पण का?


या सदरात आपण वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करणार आहोत. आपल्या संस्कृतीमध्ये असंच का? पण का? या प्रश्नांवर.

हिंदू स्त्रिया आपल्या भांगात कुंकू का लावतात?

भांगामध्ये कुंकू लावणे सुवासिनी स्त्रियांचे सूचक आहे. हिंदू मध्ये विवाहित स्त्रीयाच कुंकू लावतात. कुमारिका आणि विधवा स्त्रियांना कुंकू लावणे वर्जित आहे. त्याशिवाय कुंकू लावल्याने स्त्रियांच्या सौंदर्यामध्ये भर पडते अर्थातच त्यांचे सौंदर्य वाढते. विवाहाच्या वेळी वर वधूच्या मस्तकावर मंत्रोच्चारात पाच किंवा सात वेळा कुंकू भरतो त्यानंतरच विवाह कार्य संपन्न होते. त्या दिवसा पासून ती स्त्री आपल्या पतीचे आयुष्य दीर्घायू होण्यासाठी दरदिवशी नियमित कुंकू लावते. मस्तकावर चमकणारे कुंकू स्त्रियांच्या सौंदर्याचे प्रमुख अंग आहे.

भांगामध्ये कुंकू लावण्याचे वैज्ञानिक कारण देखील आहे किंवा हि कोरी रूढीवदिता आहे?

ब्रम्हरंध्र आणि अध्मि नावाच्या मर्मस्थानाच्या बरोबर वर स्त्रिया कुंकू लावतात. ज्याला सामान्य भाषेत सीमांत किंवा भांग म्हणतात. पुरुषांच्या अपेक्षेपेक्षा स्त्रियांचा हा भाग अपेक्षाकृत कोमल असतो. कारण कुंकवामध्ये पार्यासारखा धातु अधिक प्रमाणात मिळतो जो स्त्रियांच्या शरीराची विद्युत ऊर्जा नियंत्रित करतो किंवा मर्मस्थलाचा बाहेरील दृष्ट प्रभावापासुन बचाव करतो.

गायीचे दूध पवित्र आहे-कसे?

पौष्टिक आणि सत्वगुण प्रधान गायीचे दूध देवतांवर वाहतात. धर्म शास्त्रांमध्ये गायीचे दूध पवित्र मानले जाते. गायीच्या दुधाच्या सेवनाने संग्रहणी, शोथ इत्यादी रोग नष्ट होतात. ते स्थुलता, जाडेपणा आणि मेदवृद्धीला देखील दूर करतात. त्यामध्ये प्रोटीन आणि विटामिन योग्य प्रमाणात मिळते जे बालकांसाठी उत्तम आहे. आईच्या दुधानंतर डॉक्टर मुलांना गायीचे दूध देण्याचा सल्ला देतात.

गणपतीला दुर्वा वाहताना दुर्वांची तीन टोके (अग्रे) मागे करावीत कि पुढे? देवाला फुले कशी वाहावीत? बेल व तुळशीपत्रे वाहण्याची पद्धत कोणती?

गणपतीला दुर्वा वाहताना अग्रे (तीन टोके) आपल्याकडे करावीत. फुले झाडावर येतात तशीच म्हणचे देठ खाली करून वाहावीत. शिवाला बेल वाहताना तो पालथा वाहवा. कृष्ण किंवा विष्णूला तुळस वाहताना मांजिर्या वर कराव्यात. थोडक्यात, फुले व वनस्पती झाडावर जशा येतात तशाच वाहाव्यात.

गंध लावताना ते कोणाला, कोणत्या बोटाने लावावे?

सपिंड श्राध्द विधीच्या वेळी पितरांना किंवा ब्राह्मणांच्या हाताला लावावयाचे गंध तर्जनीने (अंगठ्या शेजारचे बोट) लावावे, स्वतःला मधल्या बोटाने व देवाला अनामिकेने लावावे. जपाची माळ ओढतानाही मणी तर्जीने ओढू नयेत, कारण ते पितरांचे बोट आहे. पितरांना तर्पण करतानाही पाणी अंगठ्यावरून न सोडता तर्जनीवरून सोडावे.

 मंदिरात देवासमोर नारळ का फोडतात?

देवासमोर नारळ फोडण्यामागे बलिदानाचा भाव आहे. प्राचीन काळी देवासमोर मनुष्य किंवा पशूचा बळी देण्यात येत असे. हि गोष्ट भारतीय संस्कृतीत बसत नसल्याने ज्ञानी ऋषींनी यातूनही एक मार्ग शोधून काढला. त्यांनी विश्वामित्राच्या प्रतिसृष्टीतील नर म्हणजे नारळ ह्याचे बलिदान लोकांना सुचविले कारण नारळालाही डोके, शेंडी, नाक, डोळे इ. आहेत. परंतु बलिदानाच्या वेळी रक्ताचा शिढकावा झाला पाहिजे. म्हणून ऋषींनी देवाच्या मूर्तीला सिंदूर (कुंकू) लावायला व त्यावर नारळाच्या पाण्याचा शिढकावा करण्यास सांगितले. त्यामुळे रक्ताचा लाल रंगही येईल! अशा प्रकारे ऋषींनी मानवाला नर आणि पशूहत्येपासून वाचविले. शिवाय नारळ हे बाराही महिने सहज मिळणार फळ असून ते दीर्घकाळ टिकणारेही आहे.

देवपूजा कुणी करावी?

देव या शक्तीवर श्रद्धा व विश्वास असणाऱ्या प्रत्येकाने देवपूजा करावी, मात्र एकत्र कुटुंबात घरातील कर्त्या पुरुषाने देवपूजा करावी. पुरुष नसल्यास स्त्रीने पूजा करावी. मात्र एकाच घरात वेगवेगळ्या ठिकाणी देव ठेवून त्यांची पूजा करू नये.

घरातील कर्त्या पुरुषाने देवपूजा केल्यानंतर इतरांनी देवाला वंदन करून फुले वहावीत. आरतीच्या वेळी घरातील सर्वांनी सहभागी व्हावे व एकाच स्वरात आरत्या म्हणाव्यात. निदान एकाने आरती म्हणून इतरांनी टाळ्या वाजवाव्यात.

वास्तूतज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय वास्तूसंदर्भात व वरील उपायांसंदर्भात कोणताही निर्णय घेवू नये. 

अधिक माहिती साठी संपर्क :-
वास्तुशास्त्र / ज्योतिष / रेकी तज्ञ श्री. मनोजकुमार आप्पा मोहिते
इमेल :- vastusiddhii@gmail.com
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhii/
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhi
Calling No. 83698 84338
Whatsapp no. 88280 53505

Leave a comment