परंपरेनुसार दिवाळी सण साजरा करूया आणि जीवनात आनंद आणूया. सर्वांना दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा – २०२२


येणारी दिवाळी तुमच्या आयुष्यात सुदृढ आरोग्य, सुख-समृद्धी आणि भरभराटी घेऊन येवो हीच शुभेच्छा

दिवाळीतील सर्व पूजा कुटुंबाबरोबर हसतमुख आणि शास्त्राप्रमाणे सर्व साहित्य व मंत्रांचा वापर करून साजरी केल्यास तुम्हाला त्याचा जास्त चांगला आनंद घेता येईल. दिवाळी २१ ऑक्टोबर २०२२ पासून सुरुवात होत आहे. त्या दिवसापासून सुरु होणाऱ्या पूजा कोण-कोणत्या आणि त्या कशासाठी करतात हे खालील तक्त्यात दिलेले आहे.

२१ऑक्टोबर – शुक्रवार –

वसुबारस – दिवाळीची सुरुवात संध्याकाळी गाईची पाडसासह पूजा करून केली जाते.

पूजेचा मुहूर्त :- संध्या. ०५:४६ ते ०८:१८

घरात लक्ष्मीचे आगमन, आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात.

ह्या दिवशी गहू, मूग खात नाहीत ह्या दिवसापासून अंगणात रांगोळी काढण्यास सुरूवात करतात.

************************************************************************

२२ऑक्टोबर – शनिवार –

धनत्रयोदशी – लक्ष्मीची मूर्ती, वह्या, धंद्याची हत्यारे, सोने, नाणे ह्यांची पूजा करतात. वैद्य लोक ह्या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात.

धनाची पूजा करणे हा या सणामागील हेतू आहे.

लक्ष्मीची / धनाची पूजा मुहूर्त

संध्या. ०७:०१ ते ०८:१७

व्यापारी वह्या आणण्याचा मुहूर्त :-

स. ०८:०३ ते स. ०९:३० दु. ०१:४९ ते दु. ०४:४२

या दिवसापासून दारांत आकाशकंदील व पणत्या लावण्यास सुरूवात करतात.

यमदीपदान – कुटुंबातील सर्वांच्या दीर्घायुष्यासाठी यमदीपदान केले जाते.

यमदीपदान – संध्या. ०६:०२ ते ०७:०१

************************************************************************

२४ऑक्टोबर – सोमवार –

नरक चतुर्दशी – ह्या दिवशी सूर्योदयापूर्वी सर्वजण स्नान करतात. स्नानाच्या वेळी उटणे, सुवासिक तेल, सुगंधी साबण वापरतात. स्नानानंतर मुले फटाके उडवतात.

कुटुंबातील ऐक्याकरीता.

अभ्यंग स्नान या दिवसापासून सुरु होतात.

अभ्यंगस्नान मुहूर्त स. ०५:०६ ते ०६:२७

या दिवशी पहाटेच पणत्या लावतात. सर्वत्र समृद्धी व्हावी याकरितां अशा पणत्या लावण्याची प्रथा आहे. या दिवशी सणाच्या दिवशी करतात तसा स्वयंपाक करून देवाला नैवेद्य दाखवतात.

************************************************************************

२४ऑक्टोबर – सोमवार –

लक्ष्मीपूजन  – व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते.

या दिवशी सर्व अभ्यंग स्नान करतात. पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात. त्यावर वाटी किंवा तबक ठेवतात. त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रूपया, दागिने ठेवून त्यांची पूजा करतात.

लक्ष्मी पुजेसाठीचा मुहूर्त

संध्या. ०६:५३ ते ०८:१६

वहीपूजन मुहूर्त :-

रात्री १०:४९ ते १२:२३ रात्री ०१:५६ ते स. ०५:०४

या दिवशी स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी केरसुणी विकत घेतात. तिलाच लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी घालून हळद-कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरूवात करतात.

************************************************************************

२६ऑक्टोबर – बुधवार –

पाडवा  – आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी लोक दिवाळीतील पाडवा ही नववर्षाची सुरुवात मानतात.

नवीन वर्षाची सुरुवात लक्ष्मीप्राप्तीसाठी नव्या वह्यांचे पूजन करून व्यापारी लोक वर्षाचा प्रारंभ करतात.

पाडव्याचा मुहूर्त

सूर्योदय ते स. ०९:३० स. १०.५६ ते १२.:२२. 

नवीन वह्या सुरू करण्यापूर्वी वह्यांना हळद-कुंकू, गंध, फूल, अक्षता वाहून पूजा करतात. घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी पतीला औक्षण करते व पती पत्नीला ऒवाळणी घालतो.

************************************************************************

२६ऑक्टोबर – बुधवार –

भाऊबीज  – भाऊ बहिणीकडून ऒवाळून घेतो. भाऊ तिला प्रेमाचे प्रतिक म्हणून काहीतरी भेटवस्तू किंवा पैसे देतो. जर काही कारणाने बहिणीला कोणी भाऊ भेटलाच नाही तर ती चंद्राला भाऊ समजून ऒवाळते.

भावा-बहिणीने एकमेकांची आठवण ठेवावी, विचारपूस करावी, एकमेकांवर प्रेम करावे यासाठी हा सण साजरा करतात.

भाऊबीज मुहूर्त दु. ०१:१२ ते ०३:२७

या दिवशी भावाने बहिणीकडे जाऊन ओवाळून घ्यावयाचे असते व बहिणीने स्वत:च्या हाताने केलेला स्वयंपाक भावाला काऊ घालायचा असतो त्यामुळे भावाचे आयुष्य वाढते.

************************************************************************

दिवाळीच्या सणाबद्दल थोडक्यात माहिती:

वसुबारस (आश्विन वद्य द्वादशी / गोवत्सद्वादशी)

वसुबारस ह्याचा अर्थ वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. या दिवशी गाईची पाडसासह संध्याकाळी पूजा करतात. घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे. ज्यांच्याकडे घरी गुरे, वासरे आहेत त्यांच्याकडे ह्यादिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक करतात. घरातील सवाष्ण बायका गाईच्या पायावर पाणी घालतात. नंतर हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून र्चांयाच्या फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात. निरांजनाने ऒवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गाईला खाऊ घालतात. ह्या दिवसापासून अंगणात रांगोळी काढण्यास सुरूवात करतात. पुष्कळ स्त्रियांचा ह्या दिवशी उपवास असतो. ह्या दिवशी गहू, मूग खात नाहीत. स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात. आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात.

धनत्रयोदशी (आश्विन वद्य त्रयोदशी)

धनाची पूजा करणे हा या सणामागील हेतू आहे. व्यापारी, दुकानदार लोक या दिवशी पाटावर लक्ष्मीची मूर्ती, वह्या, धंद्याची हत्यारे, सोने, नाणे ह्यांची पूजा करतात. शेतकर्‍यांच्या दॄष्टीने नवीन आलेले धान्य हेच त्यांचे धन असते. त्यामुळे ते नवीन धान्याची पूजा करतात. त्यावेळी धने व गूळ ह्यांचा नैवेद्य दाखवतात. ह्या सुमारास झेंडू व शेवंतीची फुले मुबलकप्रमाणावर उपलब्ध असल्यामुळे पूजेला झेंडू ची व शेवंतीची फुले वापरतात. या दिवसापासून दारांत आकाशकंदील व पणत्या लावण्यास सुरूवात करतात. व्यापारी वर्गात हा दिवस फार मोठा उत्साहाने साजरा करतात. वैद्य लोक ह्या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात.

पूजेचे साहित्य :

  • पूजेचा पाठ
    • लाल कापड
    • तांब्याची वाटी, ताठ, चमचा
    • पायाखाली अंथरण्यास चटई
    • लाक्ष्मिदेवी, गणपती, सरस्वती, कुबेर फोटो
    • सोने-चांदीचे नाणी
    • कंपनीचे मेन पास बुक
    • व्यवसायाची साहित्य
    • पवित्र पाणी (गंगाजल)
    • पिठाचा दिवा व चार वाती
    • एक होल असलेलं शेल
    • अक्खे तांदूळ
    • लाल मातीचे दिवे
    • तूप / तिळाचे तेल
    • केशरी फुलं
    • अगरबत्ती, माचीस
    • धूप आणि धुपधान
    • अत्तर
    • सुपारी
    • कापसाचे बी, कमळाचे बी, हळकुंड, खोबरं
    • मिठाई
    • बत्ताशा, लाह्या
    • धने, गुळ, केळी, सफरचंद
    • श्री. सूक्तंम पुस्तक, गायत्री मंत्र

सर्वात प्रथम संध्याकाळी यम दीपक लावावा. त्यासाठी पूजेच्या पाठावर हळद आणि कुकुंने स्वस्तिक काढावे. त्यानंतर पिठाच्या दिव्यात दोन वातीच्या एक वात अशा चार वाती लावून तूप घालून तो दिवा पाठावर ठेवावा. त्यानंतर सर्व वाती पेटवाव्या, नंतर एक होल असलेली कवढी दिव्यात टाकावी. गंगाजल ने दिव्याच्या चारही बाजूला तीन वेळा पाणी शिंपडावे नंतर दिव्याला हळद-कुंकू लावावे, तांदूळ वाहावे, साखर वाहावी व नंतर एक रु. चा सिक्का वाहवा, नंतर फुलं वाहावी. नमस्कार करावा, सर्वाना तिलक लावावे. नंतर पुरुषाने डोक्यावर टोपी घालून तो दिवा मुख्यदरवाजा च्या उजव्या बाजूला ठेवावा.

नंतर घरातील मंदिरा समोर बसून || ओं धं धन्वंतरये नम: || हा मंत्र १०८ वेळा म्हणावे, जप झाल्यानंतर म्हणावे “हे भगवान धन्वंतरी हा जप मी आपल्या चरणांवर समर्पित करत आहे, कृपया मला, माझ्या परिवाराला व आप्तेष्टांना उत्तम आरोग्य, धन-संपत्ती प्रदान करावी.”

गणेश – लक्ष्मी पूजन

फोटो-मूर्ती मांडवी, तीन चिमुट अक्खे तांदूळ फोटो समोर ठेवावे (विष्णू, कुबेर आणि इंद्र), दिवा पेठवावा (पूर्ण रात्र तेवत ठेवावा). गणेशाला आव्हान करावे लक्ष्मी पूजेत काही अडचण येवू नये म्हणून विनंती करावी. गणेशाच्या मस्तकावर तिलक करावे, अक्षता वाहाव्यात, अत्तर शिंपडावे, फुलं वाहावी, धूप दाखवावी, नैवद्य दाखवावा, दीप ओवाळावे,

लक्ष्मी देवीला ला आव्हान करावे या आणि आम्हाला सुख-संपत्ती आणि समृध्दी द्यावी” वरील प्रमाणे पूजा, नैवेद्य केळी, दीप, नंतर धने वाहावे, कापसाच्या बी वाहावी, हळकुंड वाहावे, सोन्याची-चांदीची नाणी वाहावी, नवीन नोटा वाहाव्यात, सुपारी वाहावी, कमळाचे बी वाहावे,

विष्णू देवाला आव्हान करावे देवी लक्ष्मी बरोवर येण्यास. अत्तर वाहावे, फुलं वाहावे, धूप धाकवावा, केळ वाहावे,

कुबेर देवाला आव्हान करावे देवी लक्ष्मी बरोवर यायला व संम्पत्ती प्रदान करायला, दीप धाकवावा, अत्तर शिंपडावे, फुलं वाहावे, धूप धाकवावे, नैवद्य,

इंद्र देवाला आव्हान करावे देवी लक्ष्मी बरोबर यायला व सुख-समृद्धी प्रदान करायला. वरील प्रमाणे पूजा.

नरक चतुर्दशी (आश्विन वद्य चतुर्दशी)

आश्विन वद्य चतुर्दशी या दिवशी नरकासूर नावाच्या राक्षसाचा श्रीकृष्णाने संहार केला म्हणून या दिवसाला नरक चतुर्दशी असे नाव पडले. ह्या दिवशी सूर्योदयापूर्वी सर्वजण स्नान करतात. स्नानाच्या वेळी उटणे, सुवासिक तेल, सुगंधी साबण वापरतात. सूर्योदयापूर्वीच्या ह्या स्नानाला अभ्यंगस्नान असे म्हणतात. ह्या दिवशी जो कोणी अभ्यंगस्नान करणार नाही तो नरकात जातो अशी समजूत आहे. स्नानानंतर मुले फटाके उडवतात. या दिवशी पहाटेच पणत्या लावतात. सर्वत्र समृद्धी व्हावी याकरितां अशा पणत्या लावण्याची प्रथा आहे. या दिवशी सणाच्या दिवशी करतात तसा स्वयंपाक करून देवाला नैवेद्य दाखवतात.

लक्ष्मीपूजन (आश्विन वद्य अमावास्या)

या दिवशी बळी पाताळात गाडला गेला, सर्व देवतांची सुटका झाली व लक्ष्मीचे वर्चस्व अबाधित झाले याची आठवण म्हणून यादिवशी लक्ष्मीपूजन करतात. व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. या दिवशी सर्व अभ्यंग स्नान करतात. पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात. त्यावर वाटी किंवा तबक ठेवतात. त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रूपया, दागिने ठेवून त्यांची पूजा करतात. हा दिवस व्यापारी लोक फार उत्साहात साजरा करतात. या दिवशी स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी केरसुणी विकत घेतात. तिलाच लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी घालून हळद-कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरूवात करतात.

पाडवा (कार्तिक शुद्ध प्रतिपदा / बलिप्रतिपदा)

बळीराजाची दानशूरता पाहून वामनाने त्याला पाताळीचे राज्य दिले आणि दात्याची सेवा करण्यास वामनाने बळीराज्याचे द्वारपाल होण्याचे काम स्वीकारले. तो दिवस म्हणजे कार्तिक शुद्ध प्रतिपदा होय. या दिवशी विक्रम संवत सुरू होते. पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी लोक दिवाळीतील पाडवा ही नववर्षाची सुरुवात मानतात. लक्ष्मीप्राप्तीसाठी नव्या वह्यांचे पूजन करून व्यापारी लोक वर्षाचा प्रारंभ करतात. व्यापारी लोकांच्या जमा-खर्चाच्या कीर्द खतावणीच्या नवीन वह्या ह्या दिवशी सुरू होतोत. कीर्द खतावणीच्या नवीन वह्या सुरू करण्यापूर्वी वह्यांना हळद-कुंकू, गंध, फूल, अक्षता वाहून पूजा करतात. घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी पतीला औक्षण करते व पती पत्नीला ऒवाळणी घालतो. नवविवाहीत दांपत्याची पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी करतात. ह्यालाच दिवाळसण म्हणतात. त्यानिमित्त यादिवशी जावयांस आहेर करतात.

भाऊबीज (कार्तिक शुद्ध द्वितीया / यमद्वितीया)

या दिवशी यमराजाची बहीण यमुना हिने आपल्या भावाला म्हणजेच यमराजाला अगत्यपूर्वक जेवायला बोलावले होते अशी पौराणिक कथा आहे. म्हणून भाऊबीज हा सण साजरा केला जातो. भाऊ बहिणीकडून ऒवाळून घेतो. भाऊ तिला प्रेमाचे प्रतिक म्हणून काहीतरी भेटवस्तू किंवा पैसे देतो. जर काही कारणाने बहिणीला कोणी भाऊ भेटलाच नाही तर ती चंद्राला भाऊ समजून ऒवाळते. भावा-बहिणीने एकमेकांची आठवण ठेवावी, विचारपूस करावी, एकमेकांवर प्रेम करावे यासाठी हा सण साजरा करतात. या दिवशी ज्याला मरण येईल त्याला मोक्ष मिळतो असे म्हणतात.

************************************************************************

लक्ष्मी व व्यापारी वहीपूजा विधी :

मुहूर्त :-

लक्ष्मीपूजा : २४ तारखेला संध्या. ०६:५३ ते ०८:१६      

व्यापारी वही पूजा : २४ तारखेला रात्री १०:४९ ते १२:२३ रात्री ०१:५६ ते स. ०५:०४ किंवा २६ तारखेला सूर्योदय ते स. ०९:३० स. १०.५६ ते १२.:२२. 

१) सर्वात प्रथम घरात सर्वत्र गंगाजल किंवा गोमुत्र शिंपडून घर स्वच्छ-शुद्ध-पवित्र करून घ्यावे.

२) मंदिरासमोर (घराच्या पूर्व, ईशान्य, उत्तर भागात) आसन मांडून त्यावर लाल नवीन वस्त्र अंतरावे व मधोमध मुठभर अखंड तांदुळा अंतरावे.

३) तांब्याचा कलश घेवून त्यामध्ये ७५% पाणी भरावे, तांब्यात एक सुपारी, एक केसरी झेंडूचे फुल, एक रुपयाचा शिक्का व थोडे अखंड तांदूळ टाकावे. कलशाच्या तोंडावर ५ आंब्याची पाने मांडावी.

४) कलशावर ठेवण्यासाठी पुजेचे ताट घेवून त्यामध्ये अखंड तांदळाचा छोटा पसरट डोंगर उभा करावा त्यावर हळदीने कमळाचे फुल काढून त्याच्या मधोमध लक्ष्मीदेवीची मूर्ती / फोटो ठेवावा. मूर्ती-फोटो समोर थोडे शिक्के ठेवावे.

५) कलशाच्या उजव्या बाजूला गणपती बाप्पांची मूर्ती / फोटो मांडून त्यावर हळद-कुंकू व थोडे अखंड तांदूळ वाहून पूजा करावी.

मंत्र : वक्रतुण्ड महाकाय सूर्य कोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व-कार्येशु सर्वदा॥

ॐ एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि । तन्नो दन्ती प्रचोदयात् ।।

६) कलशाच्या आजू-बाजूला व्यापारी वह्या, पैसे, दाग-दागिने, संपत्तीसंबंधी दस्ताऐवज ठेवावेत.

७) दोन वातींची एक वात करून दिवा लावावा व तो पूजेच्या ताटामध्ये हळद-कुंक आणि थोड्या तांदळाबरोबर ठेवावा.

८) पूजेचे ताट घेवून कलशाची हळद-कुंकू आणि फुलं वाहून पूजा करावी.

९) हातात थोडी फुलं आणि थोडे अखंड तांदूळ घेवून लक्ष्मीदेवीचे आवाहन करावे व नंतर ते कलशासमोर अर्पण करावेत.

मंत्र : सर्वलोकस्य जननीं सर्वसौख्यप्रदायिनीम | सर्वदेवमयीमीशां देवीमावाहयाम्यहम् ||
ॐ तां म आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीम् | यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषानहम् ||

१०) लक्ष्मीदेवीची मूर्ती / फोटो ताटात घेवून पंचामृताने आंघोळ घालावी.

मंत्र : ॐ घृतं घृतपावानः पिबत वसां वसापावानः पिबतान्तरिक्षस्य हविरसि स्वाहा |

दिशः प्रदिश आदिशो विदिश उद्धिशो दिग्भ्यः स्वाहा || ॐ महालक्ष्म्यै नमः घृतस्नानं समर्पयामि |

११) नंतर मूर्ती स्वच्छ पाण्याने धुवावी.

मंत्र : मन्दाकिन्याः समानीतैर्हेमाम्भोरूहवासितैः | स्नानं कुरूष्व देवेशि सलिलैश्च सुगन्धिभिः ||
ॐ महालक्ष्म्यै नमः स्नानं समर्पयामि |

१२) मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसून पुन्हा कलशावर मांडावी.

मंत्र : तप्तकाश्चनवर्णाभं मुक्तामणिविराजितम् | अमलं कमलं दिव्यमासनं प्रतिगृह्यताम् ||
ॐ अश्वपूर्वां रथमध्यां हस्तिनादप्रमोदिनीम् | श्रियं देवीमुपह्वये श्रीर्मा देवी जुषताम् ||

१३) देवीच्या मूर्तीवर हळद-कुंकू वाहावे.

मंत्र : रक्तचन्दनसम्मिश्रं पारिजातसमुद्भवम् | मया दत्तं महालक्ष्मि चन्दनं प्रतिगृह्यताम् ||

ॐ महालक्ष्म्यै नमः रक्तचन्दनं समर्पयामि |

१४) थोडे अखंड तांदूळ वाहावे.

मंत्र : अक्षताश्च सुरश्रेष्ठ कुंकुमाक्ताः सुशोभिताः | मया निवेदिता भक्त्या गृहाण परमेश्वरि ||
ॐ महलक्ष्म्यै नमः | अक्षतान समर्पयामि ||

१५) देवीच्या गळ्यात कापसाच्या बी चा हार घालावा.

मंत्र : दिव्याम्बरं नूतनं हि क्षौमं त्वतिमनोहरम् | दीयमानं मया देवि गृहाण जगदम्बिके ||
ॐ उपैतु मां देवसुखः कीर्तिश्च मणिना सह | प्रादुर्भूतोस्मि राष्ट्रेस्मिन कीर्तिमृद्धि ददातु मे ||

१६) मूर्तीवर थोडी केसरी झेंडूची फुलं, बेल पाने वाहावीत.

मंत्र : रत्नकंकणवैदूर्यमुक्ताहाअरादिकानि च | सुप्रसन्नेन मनसा दत्तानि स्वीकुरूष्व भोः ||

ॐ क्षुत्पिपासामलां ज्येष्ठामलक्ष्मीं नाशयाम्यहम् | अभूतिमसमृद्धि च सर्वां न

१७) मूर्तीवर थोड्या दुर्वा वाहाव्यात.

मंत्र : क्षीरसागरसम्भते दूर्वां स्वीकुरू सर्वदा || ॐ महालक्ष्म्यै नमः दूर्वां समर्पयामि |

१८) लाल केसरी झेंडूच्या फुलांचा हार घालावा.

मंत्र : माल्यादीनि सुगन्धीनि मालत्यादीनि वै प्रभो | ॐ मनसः काममाकूतिं वाचः सत्यमशीमहि |
ॐ महालक्ष्म्यै नमः | पुष्पमालां समर्पयामि ||

१९) नंतर दोन सुगंधी अगरबत्ती आणि धूप लावावी.

२०) कलशासमोर पाच खाऊची पाने मांडावीत, त्यावर नारळ, सुपारी, हळकुंड-खारीक, फळ, खोबरे-गुळ मांडून त्यावर हळद-कुंकू, थोडे अखंड तांदूळ वाहून पूजा करावी.

२१) कलशाच्या आजू-बाजूला ठेवलेल्या व्यापारी वह्या, पैसे, दाग-दागिने, संपत्तीसंबंधी दस्ताऐवज यांचीही हळद-कुंकू, थोडे अखंड तांदूळ वाहून पूजा करावी. 

२२) चुरमुरे, धने आणि जिरे मूर्तीवर व आजुवाजुव्या सर्व वस्तूंवर वाहून पूजा करावी / नमस्कार करावा.

२३) मिठाई, दिवाळीचा फराळ आणि फळांचा नैवेद्य मंत्र म्हणत दाखवावा.

मंत्र : ॐ सह नाववतु । सह नौ भुनक्तु । सह वीर्यं करवावहै । तेजस्वि नावधीतमस्तु मा विद्विषावहै । ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥

२४) कुटुंबातील सर्वानी एकत्र येऊन लक्ष्मीदेवी व गणपती बाप्पांची आरती करावी.

ही दिवाळी आपल्या जीवनात सुख-समृद्धी-समाधान-निरोगी आरोग्य व भरभराटी घेवून येवो तसेच सर्वांना कोरोना पासुन सुरक्षित ठेवो हीच लक्ष्मी देवी व गणपती बाप्पांच्या चरणी पार्थना. आपल्या परीवारास माझ्या व माझ्या परीवाराकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

वास्तुशास्त्रासंदर्भात योग्य ते मार्गदर्शन उपाययोजनांसहित दिले जाईल.

वास्तूतज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय वास्तूसंदर्भात व वरील उपायांसंदर्भात कोणताही निर्णय घेवू नये. 

अधिक माहिती साठी संपर्क :-
वास्तुशास्त्र / ज्योतिष / रेकी तज्ञ श्री. मनोजकुमार आप्पा मोहिते
इमेल :- vastusiddhii@gmail.com
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhii/
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhi
Calling No. 83698 84338
Whatsapp no. 88280 53505

Leave a comment