दरवाजे


वास्तूचा मुख्य दरवाजा ( घर असो किंवा ऑफिस – कारखाना – फॅक्टरी असो) हा त्या वास्तुत राहणाऱ्या – काम करणाऱ्या व्यक्तीच्या विकासातील एक महत्त्वाचा धागा आहे.

परंतु आज आपण सहज कोणाला विचारले की तुमच्या घराचा दरवाजा कोणत्या दिशेला आहे तर ९०% लोकं फक्त चारच दिशांची नावे घेताना तुम्हाला ऐकायला मिळतील त्या दिशा म्हणजे पूर्वेचा दरवाजा, पश्चिमेचा दरवाजा, उत्तरेचा दरवाजा आणि दक्षिणेचा दरवाजा. यात लाजिरवाणी गोष्ट अशी की बाकीच्या चार दिशा कोणत्या हे माहित नाही ते तर सोडाच पण दरवाजाची दिशा कशी बघायची किंवा घरात दिशा कशा बघतात याबाबतही भल्या-भल्यांमध्ये संभ्रम आहे.

आज आपण २१ व्या शतकात ज्या गतीने प्रगती करत आहोत त्याच गतीने आपण आपल्या संस्कृतीच्या अगदी मुलभूत संकल्पनाही विसरत चाललो आहोत हेच नाही तर आपण त्या जाणून घेण्याचाही कधी प्रयत्न करताना दिसत नाही आहोत. पाश्चिमात्य संस्कृतीला जे साध्य करायचे आहे ते साध्य होताना दिसत आहे ते म्हणजे हिंदू संकृतीचे समूळ उच्चाटन.

मित्रांनो आज – आत्ता आपणच आपल्या संकृतीला जपले-जोपासले पाहिजे तेही अंधश्रद्धेने नाही तर पूर्ण विचाराने, डोळस वृत्ती व श्रद्धेने. ऋषी मुनींनी जे काही शास्त्र-सिद्धांत लिहून ठेवली आहेत ते निदान खरे आहेत की नाही, त्याला काही विज्ञानाचा आधार आहे की नाही हे तरी जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया, तेव्हाच आपण श्रद्धा कशाला म्हणतात व अंधश्रधा कशाला म्हणतात या बद्दल ताट मानेने भाष्य करू शकू.

चला तर आपण दिशा व त्यांचा वास्तूवर होणारा परिणाम जाणून घेवूया…

एकूण ४ मुख्य दिशा पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण व त्यांच्या ४ उपदिशा आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य अशा ८ दिशांमध्ये वास्तूवरील परिणामांचा विचार केला जातो.

2d7ea1c128fab0e330e8faf5a095319d_1451546817

वास्तूला जर सरळ समांतर दिशा मिळाली असेल तर प्रत्येक दिशा पुन्हा समांतर ९ भागांमध्ये विभागली जाते. खालील आकृतीमध्ये प्रत्येक दिशेच्या प्रत्येक भागाची माहिती त्याच्या परिणामासहित दिलेली आहे. शुभ दरवाजाची जागा हि पिवळ्या रंगाने दर्शविलेली आहे.

 

direction of doors

दरवाजा कोणत्या दिशेला आहे हे कसे ओळखायचे?

सर्वांनाच सूर्य कोणत्या दिशेने उगवतो आणि मावळतो हे माहित असतचं, आपण सूर्य उगवणाऱ्या दिशेकडे तोंडकरून उभा राहिल्यास साहजिकच आपल्या मागची दिशा हि पश्चिम असते, आपल्या डाव्या हाताकडची दिशा हि उत्तर व उजव्या हाताकडची दिशा हि दक्षिण असते. प्रत्येक दिशेचा ४५ – ४५ असा ९० अंशाचा कोन असतो, तिथून त्यांच्या उपदिशा सुरु होतात. अचूक दिशा जाणून घ्यायच्या असतील तर दिशादर्शकाचाच वापर करावा लागेल कारण उत्तरायण व दक्षिणायन चालू असताना सूर्याच्या उगवण्याच्या व मावळण्याच्या बदलामुळे अचूक दिशा मिळणार नाही.

Vastu-Compass   vaastu-shastra-directions-500x500

दिशादर्शक यंत्र कसे वापरायचे?

दिशादर्शक यंत्रात एक चुंबकीय सुई असते तिच्या एका टोकाला लाल व दुसऱ्या टोकाला काळा रंग असतो. लाल रंगाचे टोक दिशादर्शक यंत्रातील N म्हणजेच उत्तर दिशेकडे केल्यास तुम्हाला सर्व दिशा आपोआपच दिशादर्शक दाखवेल.

एका घरात किती दरवाजे असावेत?

एका घरातील दरवाजे हे सम संख्येत (२, ४, ६ इ.) असावेत. मुख्य दरवाजा हा इतर दरवाजांपेक्षा लांबी – रुंदीला थोडा मोठा असावा तसेच इतर दरवाजांपेक्षा जास्त सुशोभित असावा. दरवाजाची रुंदी ३ फुट असेल तर उंची ६ १/२ फुट असावी. सर्व दरवाजे आतमध्ये उघडणारे असावेत. दरवाजाला लाकडीच उंबरठा असावा.

दरवाजाच्या दिशा व त्यांचे परिणाम ……. 

अनु. क्र. दिशा श्रेणी परिणाम
१) पूर्व उच्च शुभ, उच्च विचार
२) पूर्व-ईशान्य उच्च सर्वश्रेष्ठ, शुभ व सौभाग्यदायक
३) पूर्व-आग्नेय नीच वैचारिक मतभेद, चोरी, पुत्रांसाठी कष्टदायक
४) पश्चिम-वायव्य उच्च शुभदायक
५) पश्चिम-नैऋत्य नीच आर्थिक स्थिति तसेच घरातील कर्त्यापुरुषासाठी अशुभ
६) उत्तर-ईशान्य उच्च आर्थिक फलदायक, श्रेष्ठ
७) उत्तर-वायव्य नीच वित्तहानी, चंचल स्वभाव, तणावात वाढ
८) दक्षिण-आग्नेय उच्च अर्थलाभ, स्वास्थदायक
९) दक्षिण-नैऋत्य नीच आर्थिक विनाशदायी, गृहिणींची स्थिति  कष्टदायक
१०) दक्षिण उच्च शुभफलदायक
११) पश्चिम उच्च शुभफलदायक
१२) उत्तर उच्च सुखदायक

good location in homes

Good location in factory

आता या प्रत्येक दिशांच्या दरवाजाचा मानवी जीवनावर कसा प्रभाव पडतो ते सविस्तर जाणून घेवूया.

वास्तूतज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय वास्तूसंदर्भात व वरील उपायांसंदर्भात कोणताही निर्णय घेवू नये. 

अधिक माहिती साठी संपर्क :-
वास्तुशास्त्र / ज्योतिष / रेकी तज्ञ श्री. मनोजकुमार आप्पा मोहिते
इमेल :- vastusiddhii@gmail.com
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhii/
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhi
Calling No. 83698 84338
Whatsapp no. 88280 53505

10 thoughts on “दरवाजे

  1. विक्रम खैरनार

    पश्चिम मुखी घर आहे. त्या घराचा दरवाजा पश्चिम मध्ये पासून वायव्य कडे असून दरवाजा पासून वायव्य कोपरा 6 1/2 फूट आहे.
    तर दरवाजा योग्य की अयोग्य..
    कृपया कळवा. 🙏

    Like

    Reply
    1. Vastusiddhii Consultant Post author

      मला इमेल वर तुमच्या घराचा diagram पाठवा, diagram बघुनच सांगता येईल.

      Diagram वर सर्व दिशा टाकायला विसरू नका.

      Like

      Reply
  2. दिलीप रतन गावडे

    नमस्ते सर.
    पुण्यातील एका इमारतीमध्ये 4 मजले असून प्रत्येक मजल्यावर पूर्व पश्चिम मोठी लॉबी असून त्याच्या दक्षिण व उत्तर दिशेला फ्लॅट्स आहेत. म्हणजे काही फ्लॅट्स चे दरवाजे दक्षिणेस व काहींचे उत्तरेस आहेत. आम्ही जो फ्लॅट घेऊ पाहतो त्या फ्लॅटचा प्रवेशद्वार दक्षिण दिशेस आहे. त्या फ्लॅटमध्ये प्रवेश करताना उत्तरेकडून दक्षिणेस प्रवेश करावा लागतो. तरी ही दिशा वास्तुशास्त्रानुसार योग्य आहे किंवा नाही याचे मार्गदर्शन करावे ही विनंती.

    Like

    Reply
    1. Vastusiddhii Consultant Post author

      तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुमच्या फ्लॅटचा दरवाजा उत्तरेचा येत आहे. दक्षिण दिशेस असतात तर तुम्ही दक्षिणेकडून उत्तरेकडे घरात प्रवेश केला असता.

      मुख्य दरवाजा पूर्व, ईशान्य, उत्तर मध्ये असेल तर उत्तम. घर घेण्याचा येवढा मोठा निर्णय जर तुम्ही घेत आहात तर जवळच्या वास्तूतज्ञ चा सल्ला अवश्य घेणे. घर घेणे पुन्हा पुन्हा होत नाही.

      चुकीचा दरवाजा असल्यास काय होऊ शकते हे खालील लिंक वर सविस्तर दिले आहे.

      दरवाजे

      Like

      Reply
  3. Santosh Patil

    आग्नेय दिशेला तोंड करून प्लॉट आहे. दरवाजा पुर्व कोपऱ्यात आग्नेय दिशेला तोंड करून चालते काय

    Like

    Reply
    1. Vastusiddhii Consultant Post author

      नमस्कार,

      जागेवर येऊन दिशा बघितल्याशिवाय मला योग्य मार्गदर्शन करता येणार नाही. तरी तुम्ही सांगितल्याप्रमाणे जर तुमचा प्लॉट आग्नेय दिशेला तोंड करून आहे आणि तुम्ही आग्नेय कोपऱ्यात दरवाजा घेत असाल तर त्याचे परीणाम-दुस्परीणाम काय होतात हे खालील लिंक वर सविस्तर दिले आहे.

      https://vastusiddhii.com/southeast-door-as-per-vastushastra/

      तुमच्या प्लॉट आणि वास्तुशास्त्रानुसार आर्किटेक्चरल drawing बनवून दिले जाईल, त्याच बरोबर संपूर्ण काम होईस्तोवर मार्गदर्शन हि दिले जाईल त्यासाठी संपर्क करावा.

      Like

      Reply
  4. Anil Ganpat VARANDEKAR

    NAMSKAR sir,, maja purn viswas vastu shatravar aahe Sir , Maje ghar vastu shatra aahe pan gharamdhe sukh shanti nahi sir mi vastu shatracha salla ghehun ghar bandalay pan sir majha gharacha nerutya room aajun purn jalela nahi.kay upay aahet kay.purv eshanela gharacha mukhay darvaja aahe,, noukari pan changali lagat nahi kivha changli noukari sati uttam upay dyave please Thanks sir.

    Like

    Reply
    1. Vastusiddhii Consultant Post author

      नमस्कार सर,

      माझ्यावर विश्वास ठेवून मला संपर्क केल्याबद्दल प्रथम धन्यवाद.

      तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी मला तुमच्या घराचा (जुन्या व नवीन) दिशांसहित diagram लागेल, त्यांनतर मला काही सुचवता येईल.

      व्यक्तीचा विकास हा एकाच गोष्टीवर अवलंबून नसतो तर त्याच्या पत्रिकेत काय लिहिले आहे ते ही बघावे लागते आणि त्यानुसार सुद्धा मार्गदर्शन केलं जातं.

      मनोज मोहिते

      Like

      Reply

Leave a comment