मुख्य क्षयनकक्ष चुकीच्या दिशेला येत असेल तर काय होईल?


१) पूर्व दिशेस मुख्य शयनकक्ष आल्यास नकारात्मक आहे.

  • Dual Personality चे व्यक्तिमत्व बनते (वरून शांत व आतून रागीट), पूर्वेला झोपल्याने नुकसान नाही पण नैऋत्याला न झोपण्याचे सर्व दुष्परिणाम लागतात.
  • विचारात-जीवनात अस्थिरता निर्माण होते. भावनाप्रधान व्यक्तिमत्व बनते.
  • जीवनात चालढकलपणा होत राहतो, दुसऱ्यांचा विचार, दुसऱ्यांना काय वाटेल? असे विचार करून निर्णय घेतला जातो.
  • समाज, नातेवाईक यांच्या कडून या घरातील लोकांचा जास्तीत-जास्त वापर करून घेतला जातो.
  • यांचे कामाच्या ठिकाणी कौतुक केले जात नाही.
  • Promotion Delay होते, हाताखालचे-मागचे लोकं पुढे निघून जातात, त्यांची प्रगती होते.

२) आग्नेय दिशेस मुख्य शयनकक्ष आल्यास नकारात्मक आहे.

  • येथील माणसं नेहमी अस्थिर विचारांची असतात, अस्थिर जीवन.
  • आपल्या विचारांवर ठाम नसतात, माणसागणिक विचार बदलतात.
  • त्यांची स्वतःची मतेही इतरांवर अवलंबून असतात, स्वतःचं मत कमी इतरांचे मत जास्त असते.
  • निर्णय घेण्यापासून किंवा जबाबदारी पासून हि लोकं लांब पळत असतात.
  • अशा लोकांचा सर्वांकडून वापर केला जातो. (मित्रमंडळी, नातेवाईक)
  • अशी माणसं भावनिक असतात, व भावनेच्या भरात निर्णय लवकर घेतात.
  • अशा माणसांची कुचुंबना होत असते. (घुसमट, कोंडी)
  • अशा लोकांना promotion लवकर होत नाही, credit मिळत नाही, स्वतःच्या हाताखाली शिकलेली लोकं पुढे निघून जाणार.
  • अपुरी झोप, झोप लवकर न लागणे, स्वप्नामध्ये झोप जाणार, शांत झोप न लागणार.
  • लग्न झालेले असेल तर दोघांपैकी एक तापट असणार किंवा दोघेही तापट असणार.
  • नवरा बायको मध्ये भांडणाचे प्रमाण जास्त असणार.
  • अशा लोकांना पोटाचे विकार होतात (indigestion, अपचन, gas, acidity, hyper tension, high blood pressure इ.)

३) दक्षिण दिशेस मुख्य शयनकक्ष आल्यास नकारात्मक आहे.

  • हि माणसे नेहमी अस्थिर विचारांची असतात, यामुळे यांचे जीवन अस्थिर बनते.
  • आपल्या विचारांवर ठाम नसतात, माणसागणिक यांचे विचार बदलतात.
  • यांची स्वतःची मतेही इतरांवर अवलंबून असतात, स्वतःचं मत कमी इतरांचे मत जास्त असते.
  • निर्णय घेण्यापासून किंवा जबाबदारी पासून हि माणसे लांब पळत असतात.
  • अशा माणसांचा सर्वांकडून वापर केला जातो (मित्रमंडळी, नातेवाईक, इ.)
  • अशी माणसे भावनिक असतात व भावनेच्या भरात निर्णय लवकर घेतात.
  • अशा माणसांची समाजात कुचुंबना होत असते (घुसमट, कोंडी).
  • अशा लोकांना promotion लवकर मिळत नाही, कोणत्याही कामाचे credit मिळत नाही, स्वतःच्या हाताखाली शिकलेली लोकं पुढे निघून जातात.

४) नैऋत्य दिशेस मुख्य शयनकक्ष आल्यास सकारात्मक आहे.

  • यामुळे जीवनात विचारांची स्थिरता येथे, प्रगतीचा पाया भक्कम होतो.
  • या घरात २ ते ३ वर्षात प्रगती होते, कर्त्या पुरुषाची प्रगती झपाट्याने होते, कर्त्या पुरुषाचे दृढ विचार होतात, ते हलगर्जीपणाने वागत नाहीत. नैऋत्य दिशा उत्तम लिडरपणा निर्माण करते, लोकसंग्रह जास्त करते. येथील लोकांना Convince करता येत नाही. हि लोकं लगेच आपली मत नाही सांगत. योग्य विचार, योग्य निर्णय, योग्य वेळेला यांना घेता येतात. या घरातील लोकांची प्रगती फास्ट होते. हि लोकं राजकारणामध्ये छाप पाडतात.
  • यांना कामाच्या ठिकाणी प्रोत्साहन – Credit मिळते, त्यामुळे यांची प्रगती होते.
  • ज्यांचा मुख्य शयनकक्ष नैऋत्य दिशेला असतो त्यांना त्यांच्या रच्छेनुसार फळ मिळतात, इच्छा पूर्ण होतात. त्यांच्या साध्या बोलण्यामध्येही वचक असतो.
  • पहिली पिढी व दुसरी पिढी मधील Gap हा मुख्य शयनकक्ष कमी करतो.

५) पश्चिम दिशेस मुख्य शयनकक्ष आल्यास नकारात्मक आहे.

  • या घरातील पुरुष नेहमी अस्थिर विचारांचे असणार, त्यामुळे यांचे जीवन अस्थिर होणार.
  • पुरुष यांच्याच विचारांवर ठाम नसणार, माणसागणिक यांचे विचार बदलणार.
  • या घरातील स्त्रीला नैऋत्य दिशा मिळत असल्यामुळे या घरातील पुरुषांवर स्त्रियांचेच वर्चस्व राहणार. स्त्री ने ठरविले तरच या घरात कामे होणार. स्त्रियांच्या विचारात, आचारात, कामे करण्याच्या पद्धतीत आत्मविशास आणि स्थिरता असणार. स्त्रियांचे निर्णय चांगले निघणार.

६) वायव्य दिशेस मुख्य शयनकक्ष आल्यास नकारात्मक आहे.

  • येथे झोपणाऱ्या व्यक्तीचा फिरतीचाच job असणार.
  • येथे झोपणाऱ्या नवरा-बायकोचे विचार अस्थिर असणार, झोप चांगली लागणार नाही, दोघांच्याही मन बुद्धीवर वायू तत्वाचा परिणाम होणार, परिणामस्वरूप misunderstanding मुळे भांडणं होणार.
  • येथे झोपणारा व्यक्ती हा कंजूस असतो. दुसर्यांच्या खिशातील पैसे कसे काढता येतील या विचाराचाच असणार.

नैऋत्य दिशा मिळत नसल्यामुळे, अस्थिर जीवन, निर्णय घेण्यात चाल ढाल, जबाबदारी घेणार नाही, स्वतःच्या विचारांपेक्षा इतरांचा विचारांचा प्रभाव त्या माणसांवर अधिक असणार, भावनिक होऊन निर्णय घेणार, त्याला काय वाटेल हा विचार करून निर्णय घेणार, समाजातील लोकं या माणसाचा वापर करून घेणार, कामाच्या ठिकाणी त्याचं कौतुक होणार नाही, कामाचे श्रेय त्यांना मिळणार नाही, promotion delay होणार, junior लोकं पुढे निघून जाणार.

७) उत्तर दिशेस मुख्य शयनकक्ष आल्यास नकारात्मक आहे.

  • उत्तर दिशा हि जल तत्त्वाची दिशा असल्याने येथे झोपलेला माणूस शांत स्वभावाचा होतो, अचानक प्रचंड राग येणार, चिडखोर स्वभावही यांचा यामुळे बनतो.
  • अस्थिर विचाराचे असतात.
  • कामामध्ये चाल ढकलपणा करणारी असतात.
  • स्वतःच मत नसतं, लगेच दुसर्यांच्या प्रभावाखाली येतात, लगेच प्रभाव पडतो.
  • हि मानसं भावनिक असतात, भावनेच्या भरात निर्णय घेतात.
  • अरेरे तेव्हा केलं असतं तर बरं झालं असतं – असा स्वभाव असतो, योग्य वेळी योग्य निर्णय घेता येत नाहीत.
  • कामाच्या ठिकाणी कौतुक होत नाही, कौतुक दुसऱ्याचेच होणार.
  • कामाच्या ठिकाणी / शेजाऱ्यांकडून / समाजाकडून यांचा वापर करून घेतला जाणार.
  • कंपनीमध्ये junior लोकं पुढे निघून जाणार, हे मात्र आहे त्या स्थितीत राहतील (कुंचुंबना होते)
  • Promotion delay होणार. घर सोड वृत्तीचे असणार.
  • एक काम पूर्ण करत नाहीत.

८) ईशान्य दिशेस मुख्य शयनकक्ष आल्यास नकारात्मक आहे.

  • ही जलतत्वाची दिशा असल्यामुळे येते झोपणारा व्यक्ती द्विस्वभावी बनतो. वर-वर बघता शांत पण आतून रागीट किंवा बाहेर रागीट घरात शांत असा स्वभाव होतो.
  • येथे झोपणारा व्यक्ती वैराग्याकडे झुकतो.
  • घरातील कोणतेही काम करण्यापासून कंटाळ करतात.
  • संसारापासून लांब जातात, जबाबदारीने, रस घेऊन संसार करत नाहीत.
  • नैऋत्येला मुख्य शयनकक्ष नसल्यामुळे अस्थिर विचार, अस्थिर जीवन, मते, निर्णय घेण्यापासून, जबाबदारी घेण्यापासून लांब पळतात, योग्य वेळी योग्य निर्णय घेता येत नाही.
  • यांना जीवनात चुकचुकलेपणा जाणवतो.
  • सामाजाकडून, मित्रांकडून या माणसांचा जास्तीत जास्त वापर केला जातो.
  • हि माणसं भावनिक होऊन निर्णय घेतात, दुसऱ्याला काय वाटेल हा विचार करून निर्णय घेतात.
  • कामाच्या ठिकाणी यांचे कौतुक होत नाहीत, केलेल्या कामाचे श्रेय दुसरा घेऊन जातो.
  • हाताखाली काम करणारे लोकं पुढे निघून जातात, यांचे Promotion लांबते.
  • प्रत्येक गोष्टीत घरसोड वृत्ती निर्माण होते.
  • ईशान्य ठिकाणी झोपणाऱ्या माणसाला कामाच्या ठिकाणी मानसिक त्रास होत असल्यामुळे सतत नोकरी सोडण्याचे विचार डोक्यात येतात.

९) ब्रम्ह्स्थानी मुख्य शयनकक्ष आल्यास नकारात्मक आहे.

  • झोप पुरेशी होणार नाही.
  • सतत स्वप्न पडत राहणार.
  • या ठिकाणी झोपणारी व्यक्ती एक्क्लकोंडी होणार, सतत मानसिक तणावाखाली राहणार.

वास्तूतज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय वास्तूसंदर्भात व वरील उपायांसंदर्भात कोणताही निर्णय घेवू नये. 

अधिक माहिती साठी संपर्क :-
वास्तुशास्त्र / ज्योतिष / रेकी तज्ञ श्री. मनोजकुमार आप्पा मोहिते
इमेल :- vastusiddhii@gmail.com
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhii/
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhi
Calling No. 83698 84338
Whatsapp no. 88280 53505

Leave a comment