ग्रहणात काय करावे आणि काय करू नये?


२०२० मधील पहिले आणि मोठे कंकणाकृती सूर्यग्रहण

ग्रहण वेध – शनिवारी दि. २० च्या रात्री १० वाजल्यापासून ते दि. २१ च्या दुपारी १.२८ वाजे पर्यंत

ग्रहणकाळ / पुण्यकाळ / पर्वकाळ – दि. २१ च्या सकाळी १०.०१ वाजल्यापासून ते दुपारी १.२८ वाजेपर्यंत

कोणकोणत्या राशींना कसे फळ मिळणार आहेत?

मेष, सिंह, कन्या, मकर – शुभ फळ – ग्रहण पाहावे

वृषभ, तूळ, धनू, कुंभ – मिश्र फळ – ग्रहण पाहावे

मिथुन, कर्क, वृश्चिक, मीन – अनिष्ट फळ – या राशीच्या व्यक्तींनी आणि गर्भवती स्त्रियांनी ग्रहण पाहु नये. ग्रहणाचे सर्व नियम कडक पाळावेत

ग्रहणाअगोदर काय करावे.

दि. २० जून रोजी रात्री ९.४५ वा. ५ कपुर सहित ५ लवंगा आणि एक वेलची एका प्लेट मध्ये जाळावी आणि त्याचा धूर संपूर्ण घरात फिरवावा.

याची राख ग्रहणानंतर (दि. २१ जून दु. १.२८ वाजल्यानंतर) घराच्या मुख्य दरवाजा आणि उंबरठ्यावर शिंपडावी आणि आंघोळीच्या पाण्यात टाकून सर्वांनी आंघोळ करावी.

सामान्य व्यक्तींनी ग्रहणकाळात (दि. २१ च्या सकाळी १०.०१ वाजल्यापासून ते दुपारी १.२८ वाजेपर्यंत) काय करू नये? (आजारी, वृद्ध व लहान मुलांनी दि. २१ च्या सकाळी ४.४५ वाजल्यापासून ते दुपारी १.२८ वाजेपर्यंत खालील सर्व नियम पाळावेत.)

  • दि. २१ जूनच्या सकाळी १०.०१ सर्व नित्यकर्मे सामान्य व्यक्तीं करू शकतात.
  • देवपूजा करू नये.
  • पाणी किंवा पिण्याचे इतर कोणतेही द्रवपदार्थ पिऊ नये. आजारी व्यक्तींनी गोळ्या खाताना किंवा औषध पिताना पाण्यात एक तुळशीचे पान टाकणे.
  • स्वयंपाक करू नये. काहीही खाऊ नये. आजारी किंवा अशक्त व्यक्तींनी खुप आवश्यक असेल तरच चहा-कॉपी घ्यावी.
  • झोपु नये. आळस येईल असे काहीही करू नये.
  • धुने धुवू नये, पिण्याचे पाणी भरू नये.
  • लघवी आणि संडास ला जाऊ नये. हि वेळ आलीच नाही पाहिजे यासाठी सकाळी कमी पाणी पिणे आणि कमी खाणे.
  • पुरुष-स्त्रीयांनी शाररीक संबंध टाळावेत.
  • घराची साफ-सफाई करू नये.
  • कोणाशीही वाद-विवाद करू नये. भांडण टाळावेत. कोणाला कशाही पद्धतीने फसवू नये (खास करून व्यापाऱ्यांनी हा नियम जास्त पाळावा).
  • कोणत्याही प्राणी-जीवजंतूची हत्या करू नये.
  • मॉलिश करू नये किंवा करून घेऊ नये.
  • नशापाणी, घाणेरडे वागणे करू नये.

सामान्य व्यक्तींनी ग्रहणकाळात (दि. २१ च्या सकाळी १०.०१ वाजल्यापासून ते दुपारी १.२८ वाजेपर्यंत ) काय करावे?

  • आंघोळीच्या पाण्यात एक तुळशीचे पान टाकुन आंघोळ करणे.
  • आंघोळीनंतर तर्पण, श्राद्ध, मंत्रजप (नित्यपठणातील सर्व मंत्राचा), होम इ. कर्म करावेत. काहीच करायचे नसेल तर मौन पाळावे.
  • इतरांना लगेच वापरात येतील अशा गोष्टींचे दान करावे.
  • या व्यतिरिक्त काहीही करू नये.

ग्रहण संपल्यानंतर काय करावे.

१) ग्रहणा अगोदर केलेली राख घराच्या मुख्य दरवाजा आणि उंबरठ्यावर शिंपडावी आणि आंघोळीच्या पाण्यात टाकून सर्वांनी आंघोळ करावी.

२) घरात सर्वीकडे गंगाजल शिंपडावे.

३) ताजे जेवण बनवून देवाला गोड पदार्थाचा नैवद्य दाखवून सर्वांनी एकत्रित जेवण करावे.

गरोदरस्त्रियांसाठी नियम

गरोदर स्त्रियांनी सकाळी ४.४५ वाजल्यापासून ते दुपारी १.२८ वाजेपर्यंत खालील गोष्टी करू नयेत.

  • पाणी किंवा पिण्याचे इतर कोणतेही द्रवपदार्थ पिऊ नये.
  • काहीही खाऊ नये. खुप आवश्यक असेल तरच चहा-कॉपी घेऊ शकता (शक्य होत असेल तर टाळावेच). कोणत्याही परिस्थितीत शिळं काहीही खाऊ नये.
  • झोपु नये. आळस येईल असे काहीही करू नये, आळस देऊ नये, कुस बदलू नये, बिछान्यावर लोळू नये, हातांची किंवा पायांची बोटे मोडू नये.
  • लघवी आणि संडास ला जाऊ नये. हि वेळ आलीच नाही पाहिजे यासाठी सकाळी कमी पाणी पिणे आणि कमी खाणे.
  • पुरुष-स्त्रीयांनी शाररीक संबंध टाळावेत. वाद-विवाद टाळावेत.
  • घरातील कोणतेही काम करू नये. भाजी चिरू-कापू नये, कपडे धुवू नये, कपडे पिळू नये, कपड्यांच्या घड्या घालू नये. कशालाही गाठी मारू नयेत. कोणतीही गोष्ट फाडू नये.
  • घरातून बाहेर जाऊ नये.

गरोदर स्त्रियांनी सकाळी ४.४५ वाजल्यापासून ते दुपारी १.२८ वाजेपर्यंत खालील गोष्टी कराव्यात.

  • एका जागी शांत बसुन मंत्रजाप करणे किंवा थोरव्यक्तींचे चरीत्र वाचणे. मौन बसू नये.

गरोदर स्त्रियांनी ग्रहण संपल्यानंतर काय करावे.

  • ग्रहण संपल्यानंतर (दु. १.२८ नंतर) गरम पाण्याने चांगली आंघोळ करणे.
  • ताजे बनवलेले जेवणच करणे. शिळे भले ते ग्रहणा अगोदरचे दुध जरी असेल तरी पिऊ नये.

वास्तूतज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय वास्तूसंदर्भात व वरील उपायांसंदर्भात कोणताही निर्णय घेवू नये. 

अधिक माहिती साठी संपर्क :-
वास्तुशास्त्र / ज्योतिष / रेकी तज्ञ श्री. मनोजकुमार आप्पा मोहिते
इमेल :- vastusiddhii@gmail.com
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhii/
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhi
Calling No. 83698 84338
Whatsapp no. 88280 53505

Leave a comment