श्री यंत्र


meru-chakra

Meruprustha Shree Yantra

आज जगात सर्वांना लक्ष्मी (धन) हवे आहे. प्रत्येक माणूस लक्ष्मीच्या मागे लागला आहे आणि ती लक्ष्मी मिळविण्यासाठी माणूस रात्रं-दिवस मेहनत करीत असतो. अशावेळी काही लोकांना ती मिळते काहींना ती मिळत नाही, काहीना ती जास्त मिळते काहींना फारच कमी मिळते. पण आपण जर लक्ष्मीची उपासना केली, आराधना केली तर मात्र लक्ष्मी आपल्याला जरूर मिळेल. किंबहुना घरी आलेली लक्ष्मी टिकावी यासाठी “मेरुपृष्ट श्रीयंत्राच्या” माध्यमातून लक्ष्मी उपासना आणि आराधना करणे गरजेचे आहे. यंत्र म्हणजे ईश्वरी शक्तीचे मुख्य केंद्र आहे. वैज्ञानिक भाषेचा विचार करता त्यांना आपण एनर्जी सर्किट म्हणू शकतो. कारण या यंत्राची रचना अशा पद्धतीने केलेली असते की त्यातून विशिष्ठ ऊर्जा निर्माण केली जाते आणि असे यंत्र शास्त्रोक्त पद्धतीने सिद्ध केले म्हणजे ते कार्यान्वित होते. भारतीय यंत्रमंत्र शास्त्रात “श्री यंत्रास” “यंत्रराज” म्हणजे यंत्राचा राजा म्हणतात. यातून महालक्ष्मी – महाकाली – महासरस्वतीच्या कृपाशक्तीचा लाभ होत असतो. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या घरी श्री यंत्राची स्थापना करून नित्य नियमाने त्याची पूजा केल्यास लक्ष्मीचा वरदहस्त त्या घरावर राहील.

  • श्री यंत्राच्या समोर दररोज सकाळ व संध्याकाळ श्री सूक्ताचे पारायण करावे. (१,३,५,११,१६ वेळा)
  • प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला गाईच्या दुधाने त्या यंत्रावर अभिषेक करावा.
  • अभिषेक करत असताना श्री सूक्ताचे पारायण करावे, तसेच लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणावे.
  • दररोज यंत्रा समोर धूप, अगरबत्ती करावी.

* काही नियम *

१. घरातील स्त्री हे लक्ष्मीचे रूप असल्यामुळे तिचा नेहमी आदर-सन्मान करावा. तिचा कधी अपमान करू नये.

२. घरात पैशाच्या रूपाने येणाऱ्या लक्ष्मीचा आदर करावा. प्रथम लक्ष्मीस देवघरात ठेऊन तिची हळद कुंकू लावून पूजा करावी नंतर ती मुख्य तिजोरीत ठेवावी, त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या लक्ष्मीचा विनियोग करण्यासाठी आपल्या हातात घ्यावी. बँकेचा धनादेश असला तरी अशाच पद्धतीने त्याची क्रिया करावी.

३. लक्ष्मीची उपासना करणाऱ्याने नेहमी दान-धर्म करावा. वृद्धाश्रम, अनाथाश्रम किंवा गरजू विद्यार्थ्यांस मदत करावी. रांजल्या – गांजल्यांना आधार द्यावा. कारण लक्ष्मीचा एक नियम आहे, तुम्ही जेवढी लक्ष्मी दान-धर्मात खर्च कराल त्याच्या दहापट लक्ष्मी तुम्हाला मिळेल आणि निस्वार्थ भावाने लक्ष्मी दान धर्मासाठी दिल्यास त्यांचे पुण्यफळ मानवाला मिळत असते.

महामेरू श्रीयंत्र खरेदी करण्यासाठी पुढील लिंक https://amzn.to/3sNPBJa

श्री यंत्राची शास्त्रोक्त पद्धतीने पूजा करून नावाने स्थापन करून दिले जाईल.
रू. ५५००/-

वास्तूतज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय वास्तूसंदर्भात व वरील उपायांसंदर्भात कोणताही निर्णय घेवू नये. 

अधिक माहिती साठी संपर्क :-
वास्तुशास्त्र / ज्योतिष / रेकी तज्ञ श्री. मनोजकुमार आप्पा मोहिते
इमेल :- vastusiddhii@gmail.com
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhii/
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhi
Calling No. 83698 84338
Whatsapp no. 88280 53505

Leave a comment