळे संपूर्ण घरात सकारात्मक ऊर्जा संचार करत असते. जर घरात मुले नसतील तर त्या घराला घरपण येत नाही. मुलांना देवा घरची फुले म्हटले जात असते. मुलांच्या हसण्‍या खिदळण्याने घरातील वातावरण उत्साहवर्धक होत असते. त्यामुळे मुलांची खोली कशी असावी या विषयी वास्तूशास्त्रात महत्त्वपूर्ण अशी माहिती सांग‍ितली आहे.

मुलांच्या खोलीचे प्रवेशद्वार उत्तर अथवा पूर्व दिशेला पाहिजे. तसेच खोलीच्या खिडक्या ह्या पूर्व दिशेला असाव्यात. त्यांच्या अभ्यासाचा टेबल हा पूर्व अथवा उत्तर दिशेला असावा. पुस्तके ईशान्य कोपर्‍यात ठेवावीत. अभ्यास करताना मुलांचा चेहरा उत्तर अथवा पूर्व दिशेला असावा, अशी त्यांची अभ्यासाची व्यवस्था केली पाहिजे. एक छोटेशे मंदीर मुलांच्या खोलीत असावे. त्या मंदीरात विद्देची अधिष्ठात्री देवी सरस्वतीची मूर्ति अथवा प्रतिमा असावी.

मुलांच्या खोलीत अभ्यास साहित्याशिवाय इतर सामानाची गर्दी करू नये. मुलाचा बिछाना हा नैऋत्य कोपर्‍यात असावा. झोपतांना त्यांचे डोके दक्षिण दिशेला पाहिजे. परंतु मुलांनी स्वत:चे डोके पूर्व दिशेलाही ठेवू शकतात.

मुलांच्या खोलीतील भिंतींना भडक रंग देऊन नये. हलक्या रंगाच्या शेड्‍स द्याव्या‍त. त्यामुळे मुलांचा स्वभाव शांत राहून त्यांची स्मरणशक्ती वाढण्यास मदत होईल. खोलीतील मध्यभाग हा मुलांना खेळण्यासाठी मोकळा सोडावा. मुलांच्या खोलीचा दरवाजा ज‍िन्याला खेटून अथवा शौचालयास खेटून नसावा. मुलांची खोली नेहमी स्वच्छ असावी.

वास्तूतज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय वास्तूसंदर्भात व वरील उपायांसंदर्भात कोणताही निर्णय घेवू नये. 

अधिक माहिती साठी संपर्क :-
वास्तुशास्त्र / ज्योतिष / रेकी तज्ञ श्री. मनोजकुमार आप्पा मोहिते
इमेल :- vastusiddhii@gmail.com
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhii/
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhi
Calling No. 83698 84338
Whatsapp no. 88280 53505

Leave a comment