देवघर कसे असावे.


देवघर कसे असावे.

  • देवघर लाकडाचे किंवा संगमरवरी दगडाचे असावे किंवा लाकडाच्या वरती पत्र्याची नक्षी केलेला असला तरी चालेल.
  • घरातील मंदिर कमीत-कमी दिड फुट उंच, एक फुट खोल आणि दिड फुट रुंद असावे.
  • मंदिरावर कळशाच्या खालील भाग असावा परंतु कळस नसावा.
  • मंदिरात पायऱ्या १, ३, ५ अशा असाव्यात.
  • मंदिर भिंतीवर अडकवून ठेवू नये. भिंतीवर जर मंदिर लावायचे असल्यास अगोदर भिंतीत एक लादी लावावी आणि त्यावर मंदिर ठेवावे.
  • मंदिरात लुखलुखता बल्ब लावू नये, शुभ्र पांढरा प्रकाशाचा बल्ब लावावा.
  • शक्यतो मंदिर जमिनीवरच ठेवावे, पूजा चांगली होते. जमिनीवर पाठ ठेवून मंदिर त्यावर ठेवावे.
  • मंदिर घरात पूर्वं ईशान्य, उत्तर किंवा पश्चिम दिशेला येईल असेच लावावे, चुकुनही घराच्या आग्नेय, दक्षिण किंवा नैऋत्य दिशेला मंदिर ठेवू नये.
  • नवीन मंदिर घेताना शुभ दिवस बघुनच मंदिर घ्यावे.
  • मंदिरातील देव-देवतांची पूजा घरातील कर्त्या पुरुषानेच करणे गरजेचे आहे.
  • पूजा करताना आपलं तोंड पूर्व, उत्तर किंवा पश्चिम दिशेला आलं पाहिजे, चुकुनही दक्षिण दिशेला येता कामा नये.
  • मंदिरात आपल्या डाव्या हाताला दिवा लावावा, दिव्यात दोन वातीची एक वात आणि तिळाचे तेल किंवा तूप वापरावे.
  • घरात पूजा झाल्यानंतर एकूण ४ अगरबत्ती लावाव्यात. दोन मंदिरात आपल्या उजव्या हाताला, एक तुळशीत आणि एक मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर.
  • मंदिराला दररोज एक चांगला हार लावावा. प्रत्येक फोटो-मूर्तीला फुले वाहावीत.
  • पूजा झाल्यानंतर आठवणीने शंख वाजवावा.
  • मंदिरात किंवा घरात भगवान शंकराचा फोटो असू नये.

Temple

वास्तूतज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय वास्तूसंदर्भात व वरील उपायांसंदर्भात कोणताही निर्णय घेवू नये. 

अधिक माहिती साठी संपर्क :-
वास्तुशास्त्र / ज्योतिष / रेकी तज्ञ श्री. मनोजकुमार आप्पा मोहिते
इमेल :- vastusiddhii@gmail.com
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhii/
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhi
Calling No. 83698 84338
Whatsapp no. 88280 53505

Leave a comment