देवघराची जागा बदलायची असल्यास काय करावे?


देवघराची जागा बदलायची असल्यास काय करावे?

  • अतिशय शांतपणे देवघराची जागा बदलण्यास घ्यावी. अमावस्या सोडून शुभ दिवशी हे कार्य करावे.
  • देवघराची जागा बदलण्याअगोदर दोन नारळ घ्यावयाचे आहे. एक नारळ जुन्या देवघराच्या जागी ठेवणे, दुसरा नारळ नवीन देवघराच्या जागी ठेवणे (पाटावर किंवा थाळीवर ठेवणे).
  • दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी देवघराची जागा बदलण्यास घ्यावी. पहिल्यांदा जुन्या देवघराच्या जागी दोन थाळ्या ठेवणे. (एक डावीकडे, एक उजवीकडे), एका थाळीत जे देव विसर्जित करायचे आहेत ते घेणे आणि दुसऱ्या थाळीत जे देव देवघराबरोबर न्यायचे आहेत ते घेणे. देवाचे फोटो आणि मुर्त्या देवघरातून बाहेर काढताना दोन प्रकारच्या प्रार्थना करायच्या आहेत. ज्या मुर्त्या किंवा फोटो विसर्जित करायच्या आहेत त्या प्रत्येक देवाची प्रार्थना घेवून नावानिशी नमस्कार करावा आणि देवाची क्षमा मागावी. “हे देवा (येथे देवाचे-देवीचे नाव घेणे) आतापर्यंत आम्ही तुमची या जागेवर नित्य पूजा करत आलो आहोत पण आजच्या नंतर या जागी तुमची नित्य पूजा करणं माझ्याने होणार नाही त्यासाठी आम्ही तुम्हाला विसर्जनाला नेत आहोत आमच्या हातून काही चूक घडल्यास आम्हाला क्षमा करावी.” त्यानंतर एक चांगला मुहूर्त बघून त्या मुर्त्या – फोटो आदरानिशी वाहत्या पाण्यात विसर्जित करावे.
  • नंतर जे फोटो – मुर्त्या मंदिराबरोबर न्यायचे आहेत त्या प्रत्येक देवाची प्रार्थना घेवून नावानिशी नमस्कार करावा आणि पुढील प्रार्थना म्हणावी “हे देवा (येथे देवाचे-देवीचे नाव घेणे) आजपर्यंत आम्ही तुझी या जागेवर नित्य पूजा करत आलो होतो पण आजपासून आम्ही तुझी वास्तुशास्त्रानुसार योग्य जागी ठेवून पूजा करणार आहोत, त्यासाठी या जागेवरून आम्ही तुम्हाला हलवत आहोत, या जागेवरून तुम्हाला हलवत असताना आमच्या हातून काही चूक घडली, काही अपराध झाल्यास तू आम्हाला क्षमा कर. अशी प्रार्थना झाल्यानंतर आदरानिशी एक एक देव उचलून दुसऱ्या थाळीत घेऊन नवीन मंदिराजवळ जायचे आहे.
  • नंतर नवीन मंदिरात व्यवस्थित फोटो, मुर्त्या मांडून प्रार्थना करावी. “हे देवांनो आज पासून आम्ही तुमची या जागेवरून नित्य पूजा करणार आहोत तेव्हा आमच्या पूजेचा स्वीकार करावा. आम्ह्ची पूजा गोड माणून घ्यावी आणि आमच्या पूजेचे योग्य फळ आम्हाला प्राप्त व्हावे ही प्रार्थना.
  • नंतर नवीन मंदिराजवळ ठेवलेला नारळ फोडून गोड पदार्थ बनविण्यासाठी वापरावे आणि जुन्या मंदिराजवळील नारळ विसर्जनाच्या थाळीतील देव व घरात इतरत्र ठेवलेल्या देवांचे त्या त्या जागी जावून प्रार्थना घेवून, नमस्कार करून क्षमा मागावी व नारळासहित सर्व फोटोंचे विसर्जन करावे. काचेच्या फ्रेम मधून फोटो काढून विसर्जित करावे.          

खालील प्रमाणे मंदिरातील ठेवण करावी.

Place of photos

वास्तूतज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय वास्तूसंदर्भात व वरील उपायांसंदर्भात कोणताही निर्णय घेवू नये. 

अधिक माहिती साठी संपर्क :-
वास्तुशास्त्र / ज्योतिष / रेकी तज्ञ श्री. मनोजकुमार आप्पा मोहिते
इमेल :- vastusiddhii@gmail.com
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhii/
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhi
Calling No. 83698 84338
Whatsapp no. 88280 53505

Leave a comment