वास्तुशास्त्र आणि ज्योतिष मार्गदर्शनाचा पती-पत्नीच्या सुखी वैवाहिक जीवनासाठी कसा उपयोग होऊ शकतो?


वास्तुशास्त्र आणि ज्योतिष मार्गदर्शनाचा पती-पत्नीच्या सुखी वैवाहिक जीवनासाठी कसा उपयोग होऊ शकतो?

या ब्लॉग मधून मला कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धेला खतपाणी घालायचे नाही कारण मला स्वत:लाच शास्त्राच्या आहारी गेलेली लोकं आवडत नाहीत कारण ते स्वता:चं कर्तुत्व न दाखवता देवावर अवलंबून राहतात आणि अपयश आले की देवाच्याच नावाने खडी फोडतात, त्यानंतर देव-बिव काही नाही हि सर्व अंधश्रद्धा आहे असे ओरडत सुटतात, तेच सध्या शास्त्रांचा खऱ्या अर्थाने अपमान करत आहेत.

आज आपण सुखी वैवाहिक जीवनासाठी ज्योतिष शास्त्राचा कसा उपयोग करून घेता येईल ते बघूया….

गेल्या २० वर्षाचा आढावा घेतला तर असे लक्षात येईल कि २० वर्षा पूर्वीच्या प्रत्येक नात्यामध्ये जी आपुलकी-प्रेम होते ते आता शोधूनही सापडणार नाही. आज पती-पत्नी मधील नातं फक्त नावालाच राहिलं आहे, हे तर काहीच नाही, आज आई-वडील, भाऊ-बहीण, पती-पत्नी, मित्र-मैत्रीण असं कोणतही नातं असो त्यामध्ये फक्त व्यवहारच आला आहे. मला काय व किती मिळेल हेच प्रत्येकजण विचार करत आहे आणि त्यानुसार समोरच्या बरोबर नाती जोडत आहे आणि टिकवत आहे.

यात एका कोणाला दोष देता येत नाही कारण आपण सर्वच आपली संस्कृती विसरत चाललो आहोत, चाली-रीतींना जुनाट रुड्यांच्या नावाखाली तिलांजली देत चाललो आहोत. शास्त्र काय सांगते हे जाणून न घेता अंधश्रद्धेच्या नावाखाली आपणच आपल्या संस्कृतीला काळाआड करत चाललो आहोत.

प्रत्येकानेच शास्त्राचा स्वत:च्या सर्वांगीण विकासासाठी अभ्यास केल्यास त्यांच्या मनात आई-वडील, भाऊ-बहीण, पती-पत्नी, मित्र-मैत्रीण यासारख्या अनेक नात्यांबद्दल आदर जागृत होईल आणि त्यामुळे नाती सशक्त आणि मजबूत होतील.

हे तर नक्कीच कि कोणत्याही शास्त्रावर अंध श्रद्धा ठेवू नका, डोळस वृत्तीने शास्त्र समजून घ्या, तेव्हा तुम्हाला खऱ्या अर्थाने आपल्या सर्व ग्रंथांची ताकद कळून येईल.

ज्या भारतीय शास्त्रांच्या-ग्रंथांच्या एका-एका पंक्तीवर इतर देश शोध करून त्या त्या गोष्टींमध्ये पेटेंत घेत आहेत तिथे आपल्यातीलच काही हुशार पंडित अंधश्रद्धा-अंधश्रद्धा करत स्व:ताही काही खरं काय आहे ते जाणून घ्यायचा प्रयत्न करत नाहीत व दुसऱ्यांनाही काही करून देत नाहीत.

त्यामधीलच एक शास्त्र म्हणजे ज्योतिष शास्त्र……

आज पत्रिका बघून विवाह जुळविणे म्हणजे काहीजण याला मूर्खपणाचा कळसच मानत आहेत, अहो पण ते पत्रिका कोणाकडे बघत आहेत, कसे बघत आहेत यावरही त्याचा परिणाम होतो ना!! पत्रिका बघणारा तेवढा परिपूर्ण आहे कि नाही हे कोण बघणार, कि बघितला बोर्ड ज्योतिषाचा आणि चालले तोंड वर करून स्वत:च भविष्य जाणून घ्यायला आणि काही फायदा झाला नाहीतर ते अतिशहाणे संपूर्ण ज्योतिषशास्त्रावरच आरोप करणार.

आज मोठं-मोठे शोध शास्त्रांच्याच आधारावर लावले जात आहेत, संपूर्ण वर्षाचं कालनिर्णय अगोदरच्या वर्षातच तयार असते हे कोणत्या आधारे याचा कोणी विचार तरी केला आहे का? यावर चर्चा करायची झाल्यास एक पुन्हा वेगळा ब्लॉग लिहावा लागेल. तेही करू पण आता फक्त ज्योतिष शास्त्रा आणि वैवाहिक जीवन याच्या संबंधावर बोलूया….

नशिबात होणारं कोणाला चुकलं आहे, पण काय हरकत आहे कि थोडं जाणून घेवून पुढे काय करायचे हे ठरवल्यास. खरचं मी गेल्या १० वर्षात जेवढ्या पत्रिका बघितल्या त्यापैकी एकही पत्रिका त्या व्यक्तीच्या चालू घडामोडीशी जुळल्या नाहीत असं झालं नाही. शास्त्राच्या द्वारे सर्व अवलोकन खरेच निघाले.

पत्रिका बघितल्यामुळे त्या व्यक्तीच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाची ओळख होते जे आयुष्यातील लग्नासारख्या सर्वात मोठा निर्णय घेताना समजून घेणे खूप गरजेचे आहे.

आज पती-पत्नीमधील नातं बघितल्यास असं लक्षात येईल कि त्या दोघांमध्ये १०% सुद्धा प्रेम-आपुलकी राहिली नाही. याचं हेच कारण कि लग्न ठरविताना एक तर पत्रिका बघितली नाही किंवा त्यांनी एकमेकांना लग्नापूर्वी नीट समजून घेतलं नाही.

नक्कीच पत्रिका बघून लग्न ठरविल्यास १००% नाही तर निदान ६०% ते ७०% तरी आनंद त्यांच्या जीवनात आपण आणून देवू शकतो. लग्नाच्या अगोदर पत्रिका नाही बघीतली आणि आता वैवाहिक जीवनात खटके उडत आहेत तरीही पत्रिका बघून काय निर्णय घ्यायचा हेही लग्न झाल्यानंतर ठरवू शकतो अगदी घटस्पोट घ्यायला निघालेली जोडपीही आता आनंदाने सुखी संसार करत आहेत.

आता पत्रिका बघताना नक्की काय बघायचे हे तुमचा या ब्लॉगला कसा प्रतिसाद मिळतो त्यावर ठरवू आणि ब्लॉग पुढे चालू ठेवू.

तो पर्यंत धन्यवाद!!!!


वास्तुशास्त्र / ज्योतिष / रेकी तज्ञ श्री. मनोजकुमार आप्पा मोहिते
इमेल :- vastusiddhii@gmail.com
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhii/
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhi
Calling No. 83698 84338
Whatsapp no. 88280 53505

3 thoughts on “वास्तुशास्त्र आणि ज्योतिष मार्गदर्शनाचा पती-पत्नीच्या सुखी वैवाहिक जीवनासाठी कसा उपयोग होऊ शकतो?

Leave a comment